2024 Paris Olympics Opening Ceremony Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. फ्रान्सच्या राजधानीत झालेल्या या सोहळ्यात जगभरातील खेळाडू आणि चाहते सहभागी झाले होते. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये नाहीतर नदी तीरावर मोठ्यादिमाखात पार पडला. एकापेक्षा एक मनमोहक दृश्य या उद्घाटन सोहळ्यादरम्यान पाहायला मिळाली. भारतीय संघाची महिला ध्वजवाहक दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल ध्वजवाहक होते. खेळाडूंसाठी उद्घाटन समारंभाचे किट डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी डिझाइन केले होते. भारत परेडमध्ये ८४व्या क्रमांकावर होता. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान पॅरिसमधील संस्कृती आणि फ्रेंच संस्कृतीचे प्रदर्शन पाहायला मिळाले.
Paris 2024 Olympics Opening Ceremony Highlights:बहुप्रतिक्षित पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा पॅरिसमधील सेन नदीवर पार पडला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल हे ध्वजवाहक होते.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला गेला आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये महिला आणि पुरूष खेळाडूंची संख्या सारखीच आहे.
४६० खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झाला आहे. सर्वात मोठा खेळाडूंचा ताफा घेऊन ऑस्ट्रेलिया संघ आहे. यानंतर ६०० सर्वाधिक खेळाडूंसह अमेरिका संघ आहे. तर 573 खेळाडूंसह यजमान फ्रान्स देशाचा संघ आहे.
पॅरिसमधील फॅशनचं प्रदर्शन करणारा मिनी रॅम्पवॉक उद्घाटन सोहळ्यादरम्यान सुरू आहे. याशिवाय इतर देशांचे नेशन ऑफ परेड्स सुरू आहे.
पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा १२ वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक विभागामध्ये फ्रेंच संस्कृतीचे वेगळे रूप दाखवले जात आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या नेशन ऑफ परेड्समध्ये भारताची बोट आली आहे. पीव्ही सिंधू आणि शरथ यांच्यासह भारताचे अनेक खेळाडू या बोटवर भारताचा तिरंगा घेऊन उभे होते. भारतीय संघ ११७ खेळाडूंसह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे.
३८३ खेळाडूंसह सर्वात मोठा खेळाडूंच्या गटांसह स्पेनचा संघ पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभाग झाला आहे. या देशातील सहभागी खेळाडू पाहून संघाला स्वतंत्र बोट देण्यात आली.
जगातील सर्वात मोठं द लूव्ह या प्रसिद्ध संग्रहालयात ऑलिम्पिक टॉर्च घेऊन तो व्यक्ती पोहोचला आहे. द लूव्ह या प्रसिद्ध संग्रहालयात ३५००० हून अधिक आर्ट्स हे प्रागऐतिहासिक काळापासून २१ व्या काळातील आहेत.
प्रसिद्ध फ्रान्सच्या महान पॉप स्टार्सपैकी एक आका नाकामुरा हिने पुढील रिपब्लिकन गार्डचा ऑर्केस्ट्रा पोंट डेस आर्ट्सवर सादरीकरण केले.
पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात पॅरिसमधील संस्कृती तेथील, फ्रेंच क्रांती नृत्य आणि विविध परफॉर्मन्सच्या माध्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये जवळपास २००० कलाकार सहभागी झाला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे मेडल पॅरिसमध्ये कसे तयार केले गेले, याची एक झलक दाखवण्यात आली. यासह ब्रेक डान्स ब्रेकिंग या नावाने ऑलिम्पिकमध्ये खेळ म्हणून सहभागी केला आहे. याचीही एक झलक दाखवली गेली.
ऑलिम्पिक टॉर्च घेऊन एक व्यक्ती संपूर्ण फ्रान्समध्ये फिरत आहे. संपूर्ण ओपनिंग सेरेमनीमध्ये देशातून फिरताना नदीच्या वरून रिव्हर राफ्टिंग करतानाही दिसत आहे.
काही देशांच्या परेडनंतर जगप्रसिद्ध कॅब्रे डान्स सीन नदीच्या किनाऱ्यावर सुरू झाला आहे. ज्यामध्ये ८० कलाकार सहभागी झाले आहेत.
बांगलादेश, बार्बाडोस, बेल्जियम, ब्राझील, ब्रुनेय दारूसलाम, बल्गेरिया सर्वाधिक महिला खेळाडूंसह ऑलिम्पिक, बर्किनो फासू, बुरूंडी हे देश आहेत.
काही देशांच्या परेडनंतर लेडी गागाने पॅरिस ऑलिम्पिक सोहळ्यात एक शानदार परफॉर्मन्स सादर केला.
अझरबायजान, ऑस्ट्रिया, बहामास 18 खेळाडूंसह हे देश पुढील बोटीत आहेत. यानंतर पुढील बोटीत बाहरियन देश आहे.
परेड ऑफ नेशन्समध्ये पुढील देश अल्जेरिया,अँडोरा, अँगोला, 14 व्यांदा ऑलिम्पिकमध्ये हे देश आहेत. यानंतर अँटिगा आणि बार्बुडा पुढचा देश आहे, सोबतच या बोटीवर अर्जंटिना देश आहे. अरूबा देशातील खेळाडूंची पुढची बोट आहे.
परेड ऑफ नेशन्समध्ये तिसरी बोट दक्षिण आफ्रिका देश आहे.
परेड ऑफ नेशन्समध्ये तिसरी बोट अफगाणिस्तान देश आहे.
ऑलिम्पिकमध्ये रेफ्युजी संघ हा कोणत्याही देशाच्या नाही तर ऑलिम्पिकच्या झेंड्याखाली ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होतो. ग्रीसनंतर या संघाची बोट आली.
ऑलिम्पिकच्या पहिल्या परेड ऑफ नेशन्समध्ये ग्रीसचा देशापासून बोटीतून परेडला सुरूवात. ऑलिम्पिक खेळांना १८९६ मध्ये अथेन्स, ग्रीस येथे सुरूवात झाली. हा देश ऑलिम्पिक खेळांचे जन्मस्थान मानला जातो. यासाठी ग्रीसचे खेळाडू आधी मार्चपास्ट करतात. या वर्षी ग्रीसचा ध्वजवाहक रेस वॉकर अँटिगोनी दृष्टीबिओटी असेल.
ऑलिम्पिक 2024 च्या अनोख्या उद्घाटन सोहळ्यासाठी सीन नदीवर तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळ्यासाठी नदीवरील तयारीचे फोटो समोर आले आहेत.
ऑलिम्पिकच्या अनोख्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी पॅरिसमध्ये पाऊस पडत आहे. या पावसापासून वाचण्यासाठी यूएसए ध्वजवाहक - NBA दिग्गज लेब्रॉन जेम्स आणि टेनिस खेळाडू कोको गॉफ यांचा एक फोटो समोर आला आहे.
भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता पॅरिस ऑलिम्पिक २०४ चा उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे. या सोहळ्यासाठी भारताचे खेळाडूही पॅरिसमधील सीन नदीच्या किनारी सज्ज आहेत.
भारताच्या पुरुष आणि महिला रीकर्व्ह तिरंदाजी संघांनी २५ जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मानांकन फेरीतील दमदार कामगिरीसह थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. पुरुष विभागात धीरज बोम्मादेवरा (चौथ्या स्थानी), तर महिलांत अंकिता भकट (११व्या स्थानी) या ऑलिम्पिक पदार्पणवीरांनी मानांकन फेरीत चमकदार कामगिरी केली.