Paris Olympics 2024 Novak Djkovic Wins Gold Medal: अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचचे (Novak Djokovic) अपुरे स्वप्न पूर्ण झाले आहे. जोकोव्हिचने रविवारी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराझचा पराभव करून इतिहास घडवला. ३७ वर्षीय सर्बियन खेळाडूने अल्काराझचा ७-६(३), ७-६(२) असा पराभव केला. १९८८ नंतर ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा जोकोव्हिच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 9: नोवाक जोकोविचने सुवर्णपदक मिळवत घेतला बदला, अल्काराजचा 2-0 ने दणदणीत पराभव

२४ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या जोकोव्हिचला ऑलिम्पिक पदकाची खूप दिवसांपासून आतुरता होती. त्याने इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीचा पराभव करून आपल्या पहिल्या ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश केला. अव्वल मानांकित जोकोव्हिचला या आधीच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत सरळ सेटमध्ये अल्काराझने जोकोव्हिचला पराभव केला होता. ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या लढतीत विजयासह जोकोव्हिचने या पराभवाची परतफेड केली

हेही वाचा – MS Dhoni: ‘यारी तेरी.. मुझे जिंदगी से भी प्यारी है…’ जोगिंदर शर्माने धोनीला १२ वर्षांनी भेटल्यानंतर शेअर केली खास पोस्ट

नोव्हाक जोकोव्हिचची ऐतिहासिक कामगिरी
ऑस्ट्रेलियन ओपन- १०
फ्रेंच ओपन- ३
विम्बल्डन- ७
युएस ओपन- ४
ऑलिम्पिक गोल्ड- १
डेव्हिस कप-१

Novak Djokovic: करिअर गोल्डन स्लॅम म्हणजे काय?

या विजयासह नोव्हाक जोकोव्हिच हा चारही ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकणारा जगातील पाचवा खेळाडू ठरला असून त्याच्या नावावर ऑलिम्पिक सुवर्णही (Paris Olympics 2024) आहे. जोकोव्हिचच्या आधी केवळ स्टेफी ग्राफ, आंद्रे अगासी, राफेल नदाल, सेरेना विल्यम्स यांनाच ही कामगिरी करता आली. आता या चार खेळाडूंसह नोव्हाकचे नाव ग्रँडस्लॅम विजेत्यांच्या यादीत आले आहे. चारही ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याच्या कामगिरीला करिअर गोल्डन स्लॅम म्हणतात.

अंतिम फेरीत अल्काराझचा पराभव करून, नोव्हाक जोकोव्हिच १९०८ पासून टेनिसमध्ये एकेरी सुवर्णपदक जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. याआधी २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले होते. सर्वाधिक आठवडे नंबर वन खेळाडू राहण्याचा विक्रमही जोकोव्हिचच्या नावावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris olympics 2024 novak djokovic wins olympic gold medal after beating carlos alcaraz becomes oldest player in history bdg