पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी “नुकतेच भारताने आम्हाला आदर देण्यास सुरुवात केली आहे”, असे विधान केले. याआधी त्यांनी आणखी एका वक्तव्यात म्हटले होते की, आम्ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघाचा पराभव केला आहे. टीम इंडिया आगामी टी२० विश्वचषकासाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेतील ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी झालेल्या टी२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा १० विकेट्सने पराभव केला होता. त्या सामन्यात पाकिस्तान संघासाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शानदार फलंदाजी केली.”
पाकिस्तानचे क्रिकेट अध्यक्ष आणि माजी कर्णधाराने याच गोष्टीचा आधार घेत पाकिस्तानने भारताला पराभूत करण्याबद्दल म्हटले आहे की, “हा कौशल्य आणि प्रतिभेपेक्षा मानसिक सामना आहे. त्यामुळे जर तुम्ही तात्पुरते मजबूत आणि केंद्रित असाल आणि हार मानायला तयार नसाल तर लहान संघही मोठ्या संघाला हरवू शकतो. आणि जेव्हा-जेव्हा भारतासोबत सामने झाले तेव्हा पाकिस्तान नेहमीच अंडरडॉग राहिला आहे. पण ते पूर्वीचे होते, आता भारताने आम्हाला मान द्यायला सुरुवात केली आहे. कारण पाकिस्तान आपल्याला कधीही पराभूत करू शकत नाही, असा त्यांचा विचार होता. म्हणून मी म्हणतो की, पाकिस्तानला श्रेय द्या कारण आम्ही एक अब्ज डॉलरच्या संघाचा, क्रिकेट उद्योगाचा पराभव केला आहे. मी स्वतः विश्वचषक खेळलो आहे, आम्ही भारताला हरवू शकलो नाही. याचे श्रेय या संघाला द्यायला हवे कारण मर्यादित संसाधने असूनही हा संघ भारताशी स्पर्धा करतो.”
गतवर्षी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाकडून भारताला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ यावर्षी ऑगस्ट महिन्यात आशिया चषकात आमनेसामने आले होते. साखळी फेरीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता, तर सुपर-४ मध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता, असे सांगताना. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांनी याबाबत आपले वक्तव्य केले आहे.
रमीझ राजा पुढे म्हणाले की, “क्रिकेटमध्ये जर एखादा संघ मानसिकदृष्ट्या मजबूत असेल आणि तो संघ पराभव स्वीकारण्यास तयार नसेल तर लहान संघही मोठ्या संघाला पराभूत करू शकतो. मी स्वतः विश्वचषक खेळलो आहे, असेही रमीज म्हणाले, ‘आम्ही भारताला हरवू शकलो नाही. याचे श्रेय या संघाला (पाकिस्तान संघ) द्यायला हवे.”