Paris Olympics 2024 Sports Ministry provides 40 portable : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडू आतापर्यंत तीन पदके जिंकून नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पॅरिसमधील स्पोर्ट्स व्हिलेजमधील कडक उष्णता आणि आर्द्रता देखील खेळाडूंच्या मार्गात अडथळा ठरत आहे. यामुळे भारतीय क्रीडा मंत्रालयाने स्पोर्ट्स व्हिलेजमधील त्यांच्या खोल्यांमध्ये ४० पोर्टेबल एसी बसवले आहेत. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

क्रीडा मंत्रालयाने भारतीय खेळाडूंना ४० पोर्टेबल एअर कंडिशनर दिले आहेत. ज्यामुळे त्यांना वाढत्या उकाड्यापासून खोल्यांमध्ये थंडपणा अनुभवता येईल. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पॅरिसमधील तापमान आणि आर्द्रतेमुळे ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमधील खेळाडूंना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
loksatta lokankika Mumbai thane
महाविद्यालयांत तालमींचा कल्ला! ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई, ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी युवा रंगकर्मींचा कसून सराव
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता

मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि फ्रान्समधील भारतीय दूतावास यांच्याशी चर्चा केल्यानंतर एअर कंडिशनर स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये पाठवण्यात आले. “या निर्णयानंतर, फ्रान्समधील भारतीय दूतावासाने एसी खरेदी केले आणि ते स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये वितरित केले,” सूत्राने सांगितले. ज्या स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये भारतीय खेळाडूंचा मुक्काम आहे त्या खोल्यांमध्ये एसी बसवण्यात आले आहेत.

हेही वाचा – Paris Olympics 2024 : तिरंदाज आणि लक्ष्यादरम्यानचं अंतर पाहून चक्रावून जाल, VIDEO होतोय व्हायरल

स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये एसीचा वापर केला जात नव्हता –

ऑलिम्पिक खेळांची मुख्य ठिकाणे असलेल्या पॅरिस आणि चाटेरोक्समध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये, भारताच्या कांस्य विजेत्या स्वप्नील कुसाळेसह सर्व आठ अंतिम स्पर्धक चॅटॉरॉक्स शूटिंग रेंजमध्ये घाम गाळताना दिसले. गेल्या काही दिवसांत पॅरिसमधील तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे वृत्त आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिस ऑलिम्पिक गेम्स सुरू होण्यापूर्वी आयोजकांनी कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी एअर कंडिशनिंगचा वापर करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, पॅरिसमधील हवामानामुळे अनेक देशांच्या संघांनीही या निर्णयावर आक्षेप घेतला होता. आयोजन समितीने गेम्स व्हिलेजमध्ये तापमान कमी ठेवण्यासाठी अंडरफ्लोर कूलिंग मेकॅनिझम आणि अंगभूत इन्सुलेशन यांसारख्या उपाययोजना केल्या होत्या.

हेही वाचा – Paris Olympics 2024 : सेमीफायनलमध्ये खेळताना कोर्टवर कोसळली कॅरोलिना मारिन, आघाडीवर असूनही झाली स्पर्धेतून बाहेर

क्रीडा मंत्रालय खर्च उचलणार –

पीटीआयच्या मते, याशिवाय अमेरिकेने सुरुवातीपासून एसीची व्यवस्था केली होती. मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले की, “शुक्रवारी सकाळी हा निर्णय घेण्यात आला असून त्याचा खर्च मंत्रालय उचलत आहे.” ते म्हणाले, “एसी हे प्लग अँड प्ले युनिट आहेत आणि खेळाडूंनी त्यांचा वापर सुरू केला आहे. आशा आहे की यामुळे त्यांना अधिक आरामदायी मुक्काम आणि चांगली विश्रांती मिळेल, जे चांगल्या कामगिरीसाठी खूप महत्वाचे आहे.”

Story img Loader