इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यपने सर्वोत्तम खेळीचा नजराणा पेश करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीनच्या चेन लाँगवर मात केली. बॅडमिंटन पुरूष एकेरीत कश्यपने दुसऱयांना चेन लाँगला धुळ चारली आहे. तब्बल ६३ मिनिटांच्या या चुरशीच्या लढाईत पहिल्या सेटमध्ये १४-२१ अशी निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर कश्यपने पुढील दोन सेटमध्ये २१-१७, २१-१४ असे दमदार पुनरागमन करत चेन लाँगला धक्का दिला. या विजयासह कश्यपने स्पर्धेच्या उपांत्यफेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

Story img Loader