Olympic 2024 Satwik-Chirag Advance to Quarter Finals: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारताच्या स्टार बॅडमिंटन जोडीसाठी आनंदाची बातमी आली आहे. २९ जुलैला म्हणजे आज होणारा पुरुष दुहेरीतील सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा दुसरा सामना रद्द करण्यात आला होता. मार्विन सीडेल आणि मार्क लॅम्सफूस या जर्मन जोडीने दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यामुळे हा सामना रद्द झाला होता. याचा आता भारतीय जोडीला आता मोठा फायदा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 3: तिरंदाजीत भारताच्या पदरी निराशा, पुरूष संघ क्वार्टर फायनलमधून बाहेर

पहिल्या सामन्यात सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीने यजमान फ्रेंच जोडी कॉर्वी लुकास आणि लेबर रोनन यांच्यावर २१-१७, २१-१४ असा विजय मिळवला होता. त्याचवेळी, आता फ्रान्सच्या कोर्वी लुकास आणि लेबर रोनन या जोडीलाही इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांतो यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे सात्विक आणि चिराग ही जोडी त्यांच्या गटातील टॉप-२ मध्ये येण्याची खात्री आहे.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal: फक्त १३ सामने खेळत यशस्वी जैस्वालने केला मोठा विक्रम, ही कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

सात्विक आणि चिराग ही जोडी ग्रुप स्टेजचा शेवट टॉप-२ म्हणून करणार आहे. त्यामुळे या जोडीने आता थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यासह सात्विक आणि चिराग ही ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली भारतीय बॅडमिंटन जोडी ठरली आहे. बॅडमिंटनमध्ये भारतासाठी ही मोठी कामगिरी आहे.

हेही वाचा – Paris Olympics: बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा जिंकलेला सामना ग्राह्य धरला जाणार नाही, BWF ने का घेतला असा निर्णय?

जर्मनीचा खेळाडू मार्क लॅम्सफसने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा पुरुष दुहेरीतील क गटातील सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय जोडी सोमवारी लॅम्सफस आणि मार्विन सीडेल या जर्मन जोडीविरुद्ध सामना खेळणार होती. जर्मन पुरुष दुहेरी खेळाडू मार्क लॅम्सफसने गुडघ्याच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे, असे BWF ने म्हटले आहे.

भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा पुढील सामना इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांतो यांच्याशी ३० जुलै रोजी होणार आहे. या सामन्यात त्यांनी इंडोनेशियाच्या जोडीला पराभूत केले तर भारतीय जोडी गटात अव्वल स्थानावर पोहोचेल. सात्विक – चिरागचा हा सामना ३० जुलै रोजी सायंकाळी ०५.३० वाजता होणार आहे. त्यांच्या नजरा विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठण्यावर असतील. ही बॅडमिंटन जोडी पदकाची सर्वात मोठी दावेदारही आहे. भारताला या जोडीकडून पदकाच्या खूप अपेक्षा आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris olympic 2024 satwik sairaj rankireddy chirag shetty became the first doubles pair from india to advance to the quarter finals in the olympics bdg