Neeta Ambani Dance Video at Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने पहिले पदक जिंकून चांगली सुरुवात केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेला २६ जुलै रोजी सुरुवात झाली. पॅरिसमधील भारताच्या पॅव्हेलियनचे उद्घाटनाही २६ तारखेला करण्यात आले, ज्याचे नाव ‘इंडिया हाऊस’ असे आहे. हे इंडिया हाऊस रिलायन्स फाउंडेशनने सादर केले आहे आणि मुकेश अंबानी आणि नीता अंबानी दोघेही या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. त्याच दिवशीचा आणखी एक खास व्हिडिओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये नीता अंबानी पाहुण्यांसोबत भांगडा करताना दिसत आहे.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal: फक्त १३ सामने खेळत यशस्वी जैस्वालने केला मोठा विक्रम, ही कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ

इंस्टाग्रामरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, रिलायन्स फाऊंडेशनचे अध्यक्षा नीता अंबानी ‘गल बन गई’ आणि ‘देवा श्री गणेशा देवा’ या प्रसिद्ध गाण्यांवर थिरकताना दिसल्या. नीता अंबानींना भारताला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांसह त्या आनंद साजरा करताना दिसल्या. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीता अंबानी भांगडा करताना दिसल्या होत्या, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नीता अंबानी गुलाबी रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. नीता अंबानी यांची ऑलिम्पिकच्या सदस्यपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 3: लक्ष्य सेनचा दणदणीत विजय, सलग दोन्ही सेट जिंकले; हॉकीचा सामना बरोबरीत

नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर (IOC) दुसऱ्यांदा एकमताने निवड झाली. पॅरिस ऑलिम्पिकच्या (Olympic 2024) उद्घाटन समारंभाच्या काही दिवस आधी ही घोषणा करण्यात आली. नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली भारताला ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची वार्षिक बैठक आयोजित करण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षी मुंबईतील अंबानी कुटुंबाच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंसाठी इंडिया हाऊस बांधले जाणार आहे. ओ इंडिया हाऊस हे भारतीय खेळाडू, समर्थक आणि प्रेक्षकांसाठी बांधले जात आहे.

हेही वाचा – Paris Olympics: बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा जिंकलेला सामना ग्राह्य धरला जाणार नाही, BWF ने का घेतला असा निर्णय?

नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. कारकिर्दीतील दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात मनूला यश आले आहे. यावेळी भारतातून एकूण ११७ खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे.

Story img Loader