2024 Paris Olympic Day 7 Highlights: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा सातवा दिवस होता.आता ८ तारखेला भारताचं वेळापत्रक कसं असणार, जाणून घ्या. आज, भारताची स्टार नेमबाज मनू भाकेरने २५ मीटर पिस्तुलच्या पात्रता फेरीत दुसरे स्थान पटकावले आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. मनूला आता तिसरे पदक जिंकण्याची संधी आहे. मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी जोडीची कांस्यपदक जिंकण्याची संधी हुकली. धीरज-अंकिताची जोडी कांस्यपदकाच्या सामन्यात ६-२ ने पराभूत झाले.

भारतीय हॉकी संघाने गट फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना केला आणि इतिहास रचला. त्यांनी ५२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभव केला. पारुल चौधरी आणि अंकिता या भारतीय धावपटू पात्रता फेरीत मागे पडल्या. गोळाफेक स्पर्धेत देशाचा स्टार ॲथलीट तेजिंदरपाल सिंग तूर पात्रता फेरीत खेळत आहे. लक्ष्य सेनवर बॅडमिंटनमधील एका ऑलिम्पिक पदकाची आशा आहे आणि त्याने उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Live Updates

India at Paris Olympic 2024 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे सातव्या दिवसाचे हायलाईट्स

23:43 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: ३ ऑगस्टचं वेळापत्रक

नेमबाजी

महिला स्कीट पात्रता (दिवस १): रीझा ढिल्लोन आणि माहेश्वरी चौहान: दुपारी १२.३० वा.

महिला २५ मीटर पिस्तूल (अंतिम फेरी) : मनू भाकेर (दुपारी १ वा.)

तिरंदाजी

महिला (१/८ एलिमिनेशन): दीपिका कुमारी वि मिशेल क्रॉपेन (जर्मनी),

दुपारी १.५२ वाजता

महिला (1/8 एलिमिनेशन): भजन कौर विरुद्ध डायंडा कोइरुनिसा (इंडोनेशिया) दुपारी २.०५ वा.

नौकानयन

महिला डिंगी (शर्यत पाच): नेत्रा कुमनन – संध्याकाळी ५.५५

महिला डिंगी (शर्यत सहा): नेत्रा कुमनन – सायंकाळी ७.०३

पुरुषांची डिंगी (शर्यत पाच): विष्णू सरवणन – दुपारी ३.४५

पुरुषांची डिंगी (शर्यत सहा) : विष्णू सरवणन – दुपारी ४.५३

बॉक्सिंग

पुरुष (उपांत्यपूर्व फेरी): निशांत देव विरुद्ध मार्को वर्दे (मेक्सिको): दुपारी १२.१८

22:28 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: लक्ष्य सेनचा शानदार विजय

पहिला सेट गमावल्यानंतर लक्ष्य सेनने शानदार कमबॅक करते १५-२१ च्या फरकाने दुसरा सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्येही तीच लय कायम राखत लक्ष्यने १२-२१ च्या फरकाने तिसरा सेट जिंकत उपांत्य फेरी गाठत इतिहास रचला आहे.

22:04 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: लक्ष्य सेनने दुसरा सेट जिंकला

पहिला सेट अवघ्या काही गुणांनी गमावल्यानंतर लक्ष्य सेनने चांगला कमबॅक करत दुसरा सेट जिंकला आहे. लक्ष्यने १५-२१ अशा फरकाने दुसरा सेट जिंकला. आता या दोन्ही खेळाडूंमधील तिसरा सेट निर्णायक ठरणार आहे.

21:48 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: लक्ष्य सेनने पहिला गेम गमावला

ब्रेकनंतर लक्ष्य सेनने एक गुण मिळवला होता पण त्यानंतर १५-११ अशी आघाडी घेतली. लक्ष्यने येथे सलग सहा गुण मिळवून गुणसंख्या ११-१५ वरून १५-१५ वर नेली. मात्र, त्याने पहिला गेम २१-१९ अशा फऱकाने पहिला सेट गमावला.

21:11 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live:लक्ष्य सेन

लक्ष्य सेनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला सुरूवात झाली आहे. लक्ष्यचा सामना चायनिज ताईपेई सेनच्या विरोधात आहे. हा सामना जिंकल्यास लक्ष्य उपांत्य फेरीत पोहोचेल.

20:59 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: लक्ष्य सेन

बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेनचा सामना संध्याकाळी ६.३० ला होणार होता. पण आता हा सामना ९.०५ ला खेळवला जाणार आहे.

20:13 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारत पराभूत

तिरंदाजी मिश्र संघ स्पर्धेत भारताच्या धीरज-अंकिताने तिसरा सेट जिंकला पण पूर्वीचे दोन सेट गमावल्याने त्यांना फटका बसला होता. अखेरच्या सेटमध्ये ८,९,९,१० असे नेम साधत भारताने ३५ गुण मिळवले. तर अमेरिकेने १०,९,९,९ असे ३७ गुण मिळवत चौथ्या सेटमध्ये भारताचा पराभव केला. यासह त्यांनी ६-२ फरकाने सामना जिंकत कांस्य पदक जिंकले आहे.

20:06 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताने जिंकला तिसरा सेट

धीरज-अंकिताने दोन सेट गमावल्यानंतर चांगलं कमबॅक करत तिसरा सेट जिंकला आहे. धीरज-अंकिताने ९ आणि १० गुणांवर योग्य नेम साधत ३८ गुण मिळवले आणि तिसरा सेट जिंकला.

20:02 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताने सलग दुसरा सेट गमावला

अंकिता-धीरजच्या जोडीने २ गुणांनी सलग दुसरा सेट गमावला. अंकिता भकतच्या पहिल्याच निशाण्याने ७ गुण मिळाल्याचा भारताला फटका बसला आहे.

19:58 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: धीरज-अंकिताच्या सामन्याला सुरूवात

तिरंदाजी मिक्स्ड स्पर्धेत भारताचे धीरज आणि अंकिता कांस्यपदकाचा सामना अमेरिकाविरूद्ध खेळत आहेत. पहिला सेट भारताने ३७-३८ च्या फरकाने गमावला आहे.

19:22 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: तिरंदाजी जोडीचा सेमीफायनलमध्ये पराभव

तिरंदाजी मिश्र स्पर्धेत धीरज आणि अंकिताने पहिला सेट जिंकत चांगली सुरूवात केली पण कोरियाच्या जोडीने सलग तीन सेट जिंकत भारताचा उपांत्य फेरीत पराभव केला. चौथ्या सेटमध्ये भारताचे 37 गुण झाले तर कोरियाच्या खेळाडूने चांगला नेम साधत 38 गुणांसह सेट जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. पण भारताची जोडी कांस्य पदकाच्या फेरीत पोहोचली आहे. धीरज-अंकिताची जोडी तिरंदाजीमधील पहिलं पदक भारताला मिळवून देऊ शकेल का, यावर सर्वांच्या नजरा आहेत. ७.५४ मिनिटांनी धीरज आणि अंकिताची जोडी कांस्यपदकासाठी खेळणार आहे.

18:31 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: लक्ष्ये सेनचा सामना

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना आज होणार आहे. हा सामना रात्री ९.०५ ला होईल.

18:25 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: हॉकीमध्ये भारताचा विजय

हॉकीच्या अखेरच्या ग्रुप स्टेज सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३-२ अशा फरकाने शानदार विजय मिळवला. नॉकआऊटपूर्वी भारताचा हा विजय महत्त्वाचा असणार आहे. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने २ तर अभिषेकने १ गोल केला होता. भारतीय संघ या सामन्यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे.

18:07 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताचा तिरंदाजी संघ सेमीफायनलमध्ये

धीरज बोम्मादेवा आणि अंकिता भकत या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत तीन सेट जिंकत जबरदस्त विजय मिळवला. यासह भारताची ही जोडी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. पहिले दोन्ही सेट भारताने जिंकले. तिसरा सेट स्पेनच्या जोडीने जिंकला आणि तिसरा सेट धीरजच्या १० गुणांच्या नेमसह भारताने जिंकला.

17:55 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरूवात

तिरंदाजी मिश्र स्पर्धेत धीरज आणि अंकिताच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरूवात झाली आहे. भारत २-१ ने पुढे आहे.

17:50 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: तिसरा गोल

भारताला हाफ टाईमनंतर पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि कर्णधाराने त्याचा चांगलाच फायदा करून घेतला. हरमनने पुन्हा एकदा पेनल्टी स्ट्रोकवर तिसरा गोल केला आहे.

17:42 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारत आघाडीवर

भारत-ऑस्ट्रेलियाच्या हॉकीच्या अखेरच्या गट सामन्यात हाफ टाईमपर्यंत ऑस्ट्रेलियाने एक गोल आहे. पण हरमनप्रीत आणि अभिषेकच्या सुरूवातीच्या दोन गोलमुळे भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे.

17:21 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: हॉकीमध्ये भारत आघाडीवर

भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध हॉकी सामना सुरू आहे. सामन्याला सुरूवात होताच भारताकडून दणदणीत दोन गोल करण्यात आले आहेत.

17:08 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: मनू भाकेर तिसऱ्या फायनलमध्ये

मनू भाकेरने २५ मीटर एअर रायफल स्पर्धेतील अंतिम फेरीत तिने धडक मारली आहे. पहिल्या प्रिसीशन फेरीत मनू तिसऱ्या स्थानी होती. तर दुसऱ्या फेरीत म्हणजेच रॅपिड राऊंडमध्ये ती ५९० गुणांसह ती दुसऱ्या स्थानी राहिली असून फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारताचं नेमबाजीतील आता चौथं पदक निश्चित झालं आहे. तर मनूने सलग तिसऱ्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठत हॅटट्रिक केली आहे. मनूची ही अंतिम फेरी उद्या दुपारी १ वाजता होणार आहे.

16:55 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: मनू भाकेर दुसऱ्या स्थानी

२५ मीटर एअर पिस्तुल स्पर्धेतील रॅपिड राऊंड स्पर्धेत मनू भाकेर पहिल्याच सीरिजमध्ये १०० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

16:27 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताचा हॉकी सामना

आज भारताचा ग्रुप स्टेजमधील अखेरचा हॉकी सामना होणार आहे. अखेरच्या सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना दिसणार आहे, जो संध्याकाळी ४.४५ वाजता सुरू होईल.

16:22 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: गोळाफेक

भारतीय गोळाफेक ॲथलीट तेजिंदरपाल सिंग तूर आज २२ मीटर गोळाफेक करण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. त्याने फेडरेशन कपमध्ये २०.३८ मीटरसह सुवर्णपदक जिंकले. तेजिंदरपाल सिंग यांचा सामना आज रात्री ११.४० वाजता असणार आहे.

15:55 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: ईशा सिंग १५व्या स्थानी

ईशा सिंगने २५ मी एअर रायफलच्या दुसऱ्या फेरीत रॅपिड फायरमध्ये सर्व शॉट्सच्या सीरिजनंतर १५ व्या स्थानी राहिली आहे. पात्र होण्यासाठी तिला पहिल्या ८मध्ये असणं गरजेचं होतं.मनू भाकेर तिच्या फेरीला सुरूवात करेल.

15:31 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: ज्युडोमध्ये भारताच्या पदरी निराशा

ज्युडोमध्ये भारताची निराशा झाली आहे. तुलिका मान ७८ किलो वजनी गटात पराभूत झाली आहे. तिला क्युबाच्या इडालिस ऑर्टिजकडून पराभव पत्करावा लागला.

15:11 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: ३.३० वाजता पुन्हा अॅक्शनमध्ये दिसणार मनू आणि ईशा सिंग

14:48 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: मनू भाकेर तिसऱ्या स्थानी

मनू भाकेर प्रीसिशन फेरीतील तिसऱ्या सीरिजनंतर ७ वरून ३ऱ्या स्थानी पोहोचली आहे तर ईशा सिंग दहाव्या स्थानी आहे. पहिली फेरी पूर्ण झाली असून आता रॅपिड राऊंड फेरीला सुरूवात होत आहे.

14:34 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: मनू भाकेर सातव्या स्थानी

मनू भाकेर दुसऱ्या सीरिजनंतर सातव्या स्थानी आहे. तर ईशा सिंग प्रीसिशन फेरीनंतर १०व्या स्थानी आहे. अजून रॅपिड राऊंड फेरी शिल्लक आहे. या दोन्ही फेरीनंतर टॉप-८ खेळाडू पुढील फेरीसाठी पात्र ठरतील.

14:21 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: अंकिता-धीरज स्पेनविरूद्ध खेळणार

तिरंदाजी मिश्र सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्पेनने चीनचा ६-२ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा सामना भारताशी होणार आहे. भारताची तिरंदाजी जोडी अंकिता भकत-धीरज बोम्मादेवरा उपांत्यपूर्व फेरीत खेळताना दिसणार आहे.

14:18 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: मनू भाकेर १२व्या स्थानी

मनू भाकेरने पहिल्या सीरीजमध्ये ९७ गुण मिळवले आहेत. यासह ती सध्या १२व्या स्थानावर आहे. तिच्या आणखी दोन सीरिज शिल्लक आहेत.

13:41 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: नेमबाजी पुरूष स्किट

नेमबाजीच्या मेन्स स्किट स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताचा अनंतजीत सिंग खेळत आहे. या फेरीच्या पहिल्या राऊंडनंतर २०व्या स्थानी आहे.

India at Olympic Games Paris 2024 Highlights 02 August 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या सातव्या दिवशी भारताला एक पदक जिंकण्याची संधी गमावली. पण ३ ऑगस्टला मनू भाकेर भारताला आणखी पदक मिळवून देऊ शकते..