Paris Paralympics 2024, Navdeep Singh and Simran Sharma: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची जबरदस्त घोडदौड सुरूच आहे. ७ सप्टेंबर (शनिवारी) रोजी पुरूषांच्या भालाफेक स्पर्धेत (F41) भारताच्या नवदीप सिंहने सुवर्ण पदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचे सुवर्ण पदक हुकले. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र नवदीपने पॅराऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत प्रथमच सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम करून दाखविला आहे. खरंतर नवदीपला आधी रौप्य पदकाची घोषणा झाली होती. मात्र इराणचा खेळाडू अपात्र ठरल्यामुळे नवदीपच्या रौप्य पदकाला सुवर्णमध्ये बढती मिळाली. तसेच महिलांच्या २०० मीटर (T12) धावण्याच्या स्पर्धेत भारताची धावपटू सिमरन शर्माने कास्य पदकाची कमाई केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in