Paris Olympics 2024 Lakshya Sen Entered Semi Finals of Badminton: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने मोठी जबरदस्त कामगिरी केली आहे. बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत, लक्ष्य सेनचा सामना चायनीज तैपेईच्या चौ तिएन चेनशी सामना झाला. या सामन्यात त्याने चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन चेनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. लक्ष्यने चायनीज तैपेईच्या चौ तिएन चेनचा शेवटचे दोन्ही सेट जिंकत विजय मिळवला. लक्ष्यने पहिला सेट गमावल्यानंतर १९-२१, २१-१५, २१-१२ असा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Paris Olympics 2024: लक्ष्य सेनची सेमीफायनलमध्ये धडक

भारताचा तरूण बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑलिम्पिकमधील (Paris Olympics 2024) बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू ठरला आहे. तिसऱ्या सेटमध्ये लक्ष्य सेन आणि चाऊ तिएन चेन यांच्यात चुरशीची लढत झाली. या सामन्याच्या सुरुवातीला लक्ष्यने आघाडी घेतली होती, मात्र त्यानंतर चाऊ तियान चेनने पुनरागमन करत काही महत्त्वाचे गुण मिळवले. शेवटी लक्ष्यने आपला संयम राखला आणि सेट तसेच सामनाही जिंकला.

Paris Olympics 2024: लक्ष्य सेन वि चाऊ तिएन चेन यांच्यात असा रंगला सामना

या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. दोन्ही स्टार्स एकेका गुणासाठी संघर्ष करताना दिसले. पहिल्या सेटमध्ये चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन चेनने लक्ष्याला गुण मिळवण्याची एकही संधी दिली नाही आणि सेट २१-१९ असा जिंकला. त्यानंतर लक्ष्यने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत २१-१५ असा विजय मिळवत सामना बरोबरीत आणला. तर तिसऱ्या सेटमध्ये शानदार विजय मिळवत लक्ष्यने सामना आपल्या नावे केला.

भारताची ऑलिम्पिक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. देशाला तिच्याकडून पदकाच्या सर्वाधिक अपेक्षा होत्या. यानंतर पुरुष दुहेरीतही सात्विक-चिराग जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले. लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरीत एचएस प्रणॉयचा पराभव केला होता. यामुळे तो आता बॅडमिंटनमधील पदकासाठी भारताची शेवटची आशा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris olympics 2024 lakshya sen becomes the first indian male badminton player to reach the semifinal in the mens singles at the olympics bdg