India vs Spain Hockey Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या हॉकी संघाने कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथ पदक मिळालं आहे. भारताने या सामन्यामध्ये स्पेनचा २-१ अशा फरकाने पराभव केला आणि हॉकी संघानं कांस्यपदक पटकावलं. या विजयामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला. कारण संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकलं आहे.

याआधी त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकवलं होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने कांस्यपदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे. तसेच “पुढच्या पिढ्यांसाठी जपला जाईल असा हा पराक्रम आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं आहे.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार

हेही वाचा : हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कोरलं कांस्यपदकावर नाव; श्रीजेशच्या कारकीर्दीचा गोड शेवट

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“पुढच्या पिढ्यांसाठी जपला जाईल असा पराक्रम! भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये चमकला, कांस्यपदक जिंकले! हे आणखी खास आहे, कारण ऑलिम्पिकमधील त्यांचे हे सलग दुसरे पदक आहे. त्यांचे यश कौशल्य, चिकाटी आणि सांघिक भावनेचा विजय आहे. त्यांनी प्रचंड धैर्य आणि लवचिकता दाखवली. सर्व खेळाडूंचे अभिनंदन. प्रत्येक भारतीयाचा हॉकीशी भावनिक संबंध आहे आणि ही कामगिरी आपल्या देशातील तरुणांमध्ये हा खेळ अधिक लोकप्रिय करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकलं

भारतीय हॉकी संघाच्या इतिहासात भारताने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकलं आहे. याआधी १९६८ आणि १९७२ च्या ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकलं होतं. भारताचा गोलकिपर म्हणजेच भारतीय हॉकी संघाची भिंत म्हटल्या जाणाऱ्या श्रीजेशचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. कांस्यपदकाला गवसणी घालत श्रीजेशच्या कारकीर्दीचा गोड शेवट झाला आहे.

Story img Loader