वृत्तसंस्था, लाहोर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पाकिस्तानातील केंद्रांचे नूतनीकरण संथगतीने सुरू असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चिंतित असून आगामी चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धा पाकिस्तानबाहेर खेळविण्याचा विचार करत असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र, पाकिस्तानातील स्टेडियमबाबत उभे करण्यात आलेले चित्र योग्य नसून चॅम्पियन्स करंडकाची तयारी प्रगतिपथावर असल्याची ग्वाही पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) शुक्रवारी देण्यात आली.
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील बहुतांश सामने पाकिस्तानात, तर भारताचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. मात्र, पाकिस्तानातील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, लाहोरचे गद्दाफी स्टेडियम आणि कराची येथील नॅशनल बँक स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ‘आयसीसी’ला आता ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर हलविण्याबाबत विचार करावा लागत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, स्टेडियमच्या नूतनीकरणाबाबत ‘पीसीबी’ आणि ‘आयसीसी’ निश्चिंत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>>Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका
‘पीसीबी’मधील सूत्राच्या माहितीनुसार, प्रसारणकर्ते आणि अन्य प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ‘आयसीसी’च्या पथकाने या तीनही स्टेडियमची पाहणी केली. त्यांनी ही स्पर्धा पाकिस्तानातच होणार असल्याची पुष्टी केली आहे.
‘‘चॅम्पियन्स करंडकाचा दर्जा लक्षात घेता पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. यासाठी आम्ही १२०० कोटी पाकिस्तानी रुपये खर्च केले आहेत. नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे,’’ असे ‘पीसीबी’मधील सूत्राने सांगितले.
‘‘पाकिस्तानातील माध्यमांनी कोणतीही शहानिशा न करता स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या बातम्या देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या बातम्या खोट्या असल्याचे आम्हाला पुढे येऊन सांगावे लागले. अन्यथा ‘पीसीबी’, ‘आयसीसी’, पाकिस्तान सरकार, व्यावसायिक भागीदार आणि चाहते यांच्यात बराच गोंधळ निर्माण झाला असता. याचा तिकीट विक्री आणि मार्केटिंगवर मोठा परिणाम होण्याची भीती होती,’’ असेही सूत्राकडून सांगण्यात आले.
स्थानिक पत्रकाराने कोणत्याही पदाधिकाऱ्याची परवानगी न घेता कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये घुसत नूतनीकरणाच्या कामाचे चित्रीकरण केले होते. त्यानेच खोटी माहिती पसरवताना नकारात्मक चित्र तयार केले. मात्र, स्टेडियमच्या कामाबाबत कोणतीही चिंता नसल्याचे सूत्राने स्पष्ट केले. ‘‘स्टेडियममधील कामावर ‘पीसीबी’ आणि संबंधित अधिकारी लक्ष ठेवून आहेत. चॅम्पियन्स करंडकाची तयारी प्रगतिपथावर असून काम वेळेत पूर्ण होईल,’’ असे या सूत्राने सांगितले.
(पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी अन्य पदाधिकाऱ्यांसह स्टेडियमच्या नूतनीकरण कामाची पाहणी करताना.)