Pat Cummins give Glenn Maxwell Injury Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३९ वा सामना ७ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात चांगली कामगिरी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. मात्र, या सामन्यात त्याला दुखापतही झाली. सामन्यादरम्यान तो क्रॅम्पसह फलंदाजी करताना दिसला. आता पुढच्या सामन्यात तो सहभागी होणार की नाही हा प्रश्न आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पॅट कमिन्स म्हणाला, ‘मॅक्सवेल ठीक आहे. आम्ही सतत त्याच्या दुखापतीचा आढावा घेत आहोत. आज झालेल्या धावांचा पाठलाग त्याने एकट्याने केला होता. वेदना होत असतानाही आपण काय करू शकतो हे त्याने दाखवून दिले. माझ्या मते, त्याने संघासाठी काय केले ते तुम्ही पाहावे. संघासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो.”
पुण्यातील एमसीए स्टेडियमवर शनिवारी (१२ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशविरुद्ध गटातील शेवटचा सामना होणार आहे. पाचवेळा चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी आधीच पात्र ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यासाठी पॅट कमिन्स आपला स्टार खेळाडू मॅक्सवेलला विश्रांती देऊ शकतो.
हेही वाचा – ENG vs NED, World Cup 2023: जो रुट विचित्र पद्धतीने ‘क्लीन बोल्ड’ झाल्याने चाहत्यांनी धरलं डोकं, VIDEO होतोय व्हायरल
मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले –
अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल वेगळ्या शैलीत दिसला. स्फोटक फलंदाजी करत त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. सामन्यादरम्यान सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने एकूण १२८ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने १५७.०३ च्या स्ट्राइक रेटने नाबाद २०१ धावा काढल्या. या कालावधीत त्याच्या बॅटमधून २१ चौकार आणि १० उत्कृष्ट षटकार आले.
सामन्याबद्दल बोलायचे, तर एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ३९ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला.
हेही वाचा – World Cup 2023: सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी! सांगितले उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणत्या संघाशी होणार?
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ५० षटकांत ५ गडी गमावून २९१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४६.५ षटकांत सात विकेट गमावत २९३ धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह कांगारू संघाने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला आहे. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे.