Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये २४ जुलैपासून फुटबॉल आणि रग्बी सेव्हन्सचे सामने सुरू झालेत. अर्जेंटिना आणि मोरोक्को यांच्यात Paris Olympics 2024 मधील सामना सुरु होताच वादाच्या भोवऱ्यात, अर्जेंटिना विरुद्ध मोरोक्को सामन्यात प्रचंड गोंधळ, मेस्सीची प्रतिक्रिया व्हायरल) खेळल्या गेलेल्या फुटबॉल सामन्यातही वाद झाला आणि चाहत्यांनीही मोठा गोंधळ घातला. अर्जेंटिनाच्या संघाला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, ज्यात मोरोक्कोने त्यांचा २-१ असा पराभव केला. उभय संघांमधील हा सामना सेंट-एटीन येथील जेफ्री गुइचार्ड स्टेडियमवर खेळवला गेला, ज्यामध्ये एके काळी मोरक्कन संघ २-० ने आघाडीवर होता. यानंतर अर्जेंटिनाच्या संघाकडून क्रिस्टियन मेडिनाने दोन गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला. मात्र इथूनच स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या मोरक्कन चाहत्यांमध्ये प्रचंड गोंधळ सुरू झाला.
Paris Olympics 2024: चाहत्यांनी अर्जेंटिना खेळाडूंवर फेकल्या बाटल्या
लिओनेल मेस्सीशिवाय ऑलिम्पिक २०२४ मध्ये खेळत असलेल्या अर्जेंटिना संघ २-२ असा बरोबरीत असताना स्टँडमध्ये बसलेल्या मोरक्कन संघाच्या प्रेक्षकांनी अचानक मैदानावर बाटल्या फेकण्यास सुरुवात केली, ज्यात त्यांनी अर्जेंटिनाच्या खेळाडूंना लक्ष्य केले होते. यावेळी काही प्रेक्षकही मैदानावर आले होते, त्यांना पोलिसांनी मैदानाबाहेर फेकले आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंनाही सुरक्षा पुरवावी लागली. शेवटी, संपूर्ण स्टेडियम रिकामे केल्यानंतर सामना प्रेक्षकांविना पूर्ण झाला. त्याचवेळी मॅच रेफरीने अर्जेंटिनाचा दुसरा गोलही रद्द केला, त्यामुळे मोरक्कन संघ हा सामना २-१ असा जिंकू शकला.
हेही वाचा – Paris Olympic 2024 च्या पदकांचं आयफेल टॉवरशी खास कनेक्शन, ‘अशी’ तयार केली यंदाची पदकं
पॅरिस २०२४ ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाइटनुसार, अर्जेंटिनाचा खेळाडू क्रिस्टियन मेडिनाने इंजरी टाईममध्ये केलेला गोल ऑफसाइड घोषित केल्यानंतर रेफ्रींनी रद्द केला. त्याचवेळी, या सामन्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडू आणि चाहत्यांचा रागही पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये अनुभवी खेळाडू लिओनेल मेस्सीने देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आणि या पराभवावर विश्वास बसत नसल्याचे म्हटले. अर्जेंटिना संघाचे प्रशिक्षक जेवियर मास्चेरानो यांनीही सामन्यानंतर सांगितले की, ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सर्कस होती, मी असं कधीचं पाहिलं नाही.
२००४ आणि २००८ मध्ये सुवर्णपदक जिंकणारा अर्जेंटिनाचा संघ अलीकडील कोपा अमेरिका विजेते ज्युलियन अल्वारेझ, निकोलस ओटामेंडी आणि जेरोनिमो रुल्ली यांच्यासोबत खेळूनही आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्यात अपयशी ठरला. पहिल्या हाफच्या शेवटच्या सेकंदात सौफियाने रहीमीने मोरोक्कोला १-० अशी आघाडी मिळवून दिली, तर दुसरा गोल ४९व्या मिनिटाला पेनल्टीवर झाला. अर्जेंटिनासाठी एकमेव गोल सिमोन ज्युलियानोने ६८व्या मिनिटाला केला.