2024 Paris Olympic Highlights, Day 6 : पॅरिस ऑलिम्पिकचा सहावा दिवस म्हणजे १ ऑगस्ट २०२४ भारतासाठी आनंदापेक्षा दु:खच घेऊन आला. दिवसाची सुरुवात पदकाने झाली पण दिवसअखेर भारताच्या अनेक पदकाच्या अपेक्षा भंग पावल्या. एकापाठोपाठ एक स्पर्धक ऑलिम्पिकमधून बाहेर पडत गेले आणि दिवसअखेरीस भारताची पदक संख्या दुहेरी आकडा गाठू शकेल का असा प्रश्न निर्माण झाला. स्वप्नील कुसाळेने भारताचे खाते उघडले. त्याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारा आणि पदक जिंकणारा कुसाळे हा पहिला भारतीय ठरला. याशिवाय भारतीय पुरुष हॉकी संघाचा सामना सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियम या गटात झाला. बेल्जियमने भारताचा २-१ असा पराभव केला. बॉक्सिंगमध्ये, निखत झरीनला महिलांच्या ५० किलो गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. तिरंदाजीमध्ये प्रवीण जाधवला पुरुषांच्या वैयक्तिक गटातही पराभव पत्करावा लागला. त्याबरोबर दिवसातील शेवटच्या सामन्यात पी.व्ही.सिंधू बाहेर पडली.

Live Updates

India at Olympic Games Paris 2024 Highlights , 01 August 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या सहाव्या दिवसाचे हायलाइट्स

00:12 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पॅरिस ऑलिम्पिकच्या सातव्या दिवसातील भारताचे वेळापत्रक

पॅरिस ऑलिम्पिकच्या सातव्या दिवसातील भारताचे वेळापत्रक

https://twitter.com/sportwalkmedia/status/1819033422158758303

गोल्फ : पुरुषांची वैयक्तिक स्ट्रोक दुसरी फेरी: शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर (दुपारी 12.30 नंतर)

शूटिंग: 25 मीटर पिस्तूल महिला पात्रता: ईशा सिंग, मनू भाकर (दुपारी 12.30 वाजेपासून)

स्कीट पुरुषांची पात्रता - पहिला दिवस: अनंतजित सिंग नारुका (दुपारी 1.00 नंतर)

तिरंदाजी : मिश्र संघ 1/8 एलिमिनेशन फेरी: भारत विरुद्ध इंडोनेशिया (अंकिता भकट/धीरज बोम्मादेवरा वि. डायंडा कोरुनिसा/आरिफ पंगेस्तू) (दुपारी 1.20 नंतर)

ज्युडो : महिलांची +78 किलो एलिमिनेशन फेरी ऑफ 32: तुलिका मान विरुद्ध इडालिस ऑर्टिज (दुपारी 1.30 नंतर)

नौकानयन :महिला डिंगी रेस-3: नेत्रा कुमनन (दुपारी 3.45 वाजेपासून)

पुरुषांची डिंगी शर्यत-३: विष्णू सरवणेन (सायंकाळी ७.०५ पासून)

हॉकी :ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत गट स्टेज सामना (4.45 नंतर)

बॅडमिंटन :पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरी: लक्ष्य सेन वि चू टिन चेन (संध्याकाळी 6.30 नंतर)

अॅथलेटिक्स : महिला 5000 मीटर हीट-1: अंकिता ध्यानी (रात्री 9.40 पासून)

महिला ५००० मीटर हीट-२: पारुल चौधरी (रात्री १०.०६ पासून)

पुरुषांची शॉटपुट पात्रता: तजिंदरपाल सिंग तूर (रात्री 11.40 पासून)

23:06 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पी.व्ही. सिंधूची ऑलिम्पिक पदकांची हॅट्ट्रीक हुकली

पी.व्ही. सिंधूचा निराशाजनक पराभव

बॅडमिंटन फेरीच्या १६व्या सामन्यात पी.व्ही. सिंधूला १९-२१, १४-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. तिला पराभूत करून चीनची ॲथलीट बिंग जाओ हिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यासह सिंधूचा २०२४च्या ऑलिम्पिकमधील प्रवास संपला आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1819063231518068828

22:42 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पीव्ही सिंधूने पहिला गेम गमावला

पीव्ही सिंधूने पहिला गेम गमावला

पीव्ही सिंधू आणि ही बिंग जाओ यांच्यात पहिल्या गेममध्ये चुरशीची स्पर्धा होती. सिंधूने पहिला गेम 21-19 अशा फरकाने गमावला. या सामन्यातील विजेता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1819056787582050657

22:22 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पीव्ही सिंधू पहिल्या गेममध्ये पिछाडीवर

पीव्ही सिंधू पहिल्या गेममध्ये पिछाडीवर

पीव्ही सिंधू 16व्या फेरीतील पहिल्या गेममध्ये पिछाडीवर आहे. चिनी ॲथलीट ही बिंग जाओ याच्याकडे सध्या भारतीय खेळाडूवर ११-८ अशी आघाडी आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1819052770588070205

22:17 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : कार्लोस अल्काराझने उपांत्य फेरी गाठली

कार्लोस अल्काराझने उपांत्य फेरी गाठली

टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि दुसरा मानांकित स्पॅनिश स्टार कार्लोस अल्काराझने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-3, 7-6 असा पराभव केला. यासह त्याने उपांत्य फेरी गाठली आहे.

22:13 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पीव्ही सिंधूचा सामना सुरू झाला

पीव्ही सिंधूचा सामना सुरू झाला

बॅडमिंटनमधील पीव्ही सिंधूचा राउंड ऑफ 16 सामना सुरू झाला आहे. तिचा सामना चीनच्या बिंग जाओशी आहे. सिंधूने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये याच चिनी खेळाडूचा पराभव करून कांस्यपदक जिंकले होते.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1819049215651160084

22:04 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : सेलिंगमध्ये भारताची ठिकठाक कामगिरी

सेलिंगमध्ये भारताची ठिकठाक कामगिरी

सेलिंगमध्ये, पुरुषांच्या दुसऱ्या शर्यतीत भारताच्या विष्णू श्रवणने 34 वे स्थान मिळविले. तो सध्या संपूर्ण स्पर्धेत 25 व्या क्रमांकावर आहे. तिसरी आणि चौथी शर्यत उद्या होणार आहे.

21:43 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पीव्ही सिंधूकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ॲक्शनमध्ये दिसणार आहे. पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये रौप्य पदक आणि टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला तिसऱ्या पदकाची आशा आहे. सिंधू हे करण्यात यशस्वी ठरल्यास तीन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती भारताच्या इतिहासातील पहिली खेळाडू ठरेल.

21:31 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पीव्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी

पीव्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना चीनच्या हे बिंगजियाओशी होणार आहे. विजयाची नोंद करून ती उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल.

21:11 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live :धोनीला आदर्श मानणारा करवीरनगरीचा शिलेदार, कोण आहे स्वप्नील कुसाळे?

धोनीला आदर्श मानणारा करवीरनगरीचा शिलेदार, कोण आहे स्वप्नील कुसाळे? जाणून घ्या

https://www.loksatta.com/krida/who-is-swapnil-kusale-who-won-bronze-medal-for-india-in-50m-rifle-3-position-shooting-at-paris-olympics-2024-vbm-97-4512260/

20:43 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : स्वप्नील कुसाळेला महाराष्ट्र सरकारकडून एक कोटीचे बक्षीस जाहीर

नेमाबाज स्वप्नील कुसाळेला महाराष्ट्र सरकारकडून एक कोटीचे बक्षीस जाहीर

https://www.loksatta.com/krida/paris-olympic-2024-live-updates-day-6-india-full-schedule-olympic-2024-medal-tally-20km-race-walk-final-hockey-and-lakshya-vs-prannoy-vbm-97-4511795/

19:59 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनल 10 वाजता होणार

पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये सहभागी होणार आहे.

बॅडमिंटनमध्ये भारताचा अजून एक महत्त्वाचा सामना बाकी आहे. स्टार शटलर पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये रात्री 10 वाजता खेळेल.

19:29 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : भारताचे आज पदकाचे तीन मोठे दावेदार बाहेर पडले

भारताचे आज पदकाचे तीन मोठे दावेदार बाहेर पडले

1) बॉक्सर निखत जरीन प्री-क्वार्टर फायनल मॅच हरली

2) सिफ्ट कौर समरा ५० मीटर रायफल ३ पोझिशनच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही.

3) पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग जोडी उपांत्यपूर्व फेरीत हरली.

19:12 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : गोल्फमध्ये भारत 25 व्या क्रमांकावर

गोल्फमध्ये भारत 25 व्या क्रमांकावर आहे.

पुरुषांच्या गोल्फ स्पर्धेत भारताचा शुभंकर शर्मा पहिल्या फेरीत 25व्या स्थानावर आहे. 11व्या होलनंतर त्याचा स्कोअर 2 अंडर पार आहे. अव्वल स्थानावर असलेला जपानचा मात्सुयामा त्याच्यापेक्षा 6 शॉट्स पुढे आहे. दुसरा भारतीय गगनजीत भुल्लर 54व्या स्थानावर आहे.

18:30 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : लक्ष्य सेन प्रणॉयचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत

लक्ष्य सेन प्रणॉयचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा स्टार पुरुष एकेरी खेळाडू लक्ष्य सेनने देशबांधव एचएस प्रणॉयचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्यने चमकदार कामगिरी करत प्रणॉयचा 21-12, 21-6 असा पराभव केला. आता शुक्रवारी अंतिम आठमध्ये लक्ष्यचा सामना चीनच्या टू चिन टेनशी होणार आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818992759795237125

18:23 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : लक्ष्य सेनने पहिला सेट जिंकला

लक्ष्य सेनने पहिला सेट जिंकला

भारताच्या लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांच्यात पुरुष एकेरी गटातील उपउपांत्यपूर्व सामना खेळला जात आहे. या सामन्यात लक्ष्य सेन सध्या प्रणॉयवर मात करताना दिसत आहे. या सामन्यातील पहिला सेट लक्ष्यने जिंकला. 21 मिनिटे चाललेल्या या गेममध्ये त्याने प्रणॉयचा 21-12 असा पराभव केला.

17:47 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : चिराग-सात्विक जोडीकडून देशवासियांची निराशा

पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या आरोन चिया आणि यिक वुई सोह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पदकाचे सर्वात मोठे दावेदार सात्विक-चिराग यांना 21-13, 14-21, 16-21असा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय जोडीने शानदार सुरुवात करत पहिला गेम जिंकला होता, पण मलेशियाच्या जोडीने शानदार पुनरागमन करत पुढील दोन जिंकून सात्विक-चिराग यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818981299534938156

17:34 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : तिसऱ्या गेममध्ये चिराग-सात्विक जोडी आघाडीवर

तिसऱ्या गेममध्ये चिराग-सात्विक 11-9 अशी आघाडी घेतली

तिसऱ्या आणि शेवटच्या गेममध्ये भारत आणि मलेशिया यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. तिसऱ्या गेममध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रेड्डी या भारतीय जोडीने 11-9 अशी आघाडी घेतली आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818978336804053354

17:19 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : भारताच्या बॅडमिंटन पुरुष जोडीचा दुसऱ्या गेममध्ये पराभव

चिराग-सात्विकने दुसरा गेम गमावला

बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या गेममध्ये मलेशियाच्या चिया आरोन आणि शो वू यिक यांनी २१-१४ असा विजय मिळवला आहे. आता दोन्ही संघांनी 1-1 असा सामना जिंकला असून सामन्याचा निर्णय तिसऱ्या गेममध्ये होणार आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818975056053039197

17:07 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत रताला मलेशियाकडून कडवी टक्कर

बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला मलेशियाकडून कडवी टक्कर द्यावी लागणार

भारतीय जोडी बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत मागे पडली आहे. मलेशियाच्या चिया आरोन आणि शो वू यिक यांनी दुसऱ्या गेममध्ये 12-10 अशी आघाडी घेतली. मात्र, भारताचे चिराग आणि सात्विक त्यांना तगडे आव्हान देत आहेत.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818973037393584324

16:55 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना भारताने जिंकला

भारतासाठी बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये सात्विक आणि चिराग यांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. चिराग आणि सात्विक यांनी पहिला गेम जिंकला आहे. भारतीय जोडीने मलेशियाच्या खेळाडूंचा 21-13 असा पराभव केला.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818970039074083016

16:44 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा मलेशियाशी सामना

बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना मलेशियाशी होणार आहे

भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी त्यांच्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना मलेशियाशी होत आहे. चिया आरोन आणि सो वू यिक मलेशियाकडून स्पर्धा करतील.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818968238081843598

16:35 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : स्वप्नील कुसाळेला रेल्वेत अधिकारी पदावर मिळणार बढती

स्वप्नील कुसाळेला रेल्वेत अधिकारी पदावर मिळणार बढती

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीच्या सहाव्या दिवशी भारतीय नेमबाज स्वप्नील कुसाळेने इतिहास रचला. त्याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. स्वप्नीलच्या विजयानंतर मध्य रेल्वेमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मध्य रेल्वेचे जीएम रामकरण यादव म्हणाले की, 'स्वप्नील मध्य रेल्वेच्या पुणे विभागात टीटीई म्हणून कार्यरत आहे, आता त्याची पदोन्नती रेल्वेच्या धोरणानुसार होईल. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्यांना ऑफिसर कॅडर दिले जाते, त्यामुळे त्याला ओएसडी स्पोर्ट्स केले जाईल.'

https://twitter.com/GautamGambhir/status/1818930622749909130

16:22 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : अंजुम-सिफ्टची खराब कामगिरी

अंजुम-सिफ्टची खराब कामगिरी

महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स पात्रता स्पर्धेत भारताची स्थिती चांगली दिसत नाही. नीलिंग आणि प्रोन फेरी संपल्यानंतर अंजुम 21व्या स्थानावर आहे. तर सिफ्ट 26 व्या क्रमांकावर आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818961011648389293

16:03 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : अंजुमने शानदार कामगिरी करत घेतली मोठी झेप

50 मीटर रायफल 3 पोझिशन्स महिला पात्रता स्पर्धेत भारताकडून सिफ्ट कौर समरा आणि अंजुम मुदगिल या महिला नेमबाजी स्पर्धेत भाग घेत आहेत. पहिल्या मालिकेनंतर अंजुम 18व्या स्थानावर राहिली. सिफ्ट 22 व्या क्रमांकावर राहिली. यामध्ये एकूण 32 नेमबाज सहभागी झाले आहेत. दुसऱ्या मालिकेनंतर अंजुमने शानदार कामगिरी करत मोठी झेप घेत 9वे स्थान पटकावले आहे. सिफ्ट सध्या 25 व्या स्थानावर आहे. या स्पर्धेतील अव्वल ८ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818953975376367734

15:23 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : टीम इंडिया आधीच उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली आहे

टीम इंडिया आधीच उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली आहे

भारतीय हॉकी संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे. पण कमकुवत संघासोबत सामना खेळायचा असेल तर अव्वल दोनचे स्थान कायम राखावे लागेल. भारतीय हॉकी संघ सध्या ब गटातील गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बेल्जियम अव्वल स्थानावर आहे. त्याने 4 सामने खेळले असून त्याचे 12 गुण आहेत. भारताबद्दल बोलायचे झाले तर भारताने 4 सामने खेळले आहेत आणि 2 जिंकले आहेत. भारताचे 7 गुण आहेत.

15:12 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : बेल्जियमने हॉकीमध्ये भारताचा पराभव केला

बेल्जियमने हॉकीमध्ये भारताचा पराभव केला

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने भारतीय पुरुष हॉकी संघाचा पूल बी सामन्यात 2-1 असा पराभव करून भारताची अजिंक्य वाटचाल संपवली. अभिषेकने दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत भारताला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली, पण बेल्जियमसाठी थिब्यू स्टॉकब्रोक्स आणि जॉन ड्यूशमन यांनी तिसऱ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली जी शेवटपर्यंत अबाधित राहिली. बेल्जियमविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ एकही सामना हरला नव्हता. भारताने न्यूझीलंड आणि आयर्लंडविरुद्ध विजय मिळवला होता, तर अर्जेंटिनाविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली होती. मात्र, बेल्जियमविरुद्ध सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतरही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय पुरुष हॉकी संघ मात्र अगोदरच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1818942998618755391

15:02 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : बॉक्सर निखत झरीनचा पराभव

निखत झरीनचा पराभव

भारताची स्टार बॉक्सर निखत झरीन पराभूत झाल्यानंतर बाहेर आहे. महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फेरीच्या 16 सामन्यात तिला चीनच्या वू यू हिने 5-0 ने पराभूत केले. निखतला एकही चढाओढ जिंकण्यात यश आले नाही.

https://twitter.com/Media_SAI/status/1818940876720402795

15:00 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live :तिरंदाजीतून प्रवीण जाधव बाहेर

तिरंदाजीतून प्रवीण जाधव बाहेर

प्रवीण जाधवही पुरुष एकेरीच्या तिरंदाजीत पराभूत होऊन बाहेर पडला आहे. त्याला चीनच्या काओ वेनचाओने 6-0 ने पराभूत केले. प्रवीणला एकही सेट जिंकण्यात यश आले नाही.

14:42 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : बेल्जियमने एक गोल केला, हॉकीचा सामना 1-1 असा बरोबरीत

बेल्जियमने एक गोल केला, हॉकीचा सामना 1-1 असा बरोबरीत

बेल्जियमने भारताची बरोबरी केली आहे. तिसऱ्या क्वार्टरमध्ये संघाने एक गोल केला आहे. आता भारतीय हॉकी संघ आणि बेल्जियम 1-1 ने बरोबरीत आहेत. टीम इंडिया अतिशय आक्रमक खेळत आहे. भारतीय खेळाडू गोल करण्याचा प्रयत्न करत आहे.

India at Paris Olympic Games 2024 Day 6 Live Updates in marathi

India at Paris Olympic 2024 Highlights : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सहाव्या दिवशी म्हणजे आज भारताला तीन खेळात पदक मिळण्याची होती. मात्र, प्रत्यक्षात भारताला एकच पदक जिंकता आलं. नेमबाज स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकून दिले.