2024 Paris Olympic Highlights, Day 6 : पॅरिस ऑलिम्पिकचा सहावा दिवस म्हणजे १ ऑगस्ट २०२४ भारतासाठी आनंदापेक्षा दु:खच घेऊन आला. दिवसाची सुरुवात पदकाने झाली पण दिवसअखेर भारताच्या अनेक पदकाच्या अपेक्षा भंग पावल्या. एकापाठोपाठ एक स्पर्धक ऑलिम्पिकमधून बाहेर पडत गेले आणि दिवसअखेरीस भारताची पदक संख्या दुहेरी आकडा गाठू शकेल का असा प्रश्न निर्माण झाला. स्वप्नील कुसाळेने भारताचे खाते उघडले. त्याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारा आणि पदक जिंकणारा कुसाळे हा पहिला भारतीय ठरला. याशिवाय भारतीय पुरुष हॉकी संघाचा सामना सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियम या गटात झाला. बेल्जियमने भारताचा २-१ असा पराभव केला. बॉक्सिंगमध्ये, निखत झरीनला महिलांच्या ५० किलो गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. तिरंदाजीमध्ये प्रवीण जाधवला पुरुषांच्या वैयक्तिक गटातही पराभव पत्करावा लागला. त्याबरोबर दिवसातील शेवटच्या सामन्यात पी.व्ही.सिंधू बाहेर पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

India at Olympic Games Paris 2024 Highlights , 01 August 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या सहाव्या दिवसाचे हायलाइट्स

14:38 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पंतप्रधान मोदींनी स्वप्नील कुसळेचे अभिनंदन केले

पंतप्रधान मोदींनी स्वप्नील कुसळेचे अभिनंदन केले

14:17 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : मराठमोळ्या स्वप्नील कुसळेने रचला इतिहास

भारताच्या स्वप्नील कुसळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. स्वप्नीलपूर्वी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी सरबज्योतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.

13:50 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : स्वप्नील कुसळेने कांस्यपदक जिंकले.

स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले.

13:46 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : स्वप्नील कुसळे तिसऱ्या क्रमांकावर विराजमान

स्टँडिंगमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या मालिकेनंतर भारताचा स्वप्नील कुसळे तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

13:34 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live :हॉकीमध्ये भारत-बेल्जियम सामन्याला सुरुवात

हॉकीमध्ये भारताचा सामना बेल्जियमशी आहे

भारतीय हॉकी संघाचा सामना बेल्जियमशी आहे. ही स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. टीम इंडियाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. आता भारतीय संघ चौथ्या गट सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.

13:32 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : स्वप्नील कुसळे पाचव्या स्थानावर पोहोचला

नीलिंग आणि प्रोन मालिका संपल्यानंतर, स्वप्नील कुसळे 310.1 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. आता स्टँडिंगच्या दोन मालिका शिल्लक आहेत.

प्रोन (तीसरी मालिका): 10.5, 10.4, 10.4, 10.2, 10.4, एकूण: 51.9 गुण

13:28 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : महिलांच्या 20 किलोमीटर रेस वॉक पदक स्पर्धेला सुरुवात

महिलांच्या 20 किलोमीटर रेस वॉक पदक स्पर्धेला सुरुवात झाली

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांची 20 किलोमीटर रेस वॉक पदक स्पर्धा सुरू झाली आहे. ज्यामध्ये प्रियांका ही भारतातील एकमेव खेळाडू आहे.

13:16 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : 15 शॉट्सनंतर स्वप्नील सहाव्या स्थानावर कायम

15 शॉट्सनंतर स्वप्नील सहाव्या स्थानावर कायम

15 शॉट्सनंतरही स्वप्नील गुडघे टेकण्याच्या स्थितीत सहाव्या स्थानावर आहे. त्याचा स्कोर 153.3 होता. सध्या नॉर्वेचा नेमबाज पहिल्या क्रमांकावर, चीनचा विश्वविक्रम धारक दुसऱ्या क्रमांकावर आणि युक्रेनचा नेमबाज तिसऱ्या स्थानावर आहे.

13:12 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : 10 शॉट नेलिंग राउंडनंतर स्वप्नील कुसळे सहाव्या स्थानावर कायम

स्वप्नील कुसळेची सुरुवात खराब झाली

भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने 9.6 गुणांसह सुरुवात केली. यानंतर 10 शॉट नेलिंग राउंडनंतर स्वप्नील कुसळे सहाव्या स्थानावर आहे. त्याचा स्कोर 101.7 आहे.

मात्र, तो आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र भारतीय नेमबाजाची सुरुवात चांगली झाली नाही.

13:05 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पुरुषांच्या 20 किमी रेस वॉक पदक स्पर्धेत भारताच्या पदरी निराशा

पुरुषांच्या 20 किमी रेस वॉक पदक स्पर्धेत भारताला निराशेचा सामना करावा लागला

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सहाव्या दिवशी झालेल्या पुरुषांच्या 20 किलोमीटर रेस वॉक पदक स्पर्धेत भारतातील तीन खेळाडू सहभागी झाले होते, ज्यामध्ये कोणीही पदक जिंकण्यात यशस्वी झाले नाही. या स्पर्धेत इक्वेडोरच्या डॅनियल ब्रायन पिंटाडोने सुवर्णपदक पटकावले आहे.

13:04 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनची अंतिम फेरी सुरू

पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनची अंतिम फेरी सुरू

पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनची अंतिम फेरी सुरू झाली आहे. भारताकडून स्वप्नील कुसळे आव्हान सादर करत आहे. पात्रता फेरीत तो सातव्या स्थानावर राहिला होता. आज त्याच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे.

13:01 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पुरुषांचा वैयक्तिक गोल्फ स्ट्रोक स्पर्धेला सुरूवात

पुरुषांचा वैयक्तिक गोल्फ स्ट्रोक खेळाचा कार्यक्रम सुरूवात

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आजपासून गोल्फ इव्हेंटला सुरुवात झाली आहे ज्यामध्ये पुरुषांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्ले स्पर्धेत भारताकडून गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा सहभागी होत आहेत.

12:49 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : अक्षदीप सिंगने नाव मागे घेतले

अक्षदीप सिंगने नाव मागे घेतले

पुरुषांच्या 20 किमी रेस वॉक इव्हेंटशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे. वास्तविक, भारताच्या आकाशदीप सिंगने आपले नाव मागे घेतले आहे. याआधी त्याने 6 किमी शर्यतीत सर्वात खालच्या क्रमांकावर स्थान मिळविले होते.

12:48 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पुरुषांच्या 20 किलोमीटर रेस वॉक पदक स्पर्धेत 15 किलोमीटरची शर्यत पूर्ण

पुरुषांच्या 20 किलोमीटर रेस वॉक पदक स्पर्धेत 15 किलोमीटरची शर्यत पूर्ण

पुरुषांच्या 20 किमी रेस वॉक पदक स्पर्धेत, भारताचा विकास सिंग 15 किमी शर्यत पूर्ण केल्यानंतर 29 व्या स्थानावर आहे.

12:42 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पुरुषांची 20 किमी रेस वॉक स्पर्धा सुरू

पुरुषांची 20 किमी रेस वॉक स्पर्धा सुरू झाली आहे. भारताचे तीन खेळाडू पदकांच्या शर्यतीत आहेत. भारतासाठी विकास सिंग, परमजीत सिंग बिश्त आणि अक्षदीप सिंग हे आव्हान सादर करत आहेत. यानंतर महिलांची रेस वॉक स्पर्धाही होईल. त्यात प्रियांका आव्हान सादर करणार आहे. बॉक्सर निखतही राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश करणार आहे.

12:38 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या सहाव्या दिवसाचे वेळापत्रक

ॲथलेटिक्समध्ये पुरुषांची 20 किमी रेस वॉक पदक स्पर्धा – परमजीत सिंग बिश्त, आकाशदीप सिंग आणि विकास सिंग – सकाळी 11 वाजता IST

ऍथलेटिक्समध्ये महिलांची 20 किमी रेस वॉक पदक स्पर्धा – प्रियांका – 12:50 PM IST

गोल्फ पुरुषांची वैयक्तिक फेरी 1 – गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा – 12:30 PM IST

नेमबाजी पुरुषांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स पदक स्पर्धा – स्वप्नील कुसळे – दुपारी 1 वाजता IST

पुरुष हॉकीमध्ये भारत विरुद्ध बेल्जियम (ब गटातील सामना) – दुपारी 1:30 PM IST

बॉक्सिंग महिला 50 किलो गट प्री-क्वार्टर फायनल – निखत जरीन वि वू यू (चीन) – दुपारी 2:30 IST

तिरंदाजी पुरुषांची 16 वैयक्तिक फेरी – प्रवीण जाधव वि काओ वेन्चाओ (चीन) – दुपारी 2:31 IST

महिलांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स पात्रता फेरी – सिफ्ट कौर समरा आणि अंजुम मौदगिल – दुपारी 3:30 PM IST

नौकानयनात, पुरुषांची डिंगी शर्यत एक आणि नंतर दोन – विष्णू सरवणन – दुपारी 3.45 IST

बॅडमिंटन पुरुष दुहेरी – सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध आरोन चिया आणि सू वुई यिक (मलेशिया) – दुपारी 4:30 IST

बॅडमिंटनमधील पुरुष एकेरी प्री-क्वार्टर फायनल सामना – लक्ष्य सेन विरुद्ध एचएस प्रणॉय (दोन्ही भारतीय खेळाडू) – सामना IST 5:40 pm पूर्वी सुरू होणार नाही

नौकानयनामध्ये, महिलांची डिंगी शर्यत एक त्यानंतर दुसरी नेत्रा कुमनन – संध्याकाळी 7.05 IST

महिला बॅडमिंटन एकेरी प्री-क्वार्टर फायनल मॅच – पीव्ही सिंधू विरुद्ध हे बिंग जिओ (चीन) – रात्री 10 PM IST

12:32 (IST) 1 Aug 2024
Paris Olympic 2024 Live : आज भारताला तीन पदकांची आशा

नेमबाज स्वप्नील कुसळी पुरुषाच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार.

आकाश दीप, विकास आणि परमजीत सिंह पुरुषांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेतील अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.

तर, महिलांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेत (अंतिम फेरी) प्रियांका गोस्वामी खेळणार.

India at Paris Olympic 2024 Highlights : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सहाव्या दिवशी म्हणजे आज भारताला तीन खेळात पदक मिळण्याची होती. मात्र, प्रत्यक्षात भारताला एकच पदक जिंकता आलं. नेमबाज स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकून दिले.