Paris Olympics 2024 Bajrang Punia Post on Vinesh Phogat: टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दोन विजयांसह उपांत्य फेरीत स्थान मिळवणारी कुस्तीपटू विनेश फोगटसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिचे वर्णन ‘भारताची वाघीण’ असं बजरंग पुनियाने केले. विनेशने मंगळवारी महिलांच्या ५० किलो गटातील सलामीच्या लढतीत गतविजेती जपानची युई सुसाकी आणि उच्च मानांकित युक्रेनियन ओक्साना लिवाचचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 11: काहीच वेळात सुरू होणार विनेश फोगट व भारताच्या हॉकी संघाचा सेमीफायनल सामना

विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमधील उपांत्यपूर्व फेरीत माजी युरोपियन चॅम्पियन आणि २०१८ वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेती लिवाचला ७-५ ने पराभूत केले यानंतर बजरंगने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले, ‘विनेशच्या विजयावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे मला समजत नाही. आपण आनंदी आहोत की रडत आहोत हे सांगता येत नाहीय. संपूर्ण भारताला या पदकाची प्रतीक्षा आहे. सर्वांचे डोळे ओले आहेत. जणू काही विनेश एकटी नसून संपूर्ण देशातील सर्व महिला लढत आहेत. ‘विनेश, तू खरोखरच विक्रम करण्यासाठी जन्माला आली आहेस. इतक्या अडचणींचा सामना करूनही तुमची नजर ध्येयाकडेच असते. हे सुवर्णपदक भारतात यावे हीच आमची प्रार्थना आहे.

विनेशच्या या विजयानंतर पोस्ट करताना बजरंगने ‘एक्स’ वर पोस्ट शेअर करत लिहिले, ‘विनेश फोगट ही भारताची वाघीण आहे जिने आज सलग दोन सामने जिंकले. तिने चार वेळा विश्वविजेत्या आणि सध्याच्या ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी जगज्जेत्या कुस्तीपटूचा (कांस्यपदक विजेता) पराभव केला. पण एक सांगू का पण याच मुलीला तिच्या देशात लाथेने चिरडण्यात आले होते. या मुलीला तिच्या देशात रस्त्यावरून सरपटत नेले होते. ही मुलगी जग जिंकणार आहे, पण या देशातील व्यवस्थेविरूद्ध ती हरली.

हेही वाचा – Paris Olympics 2024: “सुसाकीचा पराभव करणं हे…” नीरज चोप्राचं विनेश फोगटच्या कामगिरीवर विधान, वर्ल्ड चॅम्पियन युईच्या पराभवावर म्हणाला…

हेही वाचा – Paris Olympics 2024: “आता खेळाडूंना…” प्रकाश पदुकोण यांची भारतीय खेळाडूंवर खरमरीत शब्दात टीका; ऑलिम्पिकमधील कामगिरीवर पाहा काय म्हणाले?

बजरंग, विनेश आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक यांनी गेल्या वर्षीच्या सुरुवातीला भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या विरोधात दिल्लीत आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

आज रात्री सेमीफायनलाचा सामना विनेश क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी होणार आहे. या सामन्यातील विजय तिचे भारतासाठीचे पदक निश्चित करेल. तर पराभवानंतर तिला कांस्यपदकासाठी प्लेऑफ खेळावा लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris olympics 2024 bajrang punia post on vinesh phogat historic win in olympics 2024 said kicked and crushed in her own country bdg