Sreeja Akula in Paris Olympic 2024 : टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला हिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पाचव्या दिवशी इतिहास रचला आहे. तिने अंतिम १६ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तिच्या वाढदिवशी तिने सिंगापूरच्या झेंग जियानविरुद्ध रोमहर्षक सामना जिंकला. तिने सिंगापूरच्या जियान झेंगचा ९-११, १२-१०, ११-४, ११-५, १०-१२, १२-१० असा पराभव केला. यासह ती टेबल टेनिसच्या प्री क्वार्टरमध्ये पोहोचणारी दुसरी भारतीय ठरली आहे. अशा प्रकारे टेबल टेनिसपटू
पॅरिस ऑलिम्पिक ऑलिम्पिक २०२४च्या प्री-क्वार्टरमध्ये स्थान मिळवणारी ही २६ वर्षीय खेळाडू मनिका बत्रानंतरची दुसरी भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे. मनिकाने काही दिवसांपूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हा टप्पा गाठून इतिहास रचला होता. श्रीजाही तिच्या पावलावर पाऊल टाकत आहे. त्याचबरोबर १९६४ नंतर राष्ट्रीय विजेतेपद पटकावणारी श्रीजा हैदराबादची पहिली खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी मीर कासिमने हे विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतर अनेक दशकांची प्रतीक्षा करावी लागली. २०२२ मध्ये श्रीजाने ५८ वर्षांनंतर हा विक्रम मोडला. वयाच्या २३ व्या वर्षी तिने वरिष्ठ मौमा दासचा पराभव केला.
बहिणीला पाहून टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली –
श्रीजा अकुलाचा जन्म ३१ जुलै १९८८ रोजी हैदराबादमध्ये झाला. लहानपणापासूनच श्रीजाला अभ्यासाबरोबर टेबल टेनिसची आवड होती. बहिणीला पाहून टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘लहानपणापासून मला माझ्या मोठ्या बहिणीला टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होताना पाहण्याची इच्छा होती. मी तिला चॅम्पियनशिप जिंकताना पाहिले आहे. तिला पाहूनच मी प्रो टेबल टेनिसपटू होण्याचा निर्णय घेतला.’
श्रीजा अकुला खेळातच नाही तर अभ्यासातही खूप हुशार होती. ती ९८.७ टक्के गुणांसह इंटरमिजिएट उत्तीर्ण झाली आहे. याशिवाय तिने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे. खेळासोबतच अकुला सुरुवातीपासून अभ्यासातही खूप हुशार आहे. शाळेतील टॉपर्समध्ये ती नेहमीच राहिली आहे. श्रीजा अकुलाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये तिला हा सन्मान देण्यात आला होता. २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र दुहेरीत तिने सुवर्णपदक जिंकले होते. तिचे वडील एका विमा कंपनीत मॅनेजर आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd