Paris Olympics 2024 Indian Boxer Nishant Dev QF Match Controversy: भारतीय बॉक्सर निशांत देवचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास शनिवारी उपांत्यपूर्व फेरीत पराभवासह संपला. ७१ किलो गटात निशांतने जबरदस्त कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. उपांत्यपूर्व फेरीत सुरूवातीला निशांतकडे आघाडी होती. पण सामन्याच्या शेवटी त्याला मेक्सिकोच्या मार्को वर्दे अल्वारेझविरुद्धच्या निकराच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. निशांत भारतासाठी पदक निश्चित करण्यापासून फक्त एक विजय दूर होता. मेक्सिकन बॉक्सरने हा उपांत्यपूर्व सामना ४-१ असा जिंकून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपले पदक निश्चित केले.

हेही वाचा: Paris Olympic 2024 Live, Day 9: भारताच्या हॉकी संघाच्या क्वार्टर फायनलला सुरूवात, सर्व देशाच्या नजरा टीम इंडियावर

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?

२३ वर्षीय जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या निशांत देवने २०२१ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अल्वारेझचा पराभव केला होता. निशांतने ऑलिम्पिकमधील उपांत्यपूर्व फेरीतील पहिली फेरी जिंकली. दुसऱ्या फेरीतही त्याचे चढाईवर पूर्ण नियंत्रण दिसून आले. त्याने मेक्सिकन बॉक्सरवर अनेक शक्तिशाली जॅब हुक लावले, तरीही न्यायाधीशांनी आश्चर्यकारकपणे त्या फेरीत अल्वारेझच्या बाजूने ३-१ असा निर्णय दिला.

हेही वाचा – Manu Bhaker: “मी स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पण…” फायनलमध्ये मनू भाकेर दडपणाखाली होती, मॅचनंतर भावुक होत पाहा काय म्हणाली?

Paris Olympics 2024: निशांत देवच्या सामन्यात पंचांचं झुकतं माप मेक्सिकोच्या खेळाडूला?

अल्वारेझने अंतिम फेरीची आक्रमक सुरुवात केली आणि अनेक पंचेस लगावले. भारतीय बॉक्सरने काही पंचेस चुकवले. पण चढाओढ जसजशी वाढत गेली तसतसा तो पूर्णपणे थकलेला दिसत होता. निशांतने ठोसे मारण्याचा प्रयत्न केला, पण तो संथ होता. याचा फायदा घेत अल्वारेझने विजय मिळवला. ऑलिम्पिकमधील निशांतच्या पराभवानंतर लोक सोशल मीडियावर पंचांवर पक्षपातीपणा केल्याचा आरोप करत आहेत. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा बॉक्सर विजेंदर सिंगने एक्स वर लिहिले- “मला माहित नाही की स्कोअरिंग सिस्टम काय आहे परंतु मला वाटते की हा सामना खूप अटीतटीचा असेल. तो खूप छान खेळतो.” विजेंदर सिंगसह भारताचे सर्वच चाहते सोशल मीडियावर निशांत देवच्या सामन्यातील या निर्णयावर आपली मत मांडताना दिसत आहेत.

हेही वाचा – MS Dhoni: ‘यारी तेरी.. मुझे जिंदगी से भी प्यारी है…’ जोगिंदर शर्माने धोनीला १२ वर्षांनी भेटल्यानंतर शेअर केली खास पोस्ट

निशांतच्या कोचचं क्वार्टर फायनल सामन्यावर मोठं वक्तव्य (Nishant Dev Coach Statement on QF match Result)

फक्त सोशल मीडियाच नव्हे तर निशांतच्या प्रशिक्षकांनीही पंचांच्या निर्णयावर वक्तव्य केले. इंडिया टुडेशी संवाद साधताना त्याचे कोच सुरिंदर कुमार म्हणाले, “आमच्या दृष्टीने, तो पहिली फेरी जिंकत होता, आणि दुसरी फेरीही जिंकत होता, पण पंचांनी त्याच्या बाजूने निर्णय दिला नाही. तिसऱ्या फेरीतही, आपण असे म्हणू शकतो की अटीतटीची लढत झाली. दोन्ही बॉक्सरने चांगले गुण मिळवले.”

हेही वाचा – IND vs SL: “मी फार काही बोलणार नाही…” १४ चेंडूत एकही धाव न घेता भारताचा सामना टाय झाल्याने रोहित शर्मा पाहा नेमकं काय म्हणाला?

पत्रकाराने निशांतच्या कोचला विचारलं की तो पॉईंट रोखायला हवा होता का? यावर कोच म्हणाले, “हो तो पॉइंट रोखायला हवा होता. मेक्सिकोच्या खेळाडूला इशारा द्यायला हवा होता. मानसिकदृष्ट्या प्रतिस्पर्धी खचला असता आणि आपल्या खेळाडूने आघाडी घेतली असती. मेक्सिकन बॉक्सरने तिन्ही फेऱ्यांमध्ये तीच चूक केली. तो डोक्याला मारत होता, क्लिंच करत होता. हे बॉक्सरचे नुकसान आहे. कारण त्याला फक्त एकच फेरी लढायची नव्हती, तर त्याला दुसरी तिसरी फेरीही खेळायची होती.”

सुरिंदर कुमार यांनी सांगितले की ते सामन्याच्या निकालाचा कोणताही निषेध केला जाणार नाही आणि त्यांनी हा पराभव स्वीकारला आहे. कोच म्हणाले, “नाही, आम्ही या निर्णयाविरूद्ध निषेध करण्याचा विचार केलेला नाही. आम्ही हे मान्य केलं आहे. जो जीता वाही सिकंदर. तो मेक्सिकोचा चांगला बॉक्सर होता. ऐवढाही चांगली नव्हता, पण ठीक आहे. आम्ही खरोखर चांगली लढत लढली. त्या दोघांमध्येही अटीतटीची लढत झाली. त्यांनी अंतर राखून खेळायला हवे होते. खरे तर आधी वर्देशी निशांतविरूद्ध लढत झाली होती. २०२१ मध्ये निशांतने त्याला सामन्यात एकतर्फी पराभूत केले होते.”

Story img Loader