Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या बदलाचा काळ सुरू आहे. संघाच्या कामगिरीतही सातत्याने घट होत आहे. त्याबरोबरच पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्येही बदल घडत आहेत. वकार युनूसची नुकतीच पीसीबीच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर त्यांनी राजीनामाही दिला. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – VIDEO: सचिन तेंडुलकर आणि ‘बाकरवडी-चहा’, नवी जाहिरात का करतेय प्रेक्षकांना भावुक?
बांगलादेशकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानची मोठी घोषणा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सोमवारी अनुभवी खेळाडू मिसबाह-उल-हक, सकलेन मुश्ताक, सर्फराज अहमद, शोएब मलिक आणि वकार युनूस यांची चॅम्पियन्स कप देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पाच संघांसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली. पीसीबीने दिलेल्या निवेदनानुसार या सर्व खेळाडूंना तीन वर्षांच्या करारावर मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
हेही वाचा – BCCI Secretary: कोण होणार बीसीसीआय सचिव? दिवंगत भाजपा नेत्याच्या मुलाची चर्चा
सकलेन मुश्ताक हे राष्ट्रीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आहेत. मिसबाह अल हक आणि वकार युनूस यांनीही राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. पीसीबीने सांगितले की मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलेल्या सर्व माजी खेळाडूंची पहिली स्पर्धा चॅम्पियन्स एकदिवसीय चषक असेल जी १२ ते २९ सप्टेंबर दरम्यान फैजलाबाद येथे खेळली जाईल.
हेही वाचा – VIDEO: रागाच्या भरात कार्लाेस ब्रेथवेटने बॅटने हेल्मेटला चेंडूप्रमाणे उडवलं, हेल्मेट थेट सीमारेषेबाहेर
PCB ने आपल्या सर्व अव्वल खेळाडूंना या ५० षटकांच्या स्पर्धेत भाग घेणे अनिवार्य केले आहे. वकार युनूस जे पीसीबीचा सल्लागार होते, यांनी आता राष्ट्रीय संघाचे मार्गदर्शकपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली पण ते आता संघाचे मार्गदर्शक का नसणार, याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. पीसीबीने स्पष्ट केले आहे की, सरफराज आपली खेळण्याची कारकीर्द सुरू ठेवणार असून तो मार्गदर्शकाची भूमिकाही बजावणार आहे.
हेही वाचा – PAK vs BAN: बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो? काय आहे समीकरण?
दरम्यान, बांगलादेशविरुद्ध १० गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघावर टीकाकारांकडून हल्ला होत आहे. पाकिस्तानने शेवटचा मायदेशात कसोटी सामना जिंकून १,२९४ दिवस झाले आहेत. त्यांच्या पराभवामुळे संघाच्या खराब कामगिरीची जोरदार चर्चा रंगली आहे. बांगलादेशने पाकिस्तानला पहिल्यांदाच कसोटीत पराभूत केले आहे. विशेष म्हणजे रावळपिंडी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने ५ गड्यांच्या मोबदल्यात ४४८ धावा करून डाव घोषित केला.
बांगलादेशने प्रत्युत्तरात शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी करत सामना फिरवला. आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू त्यांच्या संघावर टीका करत आहेत. संघात फिरकीपटूचा समावेश न करण्याच्या निर्णयाबाबत शान मसूद आणि कोचिंग स्टाफ बचावात्मक असल्याचे दिसून येत आहे.