India at Paralympics Games Paris 2024 Updates: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने सुवर्ण आणि कांस्यपदकासह पदकांचे खाते उघडले आहे. भारताला एकाच स्पर्धेत दोन पदके मिळाली आहेत. स्टार पॅरा नेमबाज अवनी लेखरा हिने भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. तिने १० मीटर एअर रायफल SH1 अंतिम स्पर्धेत पदक जिंकले. तर मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकले.

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या दुसऱ्या दिवशी भारताने एकाच स्पर्धेत दोन पदकांची कमाई करत दणक्यात सुरूवात केली आहे. अवनी लेखरा हिने पात्रता फेरीत चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. अवनीने पात्रता फेरीत ६२५.८ गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते आणि थोडक्यात पॅरालिम्पिक विक्रमाला मुकावे लागले होते. तिचा स्कोअर पॅरालिम्पिक विक्रमापेक्षा फक्त ०.२ गुण कमी होता. तर मोना पाचव्या स्थानावर होती.

Paris Paralympic games 2024 Preethi Pal Won Bronze in Women’s T35 100m Event Marathi News
Paris Paralympics 2024: पॅरा ॲथलीट प्रीति पालने १०० मी शर्यतीत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिला भारतीय खेळाडू
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Ishita Raj Confesses Love For Hardik Pandya in Interview After His Divorce with Wife
Hardik Pandya: ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री हार्दिक पंड्याच्या प्रेमात, कबुली देत म्हणाली, “माझं त्याच्यावर प्रेम आहे…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Sachin Sarjerao Khilari won Silver Medal in Men’s Shot Put in Paris Paralympics 2024
Sachin Sarjerao Khilari: मराठमोळ्या सचिन खिलारीने पॅरिसमध्ये घडवला इतिहास, ४० वर्षांनी गोळाफेकमध्ये भारताला मिळवून दिले पदक
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
Barinder Sran Announces International Retirement
Barinder Sran: धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजाने घेतली निवृत्ती, पहिल्याच्य टी-२० सामन्यात घेतले होते ४ विकेट्स

हेही वाचा – Hardik Pandya: ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री हार्दिक पंड्याच्या प्रेमात, कबुली देत म्हणाली, “माझं त्याच्यावर प्रेम आहे…”

अवनी लेखराने २४९.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. यादरम्यान तिने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये २४९.६ गुण मिळवले होते. अवनीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल (SH1) प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. अवनीने सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. तर मोना अग्रवालने २२८.७ गुण मिळवले. या स्पर्धेतील रौप्यपदक कोरियाच्या ली युनरीला मिळाले.

हेही वाचा – धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजाने घेतली निवृत्ती, पहिल्याच्य टी-२० सामन्यात घेतले होते ४ विकेट्स

अवनी लेखराने सुवर्णकामगिरीसह घडवला इतिहास

अवनी लेखरा ही जयपूरची रहिवासी असून ती स्टार पॅरा नेमबाज आहे. एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये तिने १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले तर ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. आता पॅरिसमध्ये पदक जिंकल्यामुळे, ती आता सलग २ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरा ॲथलीट बनली आहे. १२ वर्षांपूर्वी अवनीचा एक भीषण कार अपघात झाला होता ज्यात तिला पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिच्या शरीराच्या खालचा भाग पॅरालाईझ झाला पण तिने हार मानली नाही. अभिनव बिंद्राच्या आत्मचरित्रातून प्रेरणा घेऊन तिने नेमबाजीचा सराव सुरू केला आणि आता सलग २ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडवला आहे.