2024 Paris Olympic Day 9 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आज नववा दिवस होता. भारताने आजच्या दिवशी दोन पदकं निश्चित केली आहेत. भारतीय हॉकी संघाने भारतीयांसाठी रविवारचा दिवस सुपर संडे बनवला आहे. भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा शूटआऊट सामन्यात रोमहर्षक पराभव केला. भारताला १० खेळाडूंसह तीन क्वार्टर सामना खेळावा लागला. शूटआऊटमध्ये भारताने हा सामना ४-२ असा जिंकला आणि उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

भारतीय बॉक्सर लवलिना बोरगोहेनला पदक निश्चित करण्याची संधी होती पण ती हुकली. ७४ किलो वजनी गटात लवलिनाला चीनच्या अव्वल मानांकित कियान हिच्याकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकण्याची लवलिनाची संधी हुकली. लक्ष्य सेनलाही उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नाही. त्याचा सामना डेन्मार्कच्या व्हिक्टरशी होता. व्हिक्टर हा सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. व्हिक्टरने लक्ष्यचा २२-२०, २१-१४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

Live Updates

India at Paris Olympic 2024 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक२०२४ भारताचे ५ ऑगस्टचे वेळापत्रक

22:16 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: ५ ऑगस्टचं भारताच वेळापत्रक

१२.३० वा

नेमबाजी - मिक्स्ड स्किट टीम

अनंतजीत सिंग, महेश्वरी चौहान

१.३० वा - टेबल टेनिस महिला ग्रुप मॅच

भारत वि रोमानिया

३.२५ वा - महिला ४०० मी राऊंड पहिला

किरन पहल

३.४५ वा - सेलिंग महिला

नेत्रा कुमारन

६.३१० वा. बॅडमिंटन कांस्य पदक सामना

लक्ष्य सेन

३.४५ वा - सेलिंग पुरूष

विष्णु सरावनन

६.३० - महिला ६८ किलो वजनी गट कुस्ती

निशा दहिया (राऊंड ऑफ १६)

रात्री १०.३४ - पुरूष ३००० मी. अडथळा शर्यत पहिला राऊंड

अविनाश साबळे

20:38 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: नोवाक जोकोविचचा विजय

नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या सुवर्णपदक सामन्यात कार्लोस अल्काराजचा २-० ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे. कार्लोस अल्काराजने विम्ब्लडनमध्ये केलेल्या पराभवाचा बदला घेत सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

19:41 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: टेनिसमध्ये सुवर्णपदकाचा सामना

टेनिसमध्ये कार्लोस अल्काराज आणि नोवाक जोकोविच यांच्यात टेनिसमध्ये सुवर्णपदकासाठी सामना सुरू आहे. विम्बल्डनच्या अंतिम फेरीतही हे दोघे आमनेसामने होते. सध्या स्कोअर २-२ असा बरोबरीत असून अटीतटीचा सामना सुरू आहे. अल्काराझ सध्या ४-५ ने पुढे असून दोन्ही खेळाडू एकमेकांनी चांगली लढत देत आहेत.

19:13 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: गतविजेता बेल्जियम ऑलिम्पिकबाहेर

हॉकीमध्ये मोठा अपसेट. स्पेनने बेल्जियमचा ३-२ असा पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, आता हा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही.

https://twitter.com/vinayakkm/status/1820069365049356383

19:11 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताच्या नेमबाजीतील अखेरच्या पदकाच्या आशा संपुष्टात

भारताचे पिस्तूल नेमबाज विजयवीर सिद्धू आणि अनिश भानवाल हे दोघेही २५ मीटर रॅपिड फायर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकले नाहीत. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी चांगली सुरुवात केली होती पण शेवटच्या मालिकेत ते टॉप-२ मधून ८ स्कोअरसह नवव्या स्थानावर गेले. अनिशने ९३ गुण मिळवले आणि ५८३ गुणांसह १३वे स्थान पटकावले.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1820091004550042108

18:04 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: महिलांच्या स्कीट स्पर्धेत भारताच्या आशा संपुष्टात

महिलांच्या स्कीट स्पर्धेत भारताच्या आशा संपुष्टात आल्या. शेवटच्या फेरीत महेश्वरी आणि राईजा दोघीही मागे पडल्या. महेश्वरीने १४ व्या स्थानी तर राईजा ढिल्लोन २३व्या स्थानी राहिली.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1820066391703048628

17:22 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: व्हिक्टरचं लक्ष्य सेनवर मोठं वक्तव्य

व्हिक्टर एक्सएलसेनने भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनविरूद्धच्या पराभवानंतर त्याच्या कामगिरी पाहता मोठं वक्तव्य केलं आहे. व्हिक्टर म्हणाला, "पुढील ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार लक्ष्य सेन असेल."

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1820054852766204395

16:31 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: लक्ष्य खेळणार कांस्यपदक सामना

लक्ष्य सेनने पहिला सेट २०-२२ च्या फरकाने गमावला, तर दुसरा सेट १४-२१ च्या फरकाने गमावला. लक्ष्यने सामना गमावला असला तरी त्याने वर्ल्ड नंबर-२ व्हिक्टरला तगडी टक्कर दिली आहे. व्हिक्टरसाठी हा विजय अजिबाताचं सोपा नव्हता. लक्ष्यने त्याला सामन्यात वेळोवेळी टक्कर दिली. या पराभवानंतर आता लक्ष्य सेन कांस्यपदकाचा सामना खेळणार आहे. लक्ष्यकडून भारताला पदकाच्या आशा कायम आहेत.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1820051203335835782

16:17 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: लक्ष्यची तगडी टक्कर

लक्ष्य सेनने पहिला सेट २०-२२ ने गमावल्यानंतर आता दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यने आघाडी मिळवली. सुरूवातीला लक्ष्य ७-०ने आघाडीवर होता. लक्ष्यने ११-१० च्या फरकाने सुरूवात केली आहे. दोन्ही खेळाडू अटीतटीची लढत देत आहेत.

16:04 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: लक्ष्यने गमावला पहिला सेट

उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना गत ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेनशी होणार आहे. पहिला गेम २०-२० असा बरोबरीत होता. यानंतर व्हिक्टरने सलग दोन गुण मिळवत गेम जिंकला.

15:46 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: लव्हलिना बोरगेहन

लोव्हलिना बोर्गोहेनला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या अव्वल मानांकित कियान लीकडून ४-१ असा पराभव पत्करावा लागला. बोरगोहेनने हा सामना जिंकला असता तर तिचे पदक निश्चित झाले असते.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1820034996167655878

15:33 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: लक्ष्य सेनच्या सेमीफायनलला सुरूवात

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन पुरूष एकेरीचा उपांत्य सामना खेळत आहे. त्याच्या सामन्याला सुरूवात झाली आहे. लक्ष्यचा सामना डेन्मार्कचा खेळाडू वर्ल्ड नंबर २ व्हिक्टर एक्सलसेनविरूद्ध खेळत आहे. सामन्याचा सुरूवातीचा स्कोअर भारत १- डेन्मार्क ४ आहे.

15:18 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारतीय संघ सेमीफायनल

टोकियो ऑलिम्पिकनंतर भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारताने १० खेळाडूंसह शेवटपर्यंत डिफेन्स करत सामना १-१ असा बरोबरीत राखला. भारताच्या श्रीजेशने कमालीची गोलकिपिंग केली आहे. ब्रिटनचे अनेक गोल श्रीजेशने रोखले आहेत. शूटआऊटमध्ये भारताने सलग चार गोल केले. तर ब्रिटनचे २ गोल रोखत थेट सेमीफायनल गाठली.

भारताला सामन्याच्या सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. भारताचा खेळाडू अमित रोहिदासला रेड कार्ड देण्यात आले. त्यामुळे तो संपूर्ण सामन्यासाठी मैदानाबाहेर झाला. भारताने संपूर्ण सामना १० खेळाडूंसह खेळला. रेड कार्डनंतर भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनने शानदार गोल केला. यानंतर ब्रिटनने गोल करत सामना बरोबरीत आणला. भारताने एक खेळाडू कमी असूनही कमालीचा डिफेन्स दाखवला. गोलकिपर श्रीजेशच्या गोलकिपिंगने सर्वांनाच चकित केलं. शेवटपर्यंत सामना १-१ राहिला आणि शूटआऊटमध्येही श्रीजेशने २ गोल वाचवत भारताला मोठा दिलासा दिला. तर भारताच्या खेळाडूंनीही सलग चार गोल करत सेमीफायनल गाठली.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1820033888565055648

15:09 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: शूटआऊटमध्ये स्कोअर ३-२

शूटआऊटमध्ये दोन्ही संघांनी १-१ गोल केला आहे. दोन्ही संघाने दुसरा गोल केला. कर तिसऱ्या शूटआऊटमध्ये भारताने गोल केला तर ब्रिटनचा गोल चुकला. यासह भारत ३-२ने पुढे आहे.

15:07 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: श्रीजेशची करिष्माई गोलकीपिंग

श्रीजेश भारतासाठी गोलकीपिंगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. चौथ्या क्वार्टरच्या ११व्या मिनिटाला ब्रिटनकडून जोरदार हल्ला झाला. पण चेंडू भारतीय गोलरक्षक श्रीजेशच्या पुढे जाऊ शकला नाही. ५८ मिनिटांचा खेळ संपल्यानंतरही स्कोअर १-१ असा बरोबरीत आहे.

14:53 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकही गोल नाही

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारत किंवा ब्रिटन या दोघांनाही गोल करता आला नाही. स्कोअर अद्याप १-१ असा बरोबरीत आहे. या क्वार्टरमध्ये ब्रिटनला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले.

14:49 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: ग्रीन कार्ड

भारताच्या सुनीलला पंचांनी शिट्टी दिल्यानंतरही बॉलला मारल्याने ग्रीन कार्ड दिले होते. ग्रीन कार्ड म्हणजे खेळाडू दोन मिनिटे सामन्याबाहेर असतो. अखेरचा १५ मिनिटांचा खेळ बाकी आहे.

14:39 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: श्रीजेशने पेनल्टी कॉर्नर वाचवला

३६व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनला पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारताच्या गोलकिपर श्रीजेशने संपूर्ण सामन्यात जबरदस्त कामगिरी करत अनेक गोल अडवले आहेत, हा गोलही श्रीजेशने दोनदा अडवला. भारतासाठी १० खेळाडूंसह खेळणे कठीण होत आहे. संघ फक्त १० खेळाडूंसह खेळत आहे.

14:37 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: पारूल चौधरी थोडक्यासाठी मागे राहिली

भारताच्या पारुल चौधरीने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये ९:२३.३९ अशी वेळ नोंदवली आणि ती ८व्या स्थानावर राहिली. पारुल थोडक्यासाठी पात्र ठरू शकली नाही.

14:30 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: महिला बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरीन सेमीफायनलमधून बाहेर

स्पॅनिश बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरीन बॅडमिंटन सिंगल्सचा सेमीफायनल सामना खेळतानाच गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला रिटायर्ड व्हावं लागलं. दुखापतीमुळे कॅरोलिना कोर्टमध्येच झोपून कळवळत रडताना दिसली. या दुखापतीमुळे तिला सामना सोडावा लागला आणि स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

https://twitter.com/BadmintonTalk/status/1820014608037650937

14:24 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: नेमबाजांची शानदार कामगिरी

नेमबाजीमध्ये 25 मी रॅपिड फायर पिस्तूलमध्ये भारताच्या अनिश भनवाला आणि विजयवीर सिद्धू यांनी चांगली कामगिरी केली. या दोघांनी पहिल्या फेरीत अनुक्रमे चौथ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. पहिले 6 नेमबाजी अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1820017644373725274

14:16 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: ग्रेट ब्रिटनने साधली बरोबरी

भारताच्या गोलनंतर ग्रेट ब्रिटननेही दुसरा हाफ संपेपर्यंत एक गोल केला. अशारितीने दोन्ही संघ आता 1-1 अशा बरोबरीत आहेत. अजून दोन हाफ शिल्लक आहेत.

14:13 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताने रेड कार्डचं उत्तर गोलने दिलं

भारताच्या हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. यासह पेनल्टी कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा हरमनने आपली कामगिरी चोख बजावली आहे. अशारितीने भारताने अमितला मिळालेल्या रेड कार्डचं उत्तर गोलने दिलं आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1820015307076800988

14:06 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताला रेड कार्ड

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या भारत हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताचा खेळाडू अमित रोहिदासला रेड कार्ड देण्यात आले. रनिंगमध्ये असताना त्याची हॉकी स्टीक ब्रिटनच्या खेळाडूच्या चेहऱ्याला लागली, पंचांच्या मते त्याने जाणूनबुजून स्टीक मारल्याने त्याला रेड कार्ड देण्यात आले. या रेड कार्डचा अर्थ अमित रोहिदास आता संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही आणि भारताला गोलकिपरसह फक्त 10 खेळाडूंसह खेळावे लागणार आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1820014173465563142

14:01 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताला गोल करता आले नाही

पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटात भारताला एकापाठोपाठ एक असे तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारताला त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. पण ग्रेट ब्रिटनला तीन पेनल्टी कॉर्नरही मिळाले पण भारताने त्यांनाही एक गोल करू दिला नाही. श्रीजेशने चांगली कामगिरी करत गोल अडवले.

13:30 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताचा हॉकी सामना

भारताच्या उपांत्यपूर्व फेरीच्या हॉकी सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताचा सामना ग्रेट ब्रिटनशी होणार आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास भारताचं अजून एक पदक निश्चित होऊ शकतं. कर्णधार हरमनप्रीत सिंग, अभिषेक यांच्यावर नजरा असतील.

13:03 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: विजयवीर सिद्धूची चांगली सुरूलाच

भारताचा पिस्तूल नेमबाज विजयवीर सिद्धूने २५ मीटर रॅपिड एअर पिस्तूलच्या पात्रता फेरीतील पहिल्या फेरीत चांगला नेम साधत तिसरे स्थान मिळवले आहे. पहिले ६ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. भारताचा दुसरा नेमबाज अनिश भानवाल त्याच्या फेरीला सुरूवात करणार आहे.

https://twitter.com/sportwalkmedia/status/1819995286741114985

12:40 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारताच्या नेमबाजी स्पर्धेला सुरूवात

भारताचे पिस्तूल नेमबाज अनिश भानवाल आणि विजयवीर सिद्धू २५ मीटर रॅपिड एअर पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत सहभागी झाले आहेत. पहिल्या सीरिजनंतर विजयवीर सिद्धू सहाव्या स्थानी आहे.

12:38 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: महिला बॉक्सर

भारताची बॉक्सर लव्हलिना बोरगोहन आज उपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळणार आहे. लव्हलिनाचा सामना चीनच्या लि क्वियानविरूद्ध होणार आहे.

12:35 (IST) 4 Aug 2024
Paris Olympic 2024 Live: भारत हॉकी संघ

भारतीय हॉकी संघ आज उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना ग्रेट ब्रिटनशी होणार आहे. हा सामना जिंकून भारत पदकाची निश्चिती करेल.

Paris Olympics 2024 India 5 Aug Schedule: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या दहाव्या दिवशी भारताचं वेळापत्रक कसं असणार जाणून घ्या

Story img Loader