2024 Paris Olympic Day 7 Highlights: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा सातवा दिवस होता.आता ८ तारखेला भारताचं वेळापत्रक कसं असणार, जाणून घ्या. आज, भारताची स्टार नेमबाज मनू भाकेरने २५ मीटर पिस्तुलच्या पात्रता फेरीत दुसरे स्थान पटकावले आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. मनूला आता तिसरे पदक जिंकण्याची संधी आहे. मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी जोडीची कांस्यपदक जिंकण्याची संधी हुकली. धीरज-अंकिताची जोडी कांस्यपदकाच्या सामन्यात ६-२ ने पराभूत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय हॉकी संघाने गट फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना केला आणि इतिहास रचला. त्यांनी ५२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभव केला. पारुल चौधरी आणि अंकिता या भारतीय धावपटू पात्रता फेरीत मागे पडल्या. गोळाफेक स्पर्धेत देशाचा स्टार ॲथलीट तेजिंदरपाल सिंग तूर पात्रता फेरीत खेळत आहे. लक्ष्य सेनवर बॅडमिंटनमधील एका ऑलिम्पिक पदकाची आशा आहे आणि त्याने उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Live Updates

India at Paris Olympic 2024 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे सातव्या दिवसाचे हायलाईट्स

13:34 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: तिरंदाजी मिक्स्डमध्ये भारतीय जोडीचा विजय

तिरंदाजी मिक्स्डमधील राऊंड ऑफ १६ मध्ये धीरज आणि अंकिताच्या जोडीने ५-१ अशा गुणफरकाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ही भारतीय जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. उपांत्यपूर्व फेरीत धीरज आणि अंकिता स्पेन किंवा चीनच्या जोडीविरूद्ध खेळणार आहेत, ही फेरी संध्याकाळी ५.४५ वाजता होईल.

13:30 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: तिरंदाजी मिक्स्डमध्ये दुसऱ्या सेटनंतर भारत आघाडीवर

13:25 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: तिरंदाजी मिक्स्ड स्पर्धेला सुरूवात

तिरंदाजी मिक्स्ड स्पर्धेत भारताकडून अंकिता भकत आणि धीरज बोम्मादेवरा ही जोडी उतरली आहे. या स्पर्धेत पहिल्या सेटनंतर भारताचे गुण ३७ आहेत.

13:19 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: ईशा सिंगचा परफेक्ट नेम

ईशा सिंगने 25 मी एअर पिस्तुल स्पर्धेत तिसऱ्या सीरिजनंतर १३व्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी मोठी झेप घेतली आहे.

13:00 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: ईशा सिंगची खराब सुरूवात

ईशा सिंगने दुसऱ्या शॉट्सच्या सीरीजनंतर १३वे स्थान पटकावले. पहिल्या १० शॉट्सनंतर तिने ९३ गुण मिळवले होते.

12:42 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: मनू भाकेर आणि ईशा सिंगच्या स्पर्धेला सुरूवात

मनू भाकेर आणि ईशा सिंग यांच्या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. हे दोन्ही खेळाडू २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत आहेत. या फेरीचे दोन टप्पे असतील. पहिला टप्पा प्रीसिशन आणि दुसरा रॅपिड राऊंड असेल.

12:41 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: तिरंदाज

तिरंदाजीमध्ये भारताच्या अंकिता भकत आणि धीरज बोम्मादेवरा यांची मिश्र सांघिक स्पर्धा होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना इंडोनेशियाच्या जोडीशी होईल. भारतीय तिरंदाजांना शेवटची संधी आहे

12:40 (IST) 2 Aug 2024
Paris Olympic 2024 Live live: मनू भाकेर

भारताचे दोन नेमबाज आज नेमबाजीत उतरणार आहेत. मनू भाकेर आणि ईशा सिंग २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत दिसणार आहेत. भाकेरला तिसरे पदक जिंकण्याची संधी आहे. ही स्पर्धा दुपारी १२:३० वाजता आणि रॅफिड राऊंड ३:३० वाजता होईल.

India at Olympic Games Paris 2024 Highlights 02 August 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या सातव्या दिवशी भारताला एक पदक जिंकण्याची संधी गमावली. पण ३ ऑगस्टला मनू भाकेर भारताला आणखी पदक मिळवून देऊ शकते..