2024 Paris Olympic Day 7 Highlights: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा सातवा दिवस होता.आता ८ तारखेला भारताचं वेळापत्रक कसं असणार, जाणून घ्या. आज, भारताची स्टार नेमबाज मनू भाकेरने २५ मीटर पिस्तुलच्या पात्रता फेरीत दुसरे स्थान पटकावले आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. मनूला आता तिसरे पदक जिंकण्याची संधी आहे. मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी जोडीची कांस्यपदक जिंकण्याची संधी हुकली. धीरज-अंकिताची जोडी कांस्यपदकाच्या सामन्यात ६-२ ने पराभूत झाले. भारतीय हॉकी संघाने गट फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना केला आणि इतिहास रचला. त्यांनी ५२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभव केला. पारुल चौधरी आणि अंकिता या भारतीय धावपटू पात्रता फेरीत मागे पडल्या. गोळाफेक स्पर्धेत देशाचा स्टार ॲथलीट तेजिंदरपाल सिंग तूर पात्रता फेरीत खेळत आहे. लक्ष्य सेनवर बॅडमिंटनमधील एका ऑलिम्पिक पदकाची आशा आहे आणि त्याने उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.