Parthiv Patel big statement on RCB: आयपीएलमधील प्रसिद्ध संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ या स्पर्धेच्या पहिल्या सीझनपासून खेळत आहे. पण तरीही एकदाही आरसीबीला ट्रॉफी जिंकता आलेली नाही. या लीगमध्ये, RCB ही एक अशी फ्रँचायझी आहे ज्याची फॅन फॉलोइंग सर्वात विश्वासार्ह मानली जाते. संघ जिंको वा हरो, चाहत्यांनी नेहमीच त्यांना साथ दिली आहे. पण सर्वात मोठी निराशा म्हणजे आरसीबीला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडू या संघाचा भाग असूनही त्यांना एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. पण आता आरसीबी संघातून खेळलेला पार्थिव पटेलने संघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – VIDEO: सचिन तेंडुलकरने धोनीचे नाव कर्णधारपदासाठी सुचवण्यामागचं सांगितलं खरं कारण: म्हणाला, “त्यावेळेस माझी…”

RCB च्या संघामध्ये विश्वविध्वंसक ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली सारखे खेळाडू संघाचे भाग राहिले आहेत, पण काय कारण आहे की हा संघ चॅम्पियन होऊ शकला नाही. या संघाचा भाग असलेवा आरसीबीचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने एक आश्चर्यकारक खुलासा करत आरसीबी संघाला विजेतेपद का मिळवता आले नाही, हे सांगितले.

हेही वाचा – Rohit Sharma: T20WC मधील अखेरच्या ५ षटकांत रोहित शर्माच्या मनात नेमकं काय सुरू होत? उत्तर देताना म्हणाला…

आरसीबीने ट्रॉफी न जिंकण्याचे मुख्य कारण म्हणजे स्टार खेळाडूंना जास्त महत्त्व देणे, असे पार्थिव पटेलचे मत होते. संघाबाबत एका पोडकास्टमध्ये बोलताना पार्थिव पटेल म्हणाला, “मी चार वर्षे आरसीबीसाठी खेळलो आहे. तिथे नेहमीच संघापेक्षा जास्त एखाद्या खेळाडूला महत्त्व दिले जायचे. या फ्रँचायझीमध्ये नेहमीच स्टार्सना प्राधान्य दिले जात होते. मला संघभावना कधी दिसली नाही. मी जेव्हा या फ्रँचायझीमध्ये होतो तेव्हा संघ म्हणजे फक्त विराट कोहली, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलयर्स होते. त्यामुळे संघ संस्कृती कधीच नव्हती, त्यामुळे आरसीबीला कधी आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

हेही वाचा – Hardik Pandya: कर्णधार रोहितची शर्माच्या जागी कोण? सूर्यकुमार का हार्दिक? बीसीसीआयचा खल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अनेकदा शानदार कामगिरी केली आहे. पण तरीही ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यात संघ कायमचं अयशस्वी राहिला आहे. आयपीएल २०२४मध्ये सलग सहा सामने गमावूनही आरसीबीने आश्चर्यकारक कमबॅक करत प्लेऑफमध्ये आपली जागा बनवली, पण उपांत्य फेरीतील सामना गमावला. आयपीएलमध्ये आतापर्यंत या संघाने तीनदा अंतिम फेरी गाठली, परंतु दुर्दैवाने तिन्ही वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या लीगमध्ये, फ्रँचायझी ८ वेळा ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली होती, तर ६ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यश मिळवले होते, परंतु त्यांना एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parthiv patel statement on why rcb cant win ipl trophy said its all about virat kohli ab de villiers chris gayle watch video bdg