Pakistan cricket Team: एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बाबर आझम आणि त्याच्या संपूर्ण संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या कमाईतील हिस्सा खेळाडूंना देण्याचे मान्य केले आहे. पाकिस्तानी खेळाडूंसाठी हा ऐतिहासिक विजय आहे. त्यामुळे खेळाडूंना लाखोंची कमाई करण्याची संधी मिळणार आहे.
विश्वचषकासाठी भारताला रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बाबर यांनी त्यांच्याशी या कराराबाबत चर्चा केली. या संमतीच्या बदल्यात, टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना एनओसी देण्याचा अधिकार पीसीबीकडे राहील.
हे प्रकरण सोडवण्यासाठी पीसीबीने मुख्य निवडकर्ता इंझमाम-उल-हक यांना दोन्ही पक्षांमधील मध्यस्थ म्हणून नियुक्त केले होते. त्याचवेळी कर्णधार बाबर खेळाडूंचे प्रतिनिधित्व करत आहे. अखेरच्या क्षणी पीसीबीने खेळाडूंसाठी हा करार मंजूर केला आहे. मात्र, अद्याप कागदपत्रांवर खेळाडूंच्या सह्या घेण्यात आलेल्या नाहीत. विश्वचषकातून परतल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. नवीन करारानुसार, बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांना PKR ४.५ दशलक्ष दिले जातील कारण ते श्रेणी A मध्ये आहेत. तर, श्रेणी ब खेळाडूंना PKR ३ दशलक्ष मिळतील. याशिवाय, उर्वरित दोन श्रेणीतील खेळाडूंना १.५ ते ०.७ दशलक्ष पीकेआर मासिक दिले जातील.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा हा केंद्रीय करार असेल
केंद्रीय करार केलेले खेळाडू पीसीबी साठी आयसीसीच्या कमाईतील वाटा ३ टक्के मिळवतील.
पीसीबी आयसीसीच्या महसूल वाट्यामधून $३४.५१ दशलक्ष कमावणार आहे. त्यामुळे, खेळाडूंमध्ये $१.०३ दशलक्ष शेअर केले जातील.
क्रिकेट पाकिस्तानच्या अहवालानुसार, बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान हे श्रेणी A मध्ये असल्याने त्यांना मासिक ४५ लाख रुपये मिळतील.
बी श्रेणीतील खेळाडूंना दरमहा PKR ३० लाख मिळतील.
सी आणि डी श्रेणीतील खेळाडूंना PKR १५ लाख ते PKR ७ लाखांपर्यंत मासिक पेआउट मिळेल.
मात्र, सर्व खेळाडूंना १० टक्के कर देखील भरावा लागेल.
भारत-पाकिस्तान सामना कधी होणार?
५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याच मैदानावर विजेतेपदाचा सामनाही होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या मोहिमेची सुरुवात होईल. त्याचवेळी १४ तारखेला पाकिस्तानशी सामना होणार आहे.