Paris Olympics 2024 Five major controversies : खेळाचा सर्वात मोठा महाकुंभ, ऑलिम्पिक २०२४ गेम्स स्पर्धा यावेळी पॅरिसमध्ये पार पडली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली होती. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी संमिश्र होती. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले. भारत ६ पदकांसह पदकतालिकेत ७१ व्या स्थानावर राहिला. दरम्यान यंदाची ही बऱ्याच वादामुळे चर्चेत राहिली, ज्यामध्ये विनेश फोगट ते इमेन खलिफपर्यंत पाच मोठे वाद पाहिला मिळाले, त्याबद्दल जाणून घेऊया.

विनेश फोगट रौप्य पदकाचा वाद –

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सर्वात मोठा वाद भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचा होता. विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आणि महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, १०० ग्रॅम जास्त वजन असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. अशा स्थितीत त्याच्याकडून पदक हिसकावण्यात आले. यानंतर तिने सीएएसकडे रौप्यपदकासाठी अपील केले होते. जे सीएएसने १४ ऑगस्टला फेटाळले.

Cricket At Olympic 2028 Likely To be Moved Out of Los Angeles to maximise viewership in India
Olympic 2028: भारतामुळे Olympic 2028 मधील क्रिकेट सामने लॉस एंजेलिसमध्ये होणार नाहीत? वाचा कारण
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Narak Chaturdashi 2024 Date Confusion| Narak Chaturdashi 2024
Narak Chaturdashi 2024 : आज साजरी केली जाईल नरक चतुर्दशी; अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त नेमका कधी?
upsc exam preparation tips
UPSC ची तयारी : UPSC मुख्य परीक्षा २०२४ – प्रश्नांचे अवलोकन (भाग ३)
Diwali is in next week There will be various events in sky as well
दिवाळीत अवकाशात मनमोहक घडामोडींची पर्वणी,पृथ्वीवरुन पाच ग्रहांचे…
loksatta analysis 9 sports dropped from glasgow 2026 commonwealth games
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून प्रमुख खेळांना वगळण्याचा निर्णय वादग्रस्त का? भारताच्या पदक आकाक्षांना जबर तडाखा?
Dev Uthani Ekadashi 2024 Date in Marathi | Kartiki Ekadashi 2024 Date
Dev Uthani Ekadashi 2024 Date : यंदा कार्तिकी एकादशी नेमकी कधी आहे? जाणून घ्या, कोणत्या तारखेपासून सुरू होणार शुभ कार्य?
article about upsc exam preparation
UPSC ची तयारी : २०२४ च्या मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे अवलोकन (भाग २)

ॲना बार्बोसू कांस्यपदकाचा वाद –

अमेरिकन जिम्नॅस्ट जॉर्डन चाइल्सकडून कांस्यपदक हिसकावून घेतले. तर जिम्नॅस्टिक्सच्या फ्लोअर इव्हेंटमध्ये रोमानियाच्या अना बार्बोसूने पराभूत होऊनही कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत जॉर्डन तिसऱ्या आणि ॲना चौथ्या स्थानावर राहिली होती. सामन्यातील पराभवानंतर ॲना बार्बोसू आणि तिच्या टीमने सीएएसकडे याचिका दाखल केली. त्यांनी म्हटले होते की जॉर्डन चाइल्सला चुकीच्या पद्धतीने गुण देण्यात आले होते, त्यामुळे ती तिसऱ्या स्थानावर राहिली होती.. यानंतर सीएएसने चौकशी करुन ॲना बार्बोसू कांस्यपदक दिले. ज्यामुळे जॉर्डन चाइल्सला रिकाम्या हाताने परतावे लागले.

हेही वाचा – Vinesh Phogat : विनेश फोगट मायदेशी परतली; स्वागतासाठी जमलेला जनसमुदाय पाहून झाली भावुक, पाहा VIDEO

अल्जेरियन खेळाडू इमेन खलिफ लिंग वाद –

या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान अल्जेरियन बॉक्सर इमेन खलिफ चर्चेत राहिली. खलिफने चीनच्या यांग लिऊचा पराभव करून अल्जेरियासाठी सुवर्णपदक जिंकले. अल्जेरियन बॉक्सरने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. मात्र, विजयापेक्षाही इमेन खलिफ लिंग विवादामुळे चर्चेत राहिली. खलिफ जैविकदृष्ट्या पुरुष असल्याचा आरोप झाला होता. तिच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी पुरुषांसारखी असल्याचा दावाही करण्यात आला होता. ही घटना राऊंड ऑफ १६ मध्ये घटली, जेव्हा इमेनने इटालियन बॉक्सर अँजेला कारिनीला जोरदार ठोसा मारला, अन् ४६ सेकंदात सामना जिंकला. त्यावेळी इमेन महिला नसून पुरुष असल्याचे आरोप झाले होते, परंत ऑलिम्पिक समितीने ती महिलाच असल्याचे सांगितले.

ऑस्ट्रेलियन हॉकीपटू टॉम क्रेगचा कोकेन वाद –

पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान हॉकीपटू टॉम क्रेग कोकेन खरेदीवरून वादात सापडला होता. ऑस्ट्रेलियन पुरुष हॉकी संघाचा सदस्य असलेल्या क्रेगला कोकेन विकत घेण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती. त्याला १७ वर्षीय संशयित विक्रेत्यासह ताब्यात घेण्यात आले. तथापि, २८ वर्षीय क्रेगला नंतर चेतावणी देऊन सोडण्यात आले आणि कोणतेही औपचारिक आरोप दाखल केले गेले नाहीत. यानंतर ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक समितीने क्रेगचे ऑलिम्पिक ऍथलीट विशेषाधिकार काढून घेतले आणि तो समारोप समारंभासह इतर कोणत्याही ऑलिम्पिक कार्यक्रमात भाग घेऊ शकला नाही.

हेही वाचा – MS Dhoni IPL 2025 : माहीच्या मानधनात तीन पटीने होणार कपात? आयपीएलच्या ‘या’ नियमामुळे कोट्यवधींचा बसणार फटका

चॅम्पियन जलतरणपटू थॉमस सेकॉन उद्यानात जमिनीवर झोपलेला वाद –

इटलीचा चॅम्पियन जलतरणपटू थॉमस सेकॉन पार्कमध्ये जमिनीवर झोपलेला दिसला. थॉमसने ऑलिम्पिक व्हिलेजच्या खराब परिस्थितीवर प्रकाश टाकला होता. सेकॉनने याबाबत जाहीर तक्रारही केली होती. उष्णता आणि आवाजामुळे झोप येत नसल्याचे सेकोनने सांगितले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सेकॉनने २ पदके जिंकली. त्याने पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत सुवर्ण आणि पुरुषांच्या ४x१०० मीटर फ्रीस्टाइल रिलेमध्ये कांस्यपदक जिंकले. सौदी अरेबियाचे ॲथलीट हुसेन अलीरेझा यांनी शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सेकॉन पार्कमध्ये झोपलेला दिसला होता.