Parul Chaudhary finished 11th in the 3000m steeplechase: जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ समाप्त झाली आहे, ज्यामध्ये अनेक भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतासाठी, पारुल चौधरीने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला आणि ११ व्या स्थानावर राहिली. या विक्रमासह पारुल २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

भारताच्या पारुलने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ११ वा क्रमांक पटकावला. तिने ही शर्यत ९ मिनिटे १५.३१ सेकंदात पूर्ण केली. त्याच वेळी, ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये, ब्रुनेईच्या विन्फ्रेड मुटाइल यावीने ८ मिनिटे ५४.२९ सेकंदांसह शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. याशिवाय केनियाच्या बीट्रिस चेपकोचने ८ मिनिटे ५८.९८ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदक जिंकले. त्याचवेळी केनियाचा आणखी एक खेळाडू फेथ चोरोटिचने कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले. चोरोचितने ९ मिनिटे ००.६९ अशी आपली सर्वोत्तम स्कोएर नोंदवला आणि कांस्यपदक जिंकले.

पारुलची सुरुवात चांगली झाली, नंतर वेग झाला कमी –

दुसरीकडे, पारुलच्या ३००० मीटर स्टीपलचेसबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीला २०० मीटरपर्यंत तिने जबरदस्त लयीत दिसले आणि प्रथम क्रमांक राखला, पण हळूहळू तिचा वेग कमी होत गेला आणि शेवटी तिला या स्पर्धेत ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले. पारुल २९०० मीटरपर्यंत शर्यतीत १३व्या क्रमांकावर होती, मात्र उर्वरित १०० मीटरमध्ये तिने आपला वेग वाढवला आणि ११व्या स्थानावर राहिली.

हेही वाचा – Asia Cup 2023: वसीम जाफरने संघ व्यवस्थापनाला दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, सूर्यकुमार यादवला ‘या’ क्रमांकावर खेळवा

नीरज चोप्राने जिंकले सुवर्णपदक –

त्याचबरोबर जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले. नीरजने ८८.१७ मीटर भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकले. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा पहिला खेळाडू होता. दुसरीकडे, पाकिस्तानचा अर्शद नदीम ८७.८२ गुणांसह दुसरा आला आणि त्याला रौप्यपदक मिळाले.