पाटणा पायरेट्सने यजमान बंगाल वॉरियर्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर ३६-३१ असा पराभव करून सलग पाचव्या विजयासहित प्रो कबड्डी लीगमध्ये अपराजित राहत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे.
मंगळवारी झालेल्या या सामन्यात पाटण्यावर दोनदा लोण पडण्याची नामुष्की ओढवणार होती. परंतु प्रथम १४व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या राजेश मोंडलने बोनससहित तीन गुण मिळवत पाटणाला वाचवले, तर दुसऱ्यांदा १९व्या मिनिटाला रोहित कुमारने बोनससहित चार गुण घेत पाटण्याचा संघर्ष दाखवून दिला. याच दोन निर्णायक क्षणांनंतर पाटण्याने अनुक्रमे २२व्या आणि ३१व्या मिनिटाला असे दोन लोण चढवण्याची किमया साधली. पाटण्याकडून रोहितने चढायांचे सर्वाधिक १० गुण मिळवले. त्याला संदीप नरवालच्या पकडींची सुरेख साथ लाभली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचे सामने
यू मुंबा वि. बंगळुरू बुल्स
बंगाल वॉरियर्स वि. जयपूर पिंक पँथर्स
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ व एचडी २, ३.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patna pirates defeat bengal warriors to remain unbeaten
Show comments