Paris Olympics 2024 100 m Sprint Race USA Noah Lyles wins Gold: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या १०० मीटर स्पर्धेत नोहा लायल्सने उत्कृष्ट कामगिरी केली. रविवारी ४ ऑगस्टला झालेल्या शर्यतीत अमेरिकन धावपटूने जमैकाच्या किशाने थॉम्पसनला अगदी कमी फरकाने पराभूत करून अव्वल स्थान पटकावले. थॉम्पसनच्या ९.७८९ सेकंदांपेक्षा केवळ ०.००५ जास्त असलेल्या लायल्सने ९.७८४ सेकंदांच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्णपदक जिंकले.

हेही वाचा – MS Dhoni: ‘यारी तेरी.. मुझे जिंदगी से भी प्यारी है…’ जोगिंदर शर्माने धोनीला १२ वर्षांनी भेटल्यानंतर शेअर केली खास पोस्ट

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

Paris Olympics 2024: नोहा लायल्सने पटकावलं प्रतिष्ठित १०० मी स्पर्धेचं ऑलिम्पिक सुवर्णपदक

अमेरिकेच्या फ्रेड केर्लीने पूर्वी ९.८१ सेकंदांच्या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह कांस्यपदक जिंकले. परत टोकियो ऑलिम्पिकमध्ये, कॅनडाच्या आंद्रे डी ग्रासे आणि अमेरिकेच्या केनेथ बेडनारेक यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर लायल्सने २०० मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले होते. परंतु यावेळी, त्याने थेट अव्वल स्थान गाठले आहे. लायल्सने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. २०० मी. शर्यतीतील धावपटू असलेल्या नाथनने १०० मी. स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या लॅमोंट मार्सेल जेकब्सने ९.८५ सेकंद वेळेसह पाचवे स्थान पटकावले. आठव्या क्रमांकावर राहिलेल्या जमैकाच्या ऑब्लिक सेव्हिलने ९.९१ सेकंदांची वेळ नोंदवली.

हेही वाचा – Paris Olympics 2024: नोव्हाक जोकोव्हिचची ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी, अल्काराजचा पराभव करत घडवला इतिहास

लायल्सने या सुवर्णकामगिरीसह २० वर्षांत प्रथमच अमेरिकेसाठी या स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले. प्रथमच या प्रतिष्ठित १०० मीटर शर्यतीच्या इतिहासात, आठ धावपटूंनी १० सेकंदांच्या आत शर्यत पूर्ण केली. ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाशिवाय, लायल्सने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहा सुवर्णपदके आणि डायमंड लीगमध्ये पाच सुवर्णपदके जिंकली आहेत.

१०० मी. प्रकाराच्या शर्यतीनंतर लायल्स म्हणाला की त्याला अटीतटीच्या शर्यतीत अव्वल स्थान गाठायचे होते. “मला हीच अटीतटीची शर्यत अपेक्षित होती, ती एक कठीण शर्यत होती, या स्पर्धत अनेक तुल्यबळ प्रतिस्पर्धी होते. कडवी टक्कर मिळेल याची खात्री होती तसंच झालं. मी त्या सगळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट आहे हे सिद्ध झालं.,”

Story img Loader