वेस्ट इंडिज संघ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानबरोबर संयुक्त अरब अमिरातीमध्ये क्रिकेट मालिका खेळणार आहे. या मालिकेतील काही सामने पाकिस्तानात खेळण्यास विंडीजने नकार दिल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘विंडीजने सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयाबाबत आम्ही निराश झालो आहोत. आमच्या देशातील सुरक्षा व्यवस्थेत प्रगती झाली आहे. त्यांच्या खेळाडूंची आमच्या देशात अतिशय योग्य रीतीने काळजी घेतली जाईल. विंडीज क्रिकेट मंडळाने आम्हाला कळविले आहे की विंडीज संघातील काही खेळाडूंना पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेबाबत काळजी वाटत आहे.’
पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजबरोबर दोन कसोटी सामने तसेच एक दिवसाचे पाच सामने व दोन ट्वेन्टी२० सामने खेळणार आहे. २००९ मध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर लाहोर येथे काही अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर कसोटी खेळणाऱ्या एकाही देशाने पाकिस्तानात मालिका खेळलेली नाही. फक्त अफगाणिस्तान, केनिया व झिम्बाब्वे या संघांनी पाकिस्तानात सामने खेळले आहेत. झिम्बाब्वे संघाबरोबर गतवर्षी झालेली मालिका ही पाकिस्तान क्रिकेट मंडळासाठी मोठे यश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा