Who are the players in Indian Army and Navy : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, जे देशाचे रक्षण करतात आणि आता देशासाठी पदकही आणतील. भारतीय सैन्य नेहमीच खेळांना प्रोत्साहन देत आहे आणि या ऑलिम्पिकमध्येही हा ट्रेंड कायम आहे. आज आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत,जे देशासह भारतीय सैन्यालाही गौरव मिळवून देतील.

अविनाश साबळे : भारताचा ३००० मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्यात सामील झाला. तो महार रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे. २०१३-१४ मध्ये तो सियाचीनमध्ये तैनात होता. त्यानंतर तो राजस्थान आणि सिक्कीममध्येही तैनात होता. सध्या अविनाश साबळे नायब सुभेदार पदावर कार्यरत आहेत. त्याने स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक आणि आशियाई गेम्स २०२२ मध्ये ५००० मीटर स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

नीरज चोप्रा : भारताचा एकमेव सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज चोप्रा हा देखील लष्कराशी संबंधित आहे. नीरज २०१६ मध्ये सैन्यात दाखल झाला. तो राजपुताना रायफल्सचा भाग आहे. नीरज पूर्वी नायब सुभेदार पदावर होता, मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला बढती देऊन सुभेदार पद बहाल करण्यात आले. नीरजला परम विशेष सेवा पदक आणि विशिष्ठ पदक देखील मिळाले आहे.

हेही वाचा – MS Dhoni : ‘त्याला उद्याच भारतात परत पाठवा…’, दक्षिण आफ्रिकेत धोनी श्रीसंतवर का संतापला होता? अश्विनने केला खुलासा

अमित पंघाल : भारतीय बॉक्सर अमित पंघाल हा देखील लष्कराशी संबंधित आहेत. अमित २०१९ आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आहे. अमित २०१८ साली सैन्यात दाखल झाला. तो महार रेजिमेंटच्या २२व्या बटालियनमध्ये सुभेदार पदावर कार्यरत आहेत. तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाचा प्रमुख दावेदार आहे.

जॅस्मिन लॅम्बोरिया : भारतीय बॉक्सर जॅस्मिन लॅम्बोरियाने २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते. या वर्षी ती सैन्यात दाखल झाली आहे. लष्कराशी संबंधित असलेली ती पहिली महिला बॉक्सर आहे. ती लष्करी पोलिसात हवालदार पदावर कार्यरत आहे.

तरुणदीप राय : भारतीय तिरंदाज तरुणदीप राय गेल्या २४ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. २००४ मध्ये अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्याने देशासाठी पदार्पण केले होते. त्यानी देशासाठी अनेक ऐतिहासिक पदके जिंकली आहेत. तरुणदीप गोरखा रायफल्समध्ये सुभेदार पदावर कार्यरत आहे. त्याला विशिष्ठ सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पंड्याचे भव्य स्वागत…खुल्या बसमधून विजयी परेड, बडोद्यातील चाहत्यांच्या गर्दीचा VIDEO व्हायरल

प्रवीण जाधव : भारतीय तिरंदाज प्रवीण जाधव दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. तो लष्कराशीही संबंधित आहे. जाधव ८३ व्या आर्मर्ड रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत आहे. गरीब कुटुंबातून आलेला प्रवीण जाधव सैन्यात दाखल झाल्यावर कुटुंबाला खूप आधार मिळाला.

मोहम्मद अनस याहिया : भारतीय खेळाडू मोहम्मद अनस याहिया हा पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवडलेल्या ४x४०० मीटर पुरुष रिले संघाचा भाग आहे. अनस भारतीय नौदलाशी संबंधित आहे. अनसची भारतीय नौदलाच्या स्काऊटिंग टीमने निवड केली होती. भारतीय नौदलाने त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा – Amit Mishra : विराट-गौतम यांच्यातील वाद कसा मिटला? अमित मिश्राने केला खुलासा, जाणून घ्या कोणाला दिले श्रेय?

अरोकिया राजीव : भारतीय ॲथलीट अरोकिया राजीव पॅरिस ऑलिम्पिकमधील ४x४०० मीटर पुरुष रिले संघाचा भाग आहे. राजीवही लष्करात कार्यरत आहे. त्याने मद्रासच्या आठव्या रेजिमेंटमध्ये सुभेदार पद भूषवले आहे. अर्जुन पुरस्कार मिळवणारा तो त्याच्या रेजिमेंटमधील दुसरा खेळाडू आहे. भारताचे माजी फुटबॉलपटू हवालदार पीटर थंगराज हेही याच रेजिमेंटशी संबंधित होते.