Najam Sethi says not to play matches at Narendra Modi Stadium: पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आयसीसीचे चेअरमन ग्रेग बार्कले यांच्यासमोर एक नवीन अट ठेवली आहे. तसेच त्यांनी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध खेळण्याबद्दल आपली भीती व्यक्त केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पाकिस्तानला आपले सामने कोलकाता, चेन्नई आणि बेंगळुरू येथे खेळायचे आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामने खेळायचे नाहीत.

उल्लेखनीय म्हणजे, आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले आणि आयसीसीचे महाव्यवस्थापक ज्योफ अॅलार्डिस यांनी अलीकडेच पीसीबी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ज्यामध्ये पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या सामन्यांसाठी तटस्थ ठिकाणे शोधणार नाहीत, असे आश्वासन घेतले होते. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या नेतृत्वाखालील एसीसीने ‘हायब्रीड मॉडेल’वर आशिया कप सामने आयोजित करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळली आहे.

Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Omprakash Rajenimbalkar likely to join Mahayuti minister Pratap Sarnaik
“खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर महायुतीचेच!”, पालकमंत्र्यांकडून ‘ऑपरेशन टायगर’चे संकेत
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, भाषणात म्हणाले; “यावेळी मला सूड…”
Saif Ali Khan private security increased after attack Mumbai news
हल्ल्यानंतर सैफ व करीना दोघांनाही सुरक्षा; खासगी सुरक्षेतही वाढ
Saif Ali Khan
सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपास अधिकारी बदलला; आता यांच्यावर असेल जबाबदारी
ICC Responds As BCCI Says No To Pakistan Name Written On Team India Champions Trophy Jersey
Champions Trophy: भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जर्सीवर पाकिस्तानचं नाव असणार की नाही? ICC ने स्पष्टच सांगितलं
Khalistanis Strom Against Movie Emergency in UK
Khalistanis Strom Emergency : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ विरोधात खलिस्तान्यांची लंडनमध्ये निदर्शनं; पोलीस म्हणाले, “तो त्यांचा अधिकार”

पाकिस्तानला अहमदाबादमध्ये फक्त बाद फेरी किंवा अंतिम सामना खेळायचाय –

पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “नजम सेठी यांनी बार्कले आणि अल्लार्डाईसला कळवले आहे की, पाकिस्तानला नॉकआउट किंवा अंतिम प्रकारचा सामना असल्याशिवाय अहमदाबादमध्ये सामना खेळायचा नाही. त्यांनी आयसीसीला विनंती केली आहे की, जर पाकिस्तान सरकारने त्यांना भारत वर्ल्ड कप खेळण्याची परवानगी दिली, तर पाकिस्तानचे सामने चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता येथे आयोजित केले जावेत.”

हेही वाचा – IND vs AUS: ट्रॅव्हिस हेडने झळकावले शानदार शतक! डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच खेळाडू

अहमदाबादमध्ये संघाच्या सुरक्षेबाबत पीसीबी चिंतेत –

अहमदाबादमध्ये संघाच्या सुरक्षेबाबत पाकिस्तान बोर्ड चिंतेत आहे. मात्र, २००५ मध्ये इंझमाम-उल-हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ मोटेरा येथे सामना खेळला होता. आयसीसीच्या महसुलातील पाकिस्तानचा वाटा पुढील पाच वर्षांच्या चक्रासाठी न वाढल्यास नवीन महसूल मॉडेल स्वीकारणार नाही, असेही सेठी यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader