India at Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये भारताची अप्रतिम कामगिरी कायम आहे. पॅरालिम्पिक गेम्स २०२४ च्या ५व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीसर इतिहास घडवला. सोमवार, २ सप्टेंबर रोजी पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण ८ पदकं जिंकली आहेत. याआधी पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने एकाच दिवसात इतकी पदकं जिंकली नव्हती. यासह भारताच्या खात्यात आता एकूण १५ पदकं झाली आहेत. त्यामुळे भारताला पदकतालिकेत फायदा झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅरिस पॅरालिम्पिकच्या पदकतालिकेत भारत आता १५व्या स्थानावर आहे. ५व्या दिवसाचे सामने सुरू होण्यापूर्वी भारताच्या खात्यात ७ पदकं होती आणि देश २७व्या स्थानावर होते. भारताने आतापर्यंत एकूण ३ सुवर्णपदकं पटकावली आहेत, जी नेमबाजी, पॅरा बॅडमिंटन आणि भालाफेकमध्ये मिळवली आहेत.

हेही वाचा – Harbhajan Singh: “धोनी खेळाडूंशी बोलत नाही, तर रोहित…” भारतीय कर्णधारांवर हरभजन सिंगचे वक्तव्य, सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून ‘या’ खेळाडूला पसंती

ॲथलेटिक्समध्ये भारताची आश्चर्यकारक कामगिरी

योगेश कथुनियाने पॅरालिम्पिक २०२४ च्या ५व्या दिवशी भारतासाठी पदक मिळविण्याची सुरुवात केली, त्याने पुरुषांच्या डिस्कस थ्रो F56 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकले. याशिवाय भारताने ५व्या दिवशी दोन सुवर्णपदकं जिंकली. ज्यामध्ये सुमित अंतिलने भारताच्या सुवर्णपदकांची संख्या तीनवर नेली, त्याने पॅरालिम्पिक २०२४ च्या F64 फायनलमध्ये विक्रमी ७०.५९ मीटरच्या सर्वोत्तम भालाफेकसह सुवर्णपदक जिंकले.

हेही वाचा – Nitesh Kumar Won Gold: बॅडमिंटनमध्ये नितेश कुमारने पटकावलं सुवर्णपदक, जर्सी काढत गांगुली स्टाईल केलं सेलिब्रेशन; पाहा VIDEO

बॅडमिंटनमध्ये भारताने जिंकली सर्वाधिक पदकं

भारताने ५व्या दिवशी बॅडमिंटनमध्ये सर्वाधिक पदकं जिंकली. पॅरा बॅडमिंटन स्टार नितेश कुमारने पुरुष एकल SL3 पॅरा बॅडमिंटन अंतिम सामना जिंकून भारतासाठी दुसरे सुवर्णपदक जिंकले. बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारा तो एकमेव खेळाडू नव्हता, कारण सुहास यथीराज (SL4) आणि थुलासिमाथी मुरुगेसन (SU5) यांनी रौप्यपदक जिंकले, तर मनीषा रामदास (SU5) यांनी कांस्यपदक जिंकले. दरम्यान, नित्या श्री सिवनने SH6 महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. हाताविना तिरंदाजी करणारी भारताची उत्कृष्ट तिरंदाज शितल देवी आणि अनुभवी राकेश कुमार यांनी पॅरा तिरंदाजी मिश्र सांघिक कंपाऊंड स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.

हेही वाचा – Paralympics 2024 : महिला बॅडमिंटनपटूंची शानदार कामगिरी, तुलसीमतीने रौप्यपदक तर मनीषाने पटकावले कांस्यपदक

Paris Paralympics 2024 Medal Tally : ५व्या दिवसानंतर कशी आहे पदकतालिका?

पॅरालिम्पिक गेम्स २०२४ च्या खेळाच्या ५व्या दिवसानंतर आपण पदकतालिकेवर एक नजर टाकल्यास, चीन पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात एकूण ८७ पदके आहेत. ज्यामध्ये ४३ सुवर्ण, ३० रौप्य आणि १४ कांस्यपदकांचा समावेश आहे. ग्रेट ब्रिटन दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी २९ सुवर्ण, १५ रौप्य आणि १० कांस्य पदके जिंकली आहेत. अमेरिका ४२ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ज्यामध्ये १३ सुवर्ण, १९ रौप्य आणि १० कांस्य पदके आहेत. तर भारत ३ सुवर्णपदकं, ५ रौप्यपदकं आणि ७ कांस्यपदकांसह एकूण १५ पदके जिंकत १५ व्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris paralympics 2024 medal tally india won 8 medals on day 5 javelin throw sumit antil and badminton gold medal bdg