आयपीएल २०२१ स्पर्धेतील ३१ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात कोलकात्याने बाजी मारली. या सामन्यात विराटचा संघ १९ षटकात सर्वबाद ९२ धावा करू शकला. हे आव्हान कोलकात्याने १० षटकातच पूर्ण केलं. या सामन्यात विराटचा खराब फॉर्म पुन्हा एकदा दिसला. या सामन्यात विराट ४ चेंडूत अवघ्या ५ धावा करून तंबूत परतला. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये विराटच्या खराब फॉर्मची चर्चा सुरु झाली आहे. यावर माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल याने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“असं नाही की विराट पहिल्यांदा असा बाद झाला आहे. मात्र ज्या फॉर्ममध्ये आणि मेंटल स्पेसमध्ये तो आहे, त्यामुळे त्याच्याकडून चेंडू मिस होत आहे. मला वाटते आम्ही याबाबतीत जरा जास्त विश्लेषण करत आहोत. जर तो फॉर्मात असता तर त्याने मिड ऑनपासूनन फाइन लेगपर्यंत चौकार मारला असता. त्याच्या हेड पोझिशनबाबत जास्त चर्चा करण्याची गरज मला वाटत नाही. हा तितका खराब नव्हता, जितकं आपण चर्चा करत आहोत”, असं पार्थिव पटेलने सामना संपल्यानंतर स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं.

RCB vs KKR : हा खेळाडू भारतीय संघाचं भविष्य आहे; दारुण पराभव झाल्यानंतर विराटचं वक्तव्य

टीम इंडियाच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विराटने आयपीएल २०२१ नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराट लीगच्या पहिल्या हंगामापासून म्हणजेच २००८ पासून आरसीबी संघासोबत आहे. त्याने २०१३ मध्ये संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आजपर्यंत आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही. त्याने आतापर्यंत १९९ सामने खेळले आहेत आणि ३७.९७च्या सरासरीने ६०७६ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ५ शतके आणि ४० अर्धशतके आहेत.