Olympics 2024 Lakshya Sen: भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात विजयाने केली. लक्ष्य सेनने गट फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात केविन कॉर्डनचा पराभव केला. मात्र, लक्ष्य सेनचा सामना आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने हटवला आहे, या सामन्याचे गुण आता गृहित धरेल जाणार नाहीत. रविवारी सायंकाळी या निर्णयाची माहिती देण्यात आली. पण यामागचे नेमके कारण काय आहे, हेही समोर आले आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 3: अखेरच्या क्षणी हुकलं भारताचं अजून एक पदक, अर्जुन बाबुटा एका गुणाने मागे राहत चौथ्या स्थानी

Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Bangladesh historic victory over Pakistan, cricket,
विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Icc test rankings updates in marathi
Test Rankings : ICC ची ताजी कसोटी क्रमवारी जाहीर! यशस्वी जैस्वालला फायदा तर बाबर आझमला बसला मोठा फटका
Murder case filed against Shakib Al Hasan
Shakib Al Hasan : धक्कादायक! बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनविरोधात खुनाचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या गट एल मधील सलामीच्या सामन्यात केविन कॉर्डनवर मिळवलेला विजय गणला जाणार नाही. केविन कॉर्डन हा डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्वाटेमालाचा पुरुष एकेरी बॅडमिंटनपटू केविन कॉर्डनने डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे पॅरिस २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली आहे, असे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF) एका अपडेटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal: फक्त १३ सामने खेळत यशस्वी जैस्वालने केला मोठा विक्रम, ही कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

Paris Olympics: लक्ष्य सेनचा पहिला ऑलिम्पिक सामना का ग्राह्य धरला जाणार नाही?

इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी आणि बेल्जियमच्या ज्युलियन कारागी यांच्या विरुद्ध एल गटातील त्यांचे उर्वरित सामने खेळवले जाणार नाहीत. या गटातील सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. बॅडमिंटनच्या जागतिक मंडळाने सांगितले की गट एल मधील सामने गट टप्प्यासाठी BWF च्या स्पर्धा नियमांनुसार कॉर्डनसह खेळले गेले. त्यामुळे, गट एल मधील कॉर्डनचा समावेश असलेल्या किंवा खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल आता रद्द मानले जातील. कॉर्डनने माघार घेतल्याचा अर्थ आता ग्रुप एलमध्ये फक्त तीन खेळाडू असतील, ज्यात लक्ष्य सेन, क्रिस्टी आणि कॅरागी यांचा समावेश आहे. अशाप्रकारे या गटात लक्ष्य हा एकमेव खेळाडू असेल जो तीन सामने खेळेल. लक्ष्य सेन आता सोमवारी कॅरागी आणि बुधवारी त्याच्या अंतिम गट सामन्यात क्रिस्टीशी भिडणार आहे.

हेही वाचा – Paris Olympics: कांस्य पदक विजेती मनू भाकेरला खुद्द पंतप्रधान मोदींनी केला फोन, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय म्हणाले?

जर्मनीचा खेळाडू मार्क लॅम्सफसने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा पुरुष दुहेरीतील क गटातील सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय जोडी सोमवारी लॅम्सफस आणि मार्विन सीडेल या जर्मन जोडीविरुद्ध सामना खेळणार होती. जर्मन पुरुष दुहेरी खेळाडू मार्क लॅम्सफसने गुडघ्याच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे, असे BWF ने म्हटले आहे.

लॅम्सफस आणि त्याचा साथीदार मार्विन सीडेल यांचे भारताचे सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि फ्रान्सचे लुकास कॉर्वे आणि रोनन लाबर (३० जुलै २०२४) यांच्या विरुद्ध गट C चे सामने यापुढे खेळवले जाणार नाहीत. सात्विक आणि चिराग यांनी शनिवारी लुकास कॉर्वी आणि रोनन लाबर या फ्रेंच जोडीवर २१-१७, २१-१४ असा विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. या भारतीय जोडीचा मंगळवारी गटातील अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांतो यांच्याशी सामना होईल. जर्मन जोडीने माघार घेतल्याने इंडोनेशियन जोडीने शनिवारी लॅम्सफस आणि सीडेल यांच्यावर मिळवलेला विजय निकालातून काढून टाकण्यात आला आहे.