आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकाता शहरात पार पडला. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सवर कोलकाता नाईट रायडर्सने १५ कोटी ५० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं. पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे, त्याने इंग्लंडच्या बेन स्टोक्सचा विक्रम मोडला.

कोट्यवधीची बोली लागल्यानंतर, पॅट कमिन्सच्या गर्लफ्रेंडने आता तिच्या शॉपिंगची लिस्ट तयार केली आहे. खुद्द पॅट कमिन्सने याबद्दल माहिती दिली. “मी लिलाव पाहत होतो आणि काही क्षणांसाठी माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. माझी गर्लफ्रेंड मला म्हणाली, की आता आपण कुत्र्यांसाठी अधिक खेळणी विकत घेऊ शकतो”, पॅट कमिन्स एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होता.

तेराव्या हंगामाच्या लिलावात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचं वर्चस्व पहायला मिळालं. कमिन्ससोबत कुल्टर-नाईल, शेल्डन कॉट्रेल यासारख्या खेळाडूंनाही या लिलावात कोट्यवधीच्या बोली लागल्या. त्यामुळे आगामी हंगामात पॅट कमिन्सच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 Auction : सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या पॅट कमिन्सची प्रतिक्रिया, म्हणाला…

Story img Loader