Paris Olympics 2024 Indian Shooter Matches : मनू भाकेर हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात दुसऱ्या ऑलिम्पिक प्रयत्नात कांस्यपदक पटकावलं आहे. मनूच्या या कामगिरीने भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांचं खातं उघडलं आहे. मनूने पदकांचा श्रीगणेशा केला असून आता इतरही भारतीय खेळाडूंकडून आपल्याला पदकांची आशा आहे. आज (२९ जुलै) भारताला दोन पदकांची आशा आहे. भारताचे दोन नेमबाज पदकाच्या जवळ पोहोचले असून आज त्यांनी आज सर्वोत्कृष्ट कामगिरी केली तर भारताच्या झोळीत दोन पदकं पडू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची आजच्या दिवसाची सुरुवात बॅडमिंटनने होणार आहे. पुरूष दुहेरी स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी जर्मनीच्या लॅम्प्सफस मार्क व सेडेल मार्विन या जोडीशी दोन हात करेल. दुपारी १२ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर, १२.५० वाजता महिला दुहेरीमध्ये भारताच्या दोन खेळाडूंचा सामना आहे. अश्विनी पोनप्पा व तनीषा क्रास्टो ही जोडी जपानच्या मात्सुयामा व चिहारू शिदा या जोडीविरोधात खेळणार आहे.

नेमबाजीचे सामने (Paris Olympics 2024 : 29 July Schedule)

२९ जुलै रोजी दुपारी १२.४५ वाजता भारतीय नेमबाजांच्या सामन्यांना सुरुवात होईल. १० मीटर एअर पिस्तुल सामन्यात भारताचे दोन संघ सहभागी होतील. पहिल्या संघात मनू भाकेर व सरबजोत सिंह तर दुसऱ्या संघात अर्जुन सिंह चीमा व रिदम सांगवान यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ दुपारी १ वाजता ट्रॅप इव्हेंट होईल, या स्पर्धेच्या पात्रता फेरीत पृथ्वीराज तोंडाईमन सहभागी होणार आहे.

रमिताकडून पदकाची आशा ((Paris Olympics 2024 : Ramita Jindal)

सोमवारी दुपारी १.१० वाजता १० मीटर एअर रायफल स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. ज्यामध्ये भारताच्या रमिता जिंदालकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या फेरीत रमिताने ६३१.५ गुणांसह पाचवा क्रमांक पटकावत अंतिम फेरी गाठली होती.

भारताला नेमबाजीत पहिले कांस्यपदक जिंकून देणारी मनू भाकेर (फोटो-साई एक्स)

अर्जुन बबुटा पदक पटकावणार? (Paris Olympics 2024 : Arjuna Babuta)

भारताचा नेमबाज अर्जुन बबुृटाकडूनही सर्वांना पदकाची अपेक्षा आहे. १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो आज खेळणार आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या पात्रता फेरीत ६३०.१ गुणांसह तो सातव्या क्रमांकावर होता.

हे ही वाचा >> Nita Ambani on Olympics in India: नीता अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर कार्ती चिदम्बरम म्हणाले, “हे तर मोठं संकट ठरेल”; वाचा नेमकं काय झालं?

Paris Olympics 2024 Live : २९ जुलैचं भारताचं वेळापत्रक

दुपारी १२.०० वाजता – बॅडमिंटन पुरूष दुहेरी (ग्रुप स्टेज)

सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी – चिराग शेट्टी

दुपारी १२.४५ वाजता – नेमबाजी १० मी एअर पिस्तुल मिश्र (पात्रता फेरी)

सरबजोत सिंग आणि मनू भाकेर

अर्जुन सिंग आणि रिदम सांगवान

दुपारी १२.५० वाजता – बॅडमिंटन – महिला दुहेरी (ग्रुप स्टेज)

अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो

दुपारी १ वाजता – नेमबाजी – ट्रॅप पुरूष (पात्रता फेरी)

पृथ्वीराज तोंडाईमन

दुपारी ३.३० वाजता – टेनिस पुरूष दुहेरी (दुसरी फेरी)

रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजी

दुपारी ४.१५ वाजता – हॉकी पुरूष (ग्रुप स्टेज)

भारत वि अर्जेंटिना

सायंकाळी ५.३० वाजता

बॅडमिंटन – पुरूष एकेरी (ग्रुप स्टेज)

लक्ष्य सेन

सायंकाळी ६.३० वाजता – तिरंदाजी पुरूष संघ (उपांत्यपूर्व फेरी)

तरूणदीप रॉय, धरीज बोम्मादेवरा आणि प्रवीण जाधव

भारतीय संघ पात्र ठरल्यास,

सायंकाळी ७.१७ वाजता-उपांत्यफेरी

रात्री ८.१८ वाजता – कांस्यपदक फेरी

रात्री ८.४१ वाजता – सुवर्णपदक फेरी

रात्री ११.३० वाजता – टेबल टेनिस महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२)

श्रीजा अकुला

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris olympics 2024 ramita jindal arjun babuta may win medal in shooting asc
Show comments