ICC Champions Trophy 2025, PCB: २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मोठा दावा केला आहे. त्यांनीयजमानपद मिळाल्याची पुष्टी केली आहे. पीसीबीने यजमानपद हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये हे सिद्ध झाले आहे. यावर जर बीसीसीआयची आतापर्यंतची भूमिका पाहिली तर ते आपला संघ तिथे खेळायला पाठवणार नाहीत. आशिया चषकासाठीही त्यांनी आपला संघ पाठवला नव्हता. अशा परिस्थितीत पाकिस्तानला हायब्रीड मॉडेल अंतर्गत यजमानपद भूषवावे लागले. भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते.

पीसीबीने शुक्रवारी सांगितले की, “दुबई येथे झालेल्या आयसीसीच्या चर्चेदरम्यान२०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेबरोबर(आयसीसी) होस्टिंग राइट्स म्हणजेच यजमानपदाचे हक्क पाकिस्तान मिळाले या करारावर स्वाक्षरी केली आहे.” या स्पर्धेसाठीच्या करारावर सध्या पीसीबीच्या कामकाजाचे प्रभारी असलेले झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केली आहे. क्रिकेट बोर्ड चालवणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट व्यवस्थापन समितीचे ते प्रमुख आहेत. पाकिस्तानने १९९६ पासून आयसीसी स्पर्धेचे आयोजन केलेले नाही.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Champions Trophy Tour Updates PoK cities removed from ICC global Trophy Tour
Champions Trophy : भारतापुढे पाकिस्तानने घेतलं नमतं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या टूरमधून POK वगळलं
ICC Asks PCB to Cancels Champions Trophy 2025 Tour in POK After BCCI Objection
Champions Trophy: ICC चा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का, POK मधील ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ करंडकाचा दौरा रद्द करण्याचे दिले आदेश
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
Champions Trophy Mohammed Hafeez Big Statement About India wont travel to Pakistan Said Somehow Not Secure for India
Champions Trophy: “भारतीय संघासाठी पाकिस्तान सुरक्षित नाही…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या पोस्टने उडाली खळबळ, PCBला दाखवला आरसा
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ

पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, “आयसीसी मुख्यालयातील एका कार्यक्रमात पीसीबी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ यांच्यासह आयसीसीचे जनरल काउंसिल जोनाथन हॉल यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे.” पाकिस्तानने १९९६ मध्ये शेवटचे आयसीसी स्पर्धेचे आयोजन केले होते, त्यावेळी भारत आणि श्रीलंकेसह पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते.

२००९च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०११च्या विश्वचषक सामन्यांचे यजमानपद पाकिस्तानला देण्याची हमी देण्यात आली होती, परंतु मार्च २००९ मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकन संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही स्पर्धा देशातून हलवण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: IND W vs ENG W: म्हारी छोरी छोरोसे..! भारतीय महिला संघाने रचला इतिहास, तब्बल ३४७ धावांनी इंग्लंडला चारली धूळ

पाकिस्तानसमोर हे सर्वात मोठे आव्हान आहे

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवण्याचे पाकिस्तानसमोर सर्वात मोठे आव्हान भारत सरकार आपल्या संघाला खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्याची परवानगी देईल की नाही, हे आहे. २००८च्या संपूर्ण आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानने दिले होते आणि त्यावेळी भारत पाकिस्तानमध्ये शेवटची मालिका खेळायला गेला होता.

हेही वाचा: IND vs SA: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी-दीपक चाहरची दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार

पीसीबीने निवेदनात पुढे म्हटले आहे की, “चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघांना सर्व प्रकारची सुरक्षा पुरवण्यासाठी त्यांनी आधीच सरकारला कळवले आहे.” पीसीबीने पुढे म्हटले आहे की, “कार्यवाहक पंतप्रधान अन्वर उल हक कक्कर यांनी पीसीबी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीत, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या यशस्वी आयोजनासाठी सुरक्षा एजन्सींच्या सहकार्याचे आश्वासन दिले.” पीसीबीसमोरील आणखी एक समस्या म्हणजे सध्याच्या आंतरराष्ट्रीय स्थळांचे नूतनीकरण करणे आणि त्यांना मेगा इव्हेंट सामन्यांसाठी तयार करणे. सध्या फक्त कराची, लाहोर आणि मुलतानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने आयोजित करण्यास पीसीबीकडे सक्षम स्टेडियम आहेत.