Paris Olympics PM Narendra Modi Calls Manu Bhaker: नेमबाज मनू भाकेर हिने भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पहिलं पदक पटकावलं. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारी मनू पहिली महिला खेळाडू ठरली. तिच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनू भाकेर हिच्याशी बोलून तिचे अभिनंदन केले. मनू भाकेर पंतप्रधानांशी बोलतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तुलातील खराबीमुळे ती स्पर्धेतून बाहेर झाली होती, याचा उल्लेखही त्यांनी केला.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live Updates: एच एस प्रणॉयचा पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय, भारताच्या बॅडमिंटनपटूंची शानदार सुरूवात

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

पंतप्रधान भाकेरला म्हणाले, थोडक्यासाठी तुझं रौप्यपदक हुकलं, पण देशासाठी कांस्यपदक जिंकत भारताचं नाव मोठं केलंस. त्यामुळे दोन प्रकारे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रथम, तू कांस्यपदक जिंकले आणि दुसरं भारतासाठी ही कामगिरी करणारी तू पहिली महिला नेमबाज आहेस. हे ऐकून मनू भाकेर हसायला लागली आणि धन्यवाद म्हणाली.

हेही वाचा – Manu Bhaker: ‘भगवद्गीता आणि अर्जुन…’, फायनलमध्ये मनू भाकेरच्या मनात नेमकं काय चाललं होतं? कांस्य पदक जिंकल्यानंतर म्हणाली…

पंतप्रधान मोदींनी ऑलिम्पिकसाठी गेलेल्या खेळाडूंची केली विचारपूस

याशिवाय, पंतप्रधान म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये पिस्तुलाने विश्वासघात केला होता, परंतु यावेळी तिने त्याची भरपाई केली. पॅरिसमध्ये तुम्हा सर्वांना पूर्ण सुविधा मिळतील याची आम्ही काळजी घेतली आहे, असेही ते म्हणाले. तुमचे इतर सहकारी कसे आहेत, सर्वजण आनंदी असतील, अशी खात्री आहे. यानंतर पंतप्रधानांनी असेही विचारले की तुझ्या वडिलांशी पदक मिळाल्यानंतर बोलणं झालं का? यावर मनू म्हणाली की अजून नाही झालं पण आई-वडिला खुश आहेत आणि माझा भाऊ पण. मनू म्हणाली की अजून सामने बाकी आहेत, त्यातही अशीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. त्यावर पीएम म्हणाले की, तुम्ही त्यातही चांगली कामगिरी कराल, असा मला विश्वास आहे आणि या पदकापासून प्रेरणा मिळेल.

हेही वाचा – Paris Olympics: मनू भाकेरच्या कामगिरीने सचिन तेंडुलकरही झाला प्रभावित, टोकियो ऑलिम्पिकमध्ये घडलेला प्रसंग आठवत पाहा काय म्हणाला?

मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत उत्कृष्ट लक्ष्याचा वेध घेत कांस्यपदक जिंकले. अघदी ०.१ गुणासाठी मनूचे रौप्यपजक हुकले. मनूने २२१.७ गुण मिळवत कांस्यपदक जिंकले. तर कोरियाच्या नेमबाजांनी रौप्य आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. मनू भाकेर आत ग्रुप सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. २९ जुलै रोजी मनू सरबजोत सिंगसह पात्रता फेरीत खेळताना दिसणार आहे.