Rubina Francis won bronze medal in Paris Paralympics 2024 : रुबिना फ्रान्सिसने चमकदार कामगिरी करत पॅरालिम्पिक २०२४ च्या तिसऱ्या दिवशी पाचवे पदक जिंकून दिले. रुबिनाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल एसएचवन फायनलमध्ये २११.१ स्कोअरसह कांस्यपदक जिंकले. रुबिनाने पात्रता फेरीत सातवे स्थान पटकावले होते, मात्र तिने अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली. या पॅरालिम्पिकमधील नेमबाजीतील भारताचे हे चौथे पदक आहे.

रुबिना फ्रान्सिसने पूर्वी अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएसवन स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे, तर मोनाने कांस्यपदक जिंकले. त्याचवेळी मनीष नरवालने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल एसएचवन प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा

२५ वर्षीय रुबिना पात्रता फेरीत अव्वल आठ नेमबाजांपेक्षा मागे पडली होती पण तिने शेवटी वेग दाखवला आणि पदकाची शर्यत गाठली. तिने पात्रता फेरीत ५५६ गुणांसह सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मध्य प्रदेशातील ही नेमबाज तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकच्या पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहिली होती आणि त्यानंतर अंतिम फेरीतही सातव्या स्थानावर राहिली होती, पण पॅरिसमध्ये रुबिनाने टोकियोच्या अपयश मागे सोडत कांस्यपदक मिळवण्यात यश मिळवले.

हेही वाचा – DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम

बॅडमिंटनमध्ये भारताचे पदक निश्चित –

बॅडमिंटनमधील भारताचे पदक निश्चित झाले आहे. सुकांत कामने थायलंडच्या सिरपॉन्गचा २१-१२, २१-१२ असा पराभव केला. त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. सुकांतसोबत सुहासनेही पात्रता मिळवली आहे. मनदीप कौरने बॅडमिंटन महिला एकल एसएलथ्री मधील गट ब सामना जिंकला आहे. मनदीपसमोर ऑस्ट्रेलियाच्या सेलीन विनॉटचे आव्हान होते. मनदीपने हा सामना २१-२३, २१-१०, २१-१७ असा जिंकला.

हेही वाचा – DPL 2024 : आयुष बदोनीने खेळली भारतीय T20 इतिहासातील सर्वात मोठी खेळी, मोडला श्रेयस अय्यरचा विक्रम

स्वरूप उन्हाळकर आणि अर्शद शेखच्या पदरी निराशा –

भारतीय पॅरा सायकलपटू अर्शद शेखने पुरुषांच्या C1-3 1000 मीटर टाइम ट्रायल पात्रतेमध्ये ११वे स्थान पटकावले आणि त्याला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. अर्शदने १:०२:३७७ मिनिटे वेळ घेतला. या स्पर्धेत अव्वल सहा क्रमांक मिळवणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएचवनच्या पात्रता फेरीत भाग घेणारा भारतीय नेमबाज स्वरूप महावीर उन्हाळकर अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. पात्रता फेरीत, तो ६१३.४ गुणांसह १४ व्या स्थानावर राहिला, तर शीर्ष ८ खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला.