वेस्ट इंडिज संघ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानबरोबर संयुक्त अरब अमिरातीमध्ये क्रिकेट मालिका खेळणार आहे. या मालिकेतील काही सामने पाकिस्तानात खेळण्यास विंडीजने नकार दिल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘विंडीजने सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयाबाबत आम्ही निराश झालो आहोत. आमच्या देशातील सुरक्षा व्यवस्थेत प्रगती झाली आहे. त्यांच्या खेळाडूंची आमच्या देशात अतिशय योग्य रीतीने काळजी घेतली जाईल. विंडीज क्रिकेट मंडळाने आम्हाला कळविले आहे की विंडीज संघातील काही खेळाडूंना पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेबाबत काळजी वाटत आहे.’
पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजबरोबर दोन कसोटी सामने तसेच एक दिवसाचे पाच सामने व दोन ट्वेन्टी२० सामने खेळणार आहे. २००९ मध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर लाहोर येथे काही अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर कसोटी खेळणाऱ्या एकाही देशाने पाकिस्तानात मालिका खेळलेली नाही. फक्त अफगाणिस्तान, केनिया व झिम्बाब्वे या संघांनी पाकिस्तानात सामने खेळले आहेत. झिम्बाब्वे संघाबरोबर गतवर्षी झालेली मालिका ही पाकिस्तान क्रिकेट मंडळासाठी मोठे यश आहे.

Virat Kohli Babar Azam
‘क्रिकेट डिप्लोमसी’ सांधणार भारत-पाकिस्तान संबंध?
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह…
PAK vs ENGPAK vs ENG Pakistan won the Test series at home after 3 years
PAK vs ENG : पाकिस्तानने ३ वर्षांनी मायदेशात जिंकली कसोटी मालिका, साजिद-नोमानच्या जोरावर इंग्लंडचा उडवला धुव्वा
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने डिवचलं, अभिषेक शर्माकडून चोख प्रत्युत्तर, पाहा VIDEO
PAK vs ENG Ben Stokes loses bat gets stumped during Pakistan vs England 2nd test match video viral
PAK vs ENG : बॅट उडाली, विकेट गेली, कॅप्टन गेला, सामनाही गेला…बेन स्टोक्स अनोख्या पद्धतीने झाला बाद; VIDEO व्हायरल
sajid khan
Pak vs Eng: दारुण पराभवातून बोध घेत पाकिस्तानने चार दिवसात कसा मिळवला संस्मरणीय विजय
Pakistan Beat England by 152 Runs in PAK vs ENG 2nd Test and equal series Noman Ali 11 Wickets Sajid Khan 9 wickets
PAK vs ENG: पाकिस्तानने दमदार पुनरागमनासह इंग्लंडचा उडवला धुव्वा, नोमान अलीने विक्रमी ११ विकेट घेत लाजिरवाण्या पराभवाचा घेतला बदला
Mohammed Siraj Devon Conway Engage In Banter in India vs New Zealand Test
IND vs NZ: “DSP आहे आता तो…”, मोहम्मद सिराज आणि डेव्हॉन कॉन्वे लाईव्ह सामन्यातच भिडले, सुनील गावसकरांच्या वाक्याने वेधलं लक्ष