Paris Olympics 2024 Indian Shooter Matches : मनू भाकेर हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात दुसऱ्या ऑलिम्पिक प्रयत्नात कांस्यपदक पटकावलं आहे. मनूच्या या कामगिरीने भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांचं खातं उघडलं आहे. मनूने पदकांचा श्रीगणेशा केला असून आता इतरही भारतीय खेळाडूंकडून आपल्याला पदकांची आशा आहे. आज (२९ जुलै) भारताला दोन पदकांची आशा आहे. भारताचे दोन नेमबाज पदकाच्या जवळ पोहोचले असून आज त्यांनी आज सर्वोत्कृष्ट कामगिरी केली तर भारताच्या झोळीत दोन पदकं पडू शकतात.

भारताची आजच्या दिवसाची सुरुवात बॅडमिंटनने होणार आहे. पुरूष दुहेरी स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी जर्मनीच्या लॅम्प्सफस मार्क व सेडेल मार्विन या जोडीशी दोन हात करेल. दुपारी १२ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर, १२.५० वाजता महिला दुहेरीमध्ये भारताच्या दोन खेळाडूंचा सामना आहे. अश्विनी पोनप्पा व तनीषा क्रास्टो ही जोडी जपानच्या मात्सुयामा व चिहारू शिदा या जोडीविरोधात खेळणार आहे.

IND vs NZ New Zealand break 12-year record with 356 Runs lead Bengaluru Test
IND vs NZ: न्यूझीलंड संघ भारतावर पडला भारी, १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाने भारताविरुद्ध घेतली एवढी मोठी आघाडी
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
India Women vs Australia Women T20 World Cup 2024 highlights in Marathi
IND-W vs AUS-W Highlights : ऑस्ट्रेलियाने रोमांचक सामन्यात भारताचा उडवला धुव्वा, टीम इंडिया कशी पोहोचणार उपांत्य फेरीत? जाणून घ्या
India vs Bangladesh 3rd T20 Match Live Score Update in Marathi
IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय, कसोटीनंतर टी-२० मध्येही बांगलादेशवर एकतर्फी मालिका विजय
New Zealand Captain Tom Latham Statement on Team India Ahead of IND vs NZ Test Series
IND vs NZ: “…तर आम्ही भारतावर विजय मिळवू”, भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने बनवली जबरदस्त रणनिती, हिटमॅन चक्रव्यूह भेदणार?
India vs Bangladesh T20 Match Live Score Update in Marathi
IND vs BAN T20 Highlights: भारताचा ४९ चेंडू बाकी ठेवत बांगलादेशवर दणदणीत विजय, गोलंदाजीनंतर फलंदाजांनी उडवली झोप
India Women vs Pakistan Women T20 World Cup 2024 Highlights in Marathi
IND-W vs PAK-W Highlights : भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा, गोलंदाजीनंतर फलंदाजीतही शानदार कामगिरी
IND vs BAN Test Series Highlights in Marathi
IND vs BAN Test Series : भारताच्या बांगलादेशवरील मालिका विजयाची ५ कारणे कोणती आहेत? जाणून घ्या

नेमबाजीचे सामने (Paris Olympics 2024 : 29 July Schedule)

२९ जुलै रोजी दुपारी १२.४५ वाजता भारतीय नेमबाजांच्या सामन्यांना सुरुवात होईल. १० मीटर एअर पिस्तुल सामन्यात भारताचे दोन संघ सहभागी होतील. पहिल्या संघात मनू भाकेर व सरबजोत सिंह तर दुसऱ्या संघात अर्जुन सिंह चीमा व रिदम सांगवान यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ दुपारी १ वाजता ट्रॅप इव्हेंट होईल, या स्पर्धेच्या पात्रता फेरीत पृथ्वीराज तोंडाईमन सहभागी होणार आहे.

रमिताकडून पदकाची आशा ((Paris Olympics 2024 : Ramita Jindal)

सोमवारी दुपारी १.१० वाजता १० मीटर एअर रायफल स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. ज्यामध्ये भारताच्या रमिता जिंदालकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या फेरीत रमिताने ६३१.५ गुणांसह पाचवा क्रमांक पटकावत अंतिम फेरी गाठली होती.

loksatta analysis the first indian woman manu bhakar to win an olympic bronze medal in shooting
भारताला नेमबाजीत पहिले कांस्यपदक जिंकून देणारी मनू भाकेर (फोटो-साई एक्स)

अर्जुन बबुटा पदक पटकावणार? (Paris Olympics 2024 : Arjuna Babuta)

भारताचा नेमबाज अर्जुन बबुृटाकडूनही सर्वांना पदकाची अपेक्षा आहे. १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो आज खेळणार आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या पात्रता फेरीत ६३०.१ गुणांसह तो सातव्या क्रमांकावर होता.

हे ही वाचा >> Nita Ambani on Olympics in India: नीता अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर कार्ती चिदम्बरम म्हणाले, “हे तर मोठं संकट ठरेल”; वाचा नेमकं काय झालं?

Paris Olympics 2024 Live : २९ जुलैचं भारताचं वेळापत्रक

दुपारी १२.०० वाजता – बॅडमिंटन पुरूष दुहेरी (ग्रुप स्टेज)

सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी – चिराग शेट्टी

दुपारी १२.४५ वाजता – नेमबाजी १० मी एअर पिस्तुल मिश्र (पात्रता फेरी)

सरबजोत सिंग आणि मनू भाकेर

अर्जुन सिंग आणि रिदम सांगवान

दुपारी १२.५० वाजता – बॅडमिंटन – महिला दुहेरी (ग्रुप स्टेज)

अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो

दुपारी १ वाजता – नेमबाजी – ट्रॅप पुरूष (पात्रता फेरी)

पृथ्वीराज तोंडाईमन

दुपारी ३.३० वाजता – टेनिस पुरूष दुहेरी (दुसरी फेरी)

रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजी

दुपारी ४.१५ वाजता – हॉकी पुरूष (ग्रुप स्टेज)

भारत वि अर्जेंटिना

सायंकाळी ५.३० वाजता

बॅडमिंटन – पुरूष एकेरी (ग्रुप स्टेज)

लक्ष्य सेन

सायंकाळी ६.३० वाजता – तिरंदाजी पुरूष संघ (उपांत्यपूर्व फेरी)

तरूणदीप रॉय, धरीज बोम्मादेवरा आणि प्रवीण जाधव

भारतीय संघ पात्र ठरल्यास,

सायंकाळी ७.१७ वाजता-उपांत्यफेरी

रात्री ८.१८ वाजता – कांस्यपदक फेरी

रात्री ८.४१ वाजता – सुवर्णपदक फेरी

रात्री ११.३० वाजता – टेबल टेनिस महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२)

श्रीजा अकुला