बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. त्याने कायलल जेमिसनला ५ चौकार ठोकले. त्याने २४ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. त्याचं अर्धशतक अवघ्या ४ धावांनी हुकलं. ख्रिस गेलच्या आक्रमक खेळीमुळे बंगळुरुच्या गोलंदाजावर दडपण स्पष्ट दिसत होतं. कारण गेलनं मैदानात तग धरला तर मात्र काही खरं नाही याची जाणीव त्यांना होती.
केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागिदारी केली. आक्रमक खेळी करणारा ख्रिस गेल ४६ धावा करुन बाद झाला. या खेळीत ख्रिस गेलनं कायल जेमिसनच्या गोलंदाजीवर ५ चौकार ठोकले. कायलच्या षटकात २० धावा आल्या.
Nothing much just @henrygayle ing around #SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 #PBKSvRCB pic.twitter.com/MEXC0hrLO5
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 30, 2021
ख्रिस गेलच्या आक्रमक खेळीमुळे बंगळुरुच्या गोलंदाजांवर दडपण आलं होतं. मात्र डॅनियल सॅमच्या गोलंदाजीवर एबी डिव्हिलियर्सने यष्टीमागे त्याचा झेल घेतला. ख्रिस गेल बाद झाल्याने बंगळुरुच्या गोलंदाजांचा जीव भांड्यात पडला आहे.
आयपीएलमध्ये या फलंदाजांनी मारलेत एका षटकात ५ चौकार
IPL २००८- शेन वॉटसन VS आरसीबी (अधिक एक षटकार)
IPL २००९- अॅडम गिलक्रिस्ट VS दिल्ली डेअरडेविल्स
IPL २०१०- महेला जयवर्धने VS डेक्कन चार्जर्स
IPL २०११- अॅडन ब्लिजार्ड VS दिल्ली डेअरडेविल्स
IPL २०१३- ख्रिस गेल VS पुणे वॉरियर्स
IPL २०१४- सचिन तेंडुलकर VS कोलकाता नाइटराइडर्स
IPL २०१४- डेविड वॉर्नर VS सीएसके
IPL २०१४- सुरेश रैना VS पंजाब किंग्स<br />IPL २०१६– शेन वॉटसन VS रायजिंग पुणे सुपरजायंट्स
IPL २०२१- ख्रिस गेल VS आरसीबी
तर दिल्लीच्या पृथ्वी शॉनं कोलकाताच्या शिवम मावीला एका षटकात ६ चौकार ठोकले होते. अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी अजिंक रहाणने आरसीबीविरोधात २०१२ ला अशी किमया केली होती.