Paris Olympics 2024 Indian Hockey Team In Semifinal: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा ४-२ असा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. मात्र याआधीच हॉकी संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय हॉकीपटू अमित रोहिदासवर उपांत्य फेरीपूर्वी एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.

हेही वाचा – Paris Olympics 2024: नोहा लायल्स ठरला जगातला वेगवान माणूस; ०.००५ सेकंदाच्या फरकासह १०० मीटर शर्यतीचं पटकावलं सुवर्णपदक

ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
WTC Points Table India slip to 3rd after after IND vs AUS Pink Ball Test Defeat Australia No 1 again
WTC points Table: ना पहिलं, ना दुसरं स्थान, भारताला दुसऱ्या कसोटी पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा धक्का; ‘या’ क्रमांकावर घसरला संघ
India vs Australia Border Gavaskar Trophy Australia dominate in second Test sport news
पिछाडीनंतर पडझड, भारतीय फलंदाजांकडून निराशाच; हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दबदबा
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट, दुसऱ्या दिवशी निम्मा संघ तंबूत; ‘हा’ रेकॉर्ड पाहता पराभव टाळणं कठीण
water cut, Mumbai, Bhiwandi, Thane,
दहा टक्के पाणीकपात मागे, मुंबईसह ठाणे व भिवंडीकरांना दिलासा

Paris Olympics 2024: भारत हॉकी सेमीफायनल कोणत्या संघाविरूद्ध खेळणार?

पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाचा सामना वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीशी होणार आहे. पण या सामन्यात भारताचा अनुभवी खेळाडू अमित रोहिदास खेळताना दिसणार नाही. अमित रोहिदासला ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रेड कार्ड दाखवण्यात आले. त्यानंतर भारतीय संघाला उर्वरित सामन्यात १० खेळाडूंसह खेळावे लागले. ब्रिटनविरुद्धच्या सामन्यात अमित चेंडू सरकवत धावत होता, त्याचवेळेस अचानक त्याने स्टीक वर केली आणि जी चुकून ब्रिटेनचा खेळाडू विल कॅलननच्या चेहऱ्यावर लागली. ज्यावर रेफरीने त्याला रेड कार्ड दाखवले.

हेही वाचा – Paris Olympics 2024: एकाच खेळाडूने जिंकलं पुरूष आणि महिला स्पर्धेतील पदक, ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच घडली अशी घटना

Paris Olympics 2024: भारताचा डिफेंडर अमित रोहिदासला का केलं निलंबित?

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने भारताच्या उपांत्य सामन्यापूर्वी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ग्रेट ब्रिटन सामन्यादरम्यान FIH आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल अमित रोहिदासला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. जर्मनीविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तो सहभागी होणार नाही. भारत फक्त १५ खेळाडूंसोबत खेळणार आहे. मात्र हॉकी इंडियाने त्यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. अमितला रेड कार्ड दाखवल्यानंतर हॉकी इंडियाने पंचांच्या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. हॉकी इंडियाने व्हिडिओ पंच रिव्ह्यूचा निर्णय, ब्रिटनच्या गोलकीपरला गोलपोस्टच्या मागून प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या गोलरक्षकाने व्हीडिओ टॅब्लेटचा वापर केल्याबद्दल तक्रार केली.

हेही वाचा – IND vs SL: “तेव्हा वाईट वाटतं…” भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माने दिलं मोठं वक्तव्य, संघ नेमकं कुठे चुकला?

अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्यानंतर भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनविरुद्ध १० खेळाडूंसह खेळून दमदार कामगिरी केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतीय संघासाठी खेळाचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले. त्याने २२ व्या मिनिटालाच पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल केला. पण यानंतर ग्रेट ब्रिटनच्या ली मॉर्टनने गोल करत स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला. नंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेश सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने या सामन्यात अशी कामगिरी केली, जी दीर्घकाळ स्मरणात राहील. त्याने ब्रिटीश खेळाडूंना गोल करण्याच्या फारशा संधी दिल्या नाहीत. श्रीजेशमुळेच हॉकी संघाने शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय मिळवला.

Story img Loader