Paris Olympic 2024 Manu Bhaker: भारताची २२ वर्षीय नेमबाजी मनू भाकेर पदकांची हॅटट्रिक साधण्यापासून थोडक्यासाठी चुकली. पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics 2024) २५ मीटर पिस्तूलमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली. शेवटच्या क्षणी ती टॉप-३ मधून बाहेर पडली, तर त्याआधी ती सुवर्णपदकाची दावेदार होती. मनूने सुरूवातीला ५ पैकी २ शॉट लगावत फारशी चांगली सुरूवात झाली नाही. ती सहाव्या स्थानावर होती, पण नंतर ५ पैकी ४ गुण तिने गाठले. मग ती चौथ्या स्थानावर पोहोचली आहे आणि इथून तिने जबरदस्त कमबॅक केलं. पण अखेरच्या सीरिजमध्ये ती एका शॉटपासून चुकली.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 8 : ‘मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न केले…’, पदकांची हॅट्ट्रिक हुकल्यानंतर नेमबाज मनू भाकेरची प्रतिक्रिया

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता

२२ वर्षीय भाकेरने (Manu Bhaker) महिलांच्या फायनलमध्ये २८ गुण मिळवले आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करण्यास ती चुकली. तिला शूटऑफमध्ये कांस्यपदक विजेत्या हंगेरीच्या वेरोनिका मेजरकडून पराभव पत्करावा लागला. यापूर्वी मनूने १० मी एअर पिस्तुल एकेरी आणि मिक्स्डमध्ये सरबज्योत सिंगसह दोन कांस्यपदकं जिंकली. भाकेरपूर्वी, कोणत्याही भारतीय खेळाडूने (स्वतंत्र भारत) एकाच ऑलिम्पिकमध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकलेली नाहीत.

हेही वाचा – MS Dhoni: ‘यारी तेरी.. मुझे जिंदगी से भी प्यारी है…’ जोगिंदर शर्माने धोनीला १२ वर्षांनी भेटल्यानंतर शेअर केली खास पोस्ट

२५ मी पिस्तुलच्या पात्रता फेरीत भाकेरने (Manu Bhaker) संभाव्य ६०० पैकी ५९० गुण मिळवले (प्रिसीशनमध्ये २९४ आणि रॅपिडमध्ये २९६) आणि या ऑलिम्पिकच्या तिसऱ्या अंतिम फेरीत तिने दुसरे स्थान गाठले. यापूर्वी, भाकेरने वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते आणि त्यानंतर सरबज्योत सिंगसह १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते. भाकेरच्या दुसऱ्या कांस्यपदकामुळे ती स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बनली.

हेही वाचा – Paris Olympics 2024: गोल्ड मेडलनंतर मिळाली डायमंड रिंग, बॅडमिंटन कोर्टमध्येच चिनी खेळाडूने गर्लफ्रेंडला असं केलं प्रपोज, VIDEO व्हायरल

Paris Olympics 2024: मनूने कसं गमावलं तिसर पदक?

मनू भाकेरने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली, पण त्याची एक चूक त्याला महागात पडली. शूट-ऑफ टायब्रेकरनंतर चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर मनू भाकेरला एलिमिनेशनचा सामना करावा लागला. मनू भाकेरला या फेरीत ५ शॉट्स घ्यावे लागले. मनू भाकेरला या ५ पैकी केवळ ३ शॉट मारता आले आणि तिचा स्कोअर १०.२ होता. तर, चौथ्या स्थानावर असलेल्या वेरोनिकाने लक्ष्यावर ४ शॉट्स मारले. यामुळे मनू भाकेरचे स्वप्न भंगले आणि तिला अवघ्या १ शॉट चुकल्याने तिसरे पदक जिंकता आले नाही. तरीही २२ वर्षीय तरुणीने अद्वितीय कामगिरी केली आणि आता ती पॅरिस ऑलिम्पिकमधून दोन पदकांसह मायदेशी परतणार आहे.

कोरियाने २५ मी एअर पिस्तूलचं सुवर्णपदक पटकावलं

दक्षिण कोरियाच्या जिओन यांगने रौप्यपदक जिंकणाऱ्या फ्रान्सच्या कॅमिली जेद्रजेव्स्कीविरुद्ध शूट-ऑफ जिंकून सुवर्णपदक जिंकले. हंगेरीच्या वेरोनिका मेजरने तिच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले.

Story img Loader