Paris Olympics 2024 Tapasee Pannu Husband Mathias Boe Retired: भारताची अव्वल बॅडमिंटन जोडी पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली. भारताला बॅडमिंटनमध्ये सात्त्विक-चिरागच्या जोडीकडून पदकाच्या मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्यांनी तशी साजेशी कामगिरीही केली पण थोडक्यासाठी ही चॅम्पियन जोडी उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडली. पॅरिस ऑलिम्पिकमधून सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी बाहेर झाल्यानंतर यांचे प्रशिक्षक मॅथियस बो यांनी प्रशिक्षकपदावरून निवृत्तीची घोषणा केली.

हेही वाचा – Manu Bhaker: “मी स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पण…” फायनलमध्ये मनू भाकेर दडपणाखाली होती, मॅचनंतर भावुक होत पाहा काय म्हणाली?

Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Will the post of CIDCO Board Chairman be changed soon
सिडको मंडळाच्या अध्यक्षपदाचा लवकरच खांदेपालट?
Sudhir Mungantiwar absent chandrapur Chief minister Devendra Fadnavis program
निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव…. अपमान झाल्याने मुनगंटीवारांनी फडणवीसांच्या…..
Canadian Prime Minister Justin Trudeau announces resignation as Liberal Party leader and Prime Minister
ट्रुडो यांची राजीनाम्याची घोषणा; पक्षाने नवीन नेता निवडल्यानंतर पंतप्रधानपद सोडणार
Santosh Deshmukh murder case All party pressure Dhananjay Munde Question on judicial inquiry
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय दबाव,राज्यपालांची भेट; न्यायालयीन चौकशीवर प्रश्न
delegation met the Governor on Monday
मुंडेंना अजितदादांचे अभय; पुरावा मिळेपर्यंत कारवाई न करण्याची भूमिका
loksatta readers feedback
लोकमानस: सारेच बरबटलेले, कोणाला वगळणार?

गुरुवारी १ ऑगस्टला पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक आणि चिराग यांना मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वुई यिक यांच्याकडून २१-१३, १४-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. लंडन ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते बो यांनी चिराग आणि सात्विक यांना टोकियो ऑलिम्पिकपूर्वी प्रशिक्षक म्हणून सामील झाले होते. मॅथियस बो यांचा भारतातील परिचय हा केवळ सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या प्रशिक्षकापुरता मर्यादित नाही. मॅथियस बो हे बॉलिवूड स्टार तापसी पन्नूचा पती देखील आहे. यावर्षी २२ मार्च रोजी या दोघांनी अत्यंत साधेपणाने लग्न केले. तापसी पन्नूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपस्थित राहून आपला पती आणि भारतीय बॅडमिंटनपटू जोडीला चिअर केलं होतं, त्याची पोस्ट तिने शेअर केली होती.

हेही वाचा – MS Dhoni: ‘यारी तेरी.. मुझे जिंदगी से भी प्यारी है…’ जोगिंदर शर्माने धोनीला १२ वर्षांनी भेटल्यानंतर शेअर केली खास पोस्ट

Paris Olympics 2024: सात्त्विक-चिरागच्या कोचने पदाचा दिला राजीनामा

४४ वर्षीय डेन्मार्कचा माजी खेळाडू बोने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका लांबलचक कॅप्शनसह पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सात्त्विक-चिरागसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले, “मी स्वत: ही भावना चांगल्या प्रकारे समजू शकतो. दररोज कठोर मेहनत करून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करूनही आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होत नाहीत.”

हेही वाचा – IND vs SL: रोहित शर्माचा जळता कटाक्ष आणि अर्शदीपच्या चेहऱ्याचा उडाला रंग, सामना टाय झाल्यानंतर मैदानात पाहा काय घडलं?

पुढे बो म्हणाले, “मला माहित आहे की तुम्ही दोघे निराश आहात, मला माहित आहे, तुम्हाला भारतासाठी पदक आणायचे होते पण तसं होऊ शकलं नाही. पण पदक नाही आलं तरी अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा, तुम्ही ऑलिम्पिकसाठी जी मेहनत घेतलीत, दुखापतींशी झुंज दिलीत, दुखणं कमी करण्यासाठी तर चक्क इंजेक्शनही घेतलीत, यालाच समर्पण म्हणतात आणि तुम्ही हे सर्व मनापासून केलंत. गेल्या वर्षभरात तुम्ही खूप काही जिंकलं आहे आणि येत्या काळातही बऱ्याच गोष्टी येणार आहेत.”

आपल्या निवृत्तीबद्दल सांगताना बो पुढे म्हणाले, “माझ्या कोचिंगला मी इथेच अलविदा करत आहे. मी भारतात किंवा इतर कुठेही सध्यातरी प्रशिक्षण चालू ठेवणार नाही. बॅडमिंटन हॉलमध्ये मी खूप वेळ घालवला आहे आणि प्रशिक्षक असणं देखील खूप ताण आणणारं आहे, मी आता थकलोय.(पुढे इमोजी टाकत त्यांनी मस्करीत हे वाक्य म्हटलं)” यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि संस्थांचे आभार मानले आणि शुभेच्छा दिल्या. शेवटी जय हिंद लिहित त्यांनी भारताचा ध्वज असलेला इमोजीही पोस्ट केला.

Story img Loader