Paris Paralympics 2024 India Medal Tally : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचा प्रवास संपला आहे. 8 सप्टेंबर (रविवार) रोजी, पूजा ओझा कॅनो स्प्रिंटमधील महिला KL1 200 मीटर अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. हा भारतीय खेळाडूचा या स्पर्धेतील शेवटचा सामना होता. आतापर्यंच्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील भारताची यंदाची कामगिरी चांगली होती. यावेळी भारताने विक्रमी 29 पदके जिंकली. यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत 18 व्या क्रमांकावर आहे. भारताने पदकतालिकेत स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया, बेल्जियम आणि अर्जेंटिना या देशांना मागे टाकले.

तसं पाहिलं तर भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली असून यापूर्वीचे विक्रम मोडले आहेत. यापूर्वी पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी टोकियोमध्ये झाली होती. टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताने 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदके जिंकली. त्यानंतर भारताने एकूण 19 पदकांसह 24 वे स्थान पटकावले होते. यावेळी भारताने ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक 17 पदके जिंकली, ज्यात चार सुवर्णपदकांचा समावेश आहे. यानंतर पॅरा बॅडमिंटन दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये भारताने एका सुवर्णासह 5 पदके जिंकली. तर पॅराशूटिंगमध्ये भारताने एका सुवर्णासह 4 पदके जिंकली. दुसरीकडे, भारताने पॅरा तिरंदाजीमध्ये एक सुवर्ण आणि पॅरा ज्युडोमध्ये 1 कांस्य पदकांसह 2 पदके जिंकली. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच इतकी सुवर्णपदके जिंकली आहेत.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा

यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 5 सुवर्णपदके जिंकली होती. पॅरा ॲथलीट मुरलीकांत पेटकर यांनी 1972 मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले. मुरलीकांत पेटकर हे ते आहेच, ज्यांच्या जीवनावर नुकताच ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट आला होता. नेमबाज अवनी लेखरा हिने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक जिंकले, जे सुवर्ण पदक होते. यानंतर नितेश कुमार (बॅडमिंटन), सुमित अँटिल (ॲथलेटिक्स), हरविंदर सिंग (ॲथलेटिक्स), धरमबीर (ॲथलेटिक्स), प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) आणि नवदीप सिंग (ॲथलेटिक्स) यांनीही सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळविले.

हेही वाचा – Duleep Trophy: मुशीर खान ठरला भारत ‘ब’ संघाच्या विजयाचा शिल्पकार

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते –

  1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
  2. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
  3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
  4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
  5. रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
  6. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
  7. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
  8. योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
  9. नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)
  10. मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU5)
  11. तुलसीमती मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU5)
  12. सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी (SL4)
  13. शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाउंड ओपन
  14. सुमित अंतिल (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F64 श्रेणी)
  15. नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SH6)
  16. दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 400 मीटर (T20)
  17. मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
  18. शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
  19. अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक (F46)
  20. सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, पुरुष भालाफेक (F46)
  21. सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष शॉटपुट (F46)
  22. हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्ण पदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन
  23. धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो (F51)
  24. प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो (F51)
  25. कपिल परमार (जुडो) – कांस्य पदक, पुरुष 60 किलो (जे1)
  26. प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष उंच उडी (T44)
  27. होकाटो होतोजे सेमा (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुषांचा शॉट पुट (F57)
  28. सिमरन शर्मा (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 200 मीटर (T12)
  29. नवदीप सिंग (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F41)