Paris Olympics Opening Ceremony: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ऑलिम्पिक २०२४ चे आजयोजन करण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हे शहर संपूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे. पॅरिसमध्ये तिसऱ्यांदा या खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. याआधी १९०० आणि १९२४ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन झाले होते. यंदाच्या ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये नसून पहिल्यांदाच नदीवर होणार आहे. पॅरिस शहरातून वाहणाऱ्या सेन नदीवर हा सोहळा होणार आहे.

हेही वाचा – Olympics 2024 Schedule: भारताचं संपूर्ण वेळापत्रक, तारीख वेळेसहित कधी होणार हॉकी आणि बॅडमिंटनसहित सर्व खेळांचे सामने?

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

ऑलिम्पिक २०२४ तब्बल १० हजार खेळाडू सहभागी होणार असून त्यातील काही खेळाडू उद्घाटन समारंभाचा भाग असणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडू बोटीतून परेड करतील. ही परेड सहा किमी इतकी लांब असेल जी सेन नदीवर होईल. ही परेड ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून सुरू होईल आणि शहराच्या मध्यभागी जाऊन आयफेल टॉवरपर्यंत पोहोचेल. सुमारे ९४ बोटी या परेडचा भाग असतील.

हेही वाचा – Olympic 2024: हॉटस्टार, फॅनकोड नाही तर… भारतात ‘या’ अ‍ॅपवर फ्री पाहता येणार ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने, जाणून घ्या सविस्तर

Paris Olympic उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रांच्या परेडमध्ये क्रम कसा ठरवला जातो?

ऑलिम्पिकमधील उद्घाटन समारंभासाठी देशांचा क्रम यजमान देशाच्या राष्ट्रीय भाषेच्या अक्षरानुक्रमे ठरवला जातो. त्यामुळे चायनीज तैपेई ताझिकिस्तान आणि टांझानिया यांच्यामध्ये १८०वा देश म्हणून मार्चपास्ट करतील.

Paris Olympic उद्घाटन समारंभात राष्ट्रांच्या परेडमध्ये भारत कितव्या क्रमांकावर येईल?


पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात परेड ऑफ नेशन्समध्ये भारत ८४व्या क्रमांकावर येईल.

हेही वाचा – Paris Olympic 2024 च्या पदकांचं आयफेल टॉवरशी खास कनेक्शन, ‘अशी’ तयार केली यंदाची पदकं

Olympic उद्घाटन समारंभात मार्चपास्टचा समावेश कधी करण्यात आला?


उद्घाटन समारंभातील मार्चपास्टला सुरूवात लॉस एंजेलिसमधील १९०८ च्या ऑलिम्पिकमध्ये झाला.

Olympic मार्चपास्टमध्ये कोणता देश पहिला येईल?

उद्घाटन समारंभाच्या मार्चपास्टमध्ये ग्रीसचे खेळाडू कायम प्रथम असतात. ऑलिम्पिक खेळांना १८९६ मध्ये अथेन्स, ग्रीस येथे सुरूवात झाली. हा देश ऑलिम्पिक खेळांचे जन्मस्थान मानला जातो. यासाठी ग्रीसचे खेळाडू आधी मार्चपास्ट करतात. या वर्षी ग्रीसचा ध्वजवाहक रेस वॉकर अँटिगोनी दृष्टीबिओटी असेल.

हेही वाचा – Olympics 2024: ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या

उद्घाटन समारंभाच्या मार्चपास्टमध्ये कोणता देश सर्वात शेवटी असेल?

उद्घाटन समारंभासाठी यजमान देश मार्चपास्टच्या शेवटी असतो. यावेळी फ्रान्सचे खेळाडू मार्चपास्टमध्ये सर्वात शेवटी असतील. फ्रान्सच्या आधी पुढच्या ऑलिम्पिकचे म्हणजे २०२८ चे यजमानपद मिळवलेला देश म्हणजे अमेरिका असेल.