Paris Olympics 2024 Closing Ceremony Updates in Marathi : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेला २६ जुलै रोजी सुरुवात झाली, ज्याचा उद्घाटन समारंभ जगभरात चर्चेचा विषय बनला होता. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात असून क्लोजिंग सेरेमनी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या वेळी, सीन नदीवर ऍथलीट्सची परेड आयोजित करण्यात आली होती. आता क्लोजिंग सेरेमनीही त्याच पद्धतीने होणार का, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. अखेर हा क्लोजिंग सेरेमनी कधी सुरू होणार आणि त्यात कोणत्या खास गोष्टी पाहायला मिळतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे एकत्र जाणून घेऊया.

क्लोजिंग सेरेमनी कधी आणि कुठे होणार?

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा क्लोजिंग सेरेमनी फ्रान्समधील सर्वात मोठ्या स्टेडियम स्टेड डी फ्रान्समध्ये होणार आहे. या स्टेडियममध्ये एकाच वेळी ८० हजार लोक बसू शकतात. हा सोहळा भारतात १२ ऑगस्ट रोजी सकाळी १२:३० वाजता सुरू होईल, जो किमान २ तास चालेल अशी अपेक्षा आहे. क्लोजिंग सेरेमनीच्या आयोजकांनी जारी केलेल्या निवेदनानुसार पॅरिस ऑलिम्पिकच्या क्लोजिंग सेरेमनीत १०० हून अधिक कलाकार परफॉर्म करणार आहेत.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

क्लोजिंग सेरेमनीत कोणकोण परफॉर्म करणार?

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या क्लोजिंग सेरेमनीत ॲक्रोबॅट्स, नर्तक आणि सर्कस कलाकारांचाही समावेश असेल. एक कॉन्सर्ट होईल ज्यामध्ये स्नूप डॉग, सेलीन डायन, बिली आयलीश आणि रेड चिली पेपर्स नावाचा रॉक बँड देखील परफॉर्म करेल. जुन्या परंपरेनुसार, २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या आयोजकांना क्लोजिंग सेरेमनीत ऑलिम्पिक ध्वज दिला जाईल. याशिवाय अमेरिकन संगीतकार ‘हेर’ अमेरिकेचे राष्ट्रगीत गाताना दिसणार आहे. उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच एक माहितीपटही दाखवण्यात येणार असून, त्यात भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाची झलक दाखवण्यात येणार आहे. परफॉर्मन्स आकाशातही पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – Aman Sehrawat : अमन सेहरावतने ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकण्यापूर्वी अवघ्या १० तासात ४.६ किलो वजन कसे घटवले? जाणून घ्या

भारताचा ध्वजवाहक कोण असणार?

उद्घाटन समारंभात पी.व्ही. सिंधू आणि शरत कमल यांना भारतीय संघाचे ध्वजवाहक बनवण्यात आले होते. आता क्लोजिंग सेरेमनी भारतीय संघाचे ध्वजवाहक मनू भाकेर आणि पीआर श्रीजेश असतील. भाकेरने २०२४ ऑलिम्पिकमध्ये २ कांस्यपदके जिंकली आहेत, तर पीआर श्रीजेश कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.